संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.12

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.12
भगवानबाबांनी आयुष्यभर कुठल्याही गोष्टीचा लोभ धरला नाही. त्यागी वृत्ती अंगी वाणलेली होती. अगदी बालपणी आई-वडील, बंधू, सवंगडी, गावकरी यांचा त्याग करून लोककल्याणासाठी नारायणगडावर माणिकबाबांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या संतत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर ज्या गोष्टीमुळे ही गोष्ट घडली ती गोष्ट म्हणजे स्वतःचे लिंगछेदन करून आपले संतत्व व त्यागी वृत्ती सिद्ध केली. “स्वतःच्या हाताने लिंग छाटून टाकून विमुक्त होणारा हा जगातील एकमेव महात्मा असेल!” असे नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात.
१.७.४ मुक्या प्राण्यांना प्रतिष्ठा :
नारायणगडाचा परिसर चांगला, स्वच्छ, निसर्गरम्य कसा राहील याकडे भगवानबाबा बारकाईने लक्ष देत. शिवाय हे अध्यात्मक्षेत्र उपेक्षित, वंचितांचे, लुळ्या-पांगळ्याचे, गोरगरिबांचे, पशुपक्षांचे कसे आश्रयस्थान होईल याकडे ते पाहत असत. त्यांनी गडावर लुळ्या-पांगळ्यांसोबत गवंड्यांनाही ठेवून घेतले होते. एवढेच नाही तर गायी, घोडे आणि पक्षांची काळजीही तेथे घेतली जाई. त्यापैकीच एक माणिकबाबांनी पाळलेला पोपट, भगवानबाबा आल्याची वर्दी सर्वप्रथम माणिकबाबांना तोच देई. यावरून त्यांचा एकमेकांविषयीचा लळा दिसून येतो. भगवानबाबांच्या आयुष्यात ‘गटाण्या, काळामोती, कुमाईत्या, टिक्या, पिट्ट्या, अरब्या अशा अनेक घोड्यांबरोबर गंगामाई घोडीही होती. गंगामाईनंतर त्यांच्या घोडदळात दाखल झालेल्या पांढऱ्या, हरण्या, तांबड्या, काळ्या घोड्यांना गंगामाई म्हणूनच मान्यता मिळे. ज्याप्रमाणे महाराणा प्रतापांचा चेतक, शिवाजी महाराजांचा कुत्रा खंड्या तशा पद्धतीने भगवानबाबांची गंगामाई घोडी होती. गावोगावी अनेक गंगामाईच्या सुरस कथा सांगितल्या जातात. गंगामाईच्या कला-गुणांमुळे व तिच्या शोधक वृत्तीमुळे काही संस्थानांची नव्याने निर्मिती झाली. ही गंगामाईची शोधक वृत्ती म्हणजे हल्लीचे श्वान पथक म्हणता येईल. या प्रशिक्षित असलेल्या श्वानपथकातील कुत्र्याप्रमाणे गंगामाईला भगवानबाबांकडून प्रशिक्षण मिळाले नसेल तर नवलच. ही गंगामाई भगवानबाबांच्या दिंडीत सर्वात पुढे चालायची. “दौ-याच्या वेळी बाबा तांग्यात प्रवास करीत. कधी घोड्यावर तर कधी तांग्यात, घोड्यांवर त्यांचे भलते प्रेम असायचे. या प्रेमामुळेच घोडा अन् गंगुबाई घोडी गावच्या वेशीतून आत यायला लागली की, स्त्री-पुरुष अन् गावकरी या घोड्यांच्या पाया पडत. नकळत बाबांच्य माध्यमातून मुक्या प्राण्यांना प्रतिष्ठा मिळत होती.” याच गंगामाई घोडीचे पुढे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर
“भगवानगडा चाललो चढलो चढलो
सोन्याची पायरी चढलो
भगवानगड, भगवानबाबांची आठवण झाली व त्या दिशेने चालायला जरी सुरुवात केली तरी सोन्याची एक-एक पायरी चढल्याचा भास होतो. मन मोठं होतं. एवढं मोठं श्रीमंत मन भगवानबाबांमुळे झाल्याची भावना कवी दत्तात्रय उकंडे व्यक्त करतात. एकंदर भाविक, भगवानगड व भगवानबाबांविषयी समाधान व्यक्त करणारी काव्यरचनाही पहायला मिळते.
३.२.२ पाळणे :
‘पाळणा’ हा अंगाईगीतातील प्रकार आहे. पाळण्यात झोका देऊन, जोजवून, हिंदोळून लहान बाळास झोपण्याची प्रथा खूप जूनी व पारंपरिक आहे. बालसंगोपन व माता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणूनही आपल्याला पाळण्याकडे पाहता येते. शिवाय त्याच्या मागे मुख्य प्रयोजन किंवा मानसशास्त्रीयही विचार करता येतो. कारण पाळण्याची हलकीशी गती-लय व सोबतीला आईने गायीलेला पाळणा या अंगाईगीत त्यामुळे बाळाच्या शरीर व मनाला आराम मिळू लागतो. मन स्वास्थ्य व शरीरस्वास्थ्य हा दुहेरी हेतू त्यातून साध्य होतो. शिवाय बाळाला जर एकलेपणाचे भय असेल तर ते नाहीसे होऊन त्याची चित्तवृत्ती एकाग्र होऊन त्यास याद्वारे निद्राधीन करणे सोपे जाते. पाळण्याव्यतिरिक्त मांडीवर हळूवार जोजवून वा कुशीत कुरवाळून, थोपटून गीत म्हणत म्हणत बाळास झोपविण्याची पद्धतही ग्रामीण भागात आहे. अशा गीतास आपण अंगाईगीत म्हणतो. “लहान मुलांवर पहिला संस्कार म्हणजे त्याचा नामकरण विधी किंवा बारसे. या दिवशी जमलेल्या सुवासिनी ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ अशा अर्थी, पाळण्यास हलकेसे हलवीत एकत्रपणे जे गीत गातात त्यास ‘पाळणा’ म्हणण्याची पद्धत आहे.” पाळण्याचा विषय हा संसाराला एक वेगळा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या बाळाचे गोडकौतुक करण्याचा असतो. तद्वतच त्याला भीतीही दाखवण्याचा असतो. जाणते-अजाणतेपणीच बाळावर शूरवीर पित्याचे वर्णन किंवा पुराणपुरुषांचे पराक्रम उदा. रामजन्म, कृष्णजन्म, शिवाजी महाराज, कोशल्या, जिजामाता आदी संत यांचे पराक्रम-कार्य कानावर घातले जाऊन गतकाळ त्याच्यासमोर उभा केला जातो व नकळतपणे त्यांच्या आचार-विचारांची जडणघडण ही संस्कार संपन्न करून
भविष्यात अशा प्रकारे कार्य कर्तृत्त्ववान व्हावे, ही सुप्त इच्छा, तळमळ त्यामागे व्यक्त
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




