बहुजनांचे बळ छगन भुजबळ आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी आदरणीय साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो

बहुजनांचे बळ छगन भुजबळ आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी आदरणीय साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. बांधवांनो गेल्या 40 वर्षापासून ज्या माणसांना सामाजिक राजकीय जीवनामध्ये समाजाच हित पाहिल समाजाची एकी पाहिली आणि हा ओबीसी समाज सत्तेमध्ये आला पाहिजे यासाठी स्वप्न पाहिलं ते आदरणीय भुजबळ साहेब गेल्या 40 वर्षांमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशातील ओबीसीला एकत्र करून ओबीसीची एकता आणि ओबीसीची सत्ता हे सूत्र अवलंबून ओबीसीना न्याय द्यायचं काम आदरणीय साहेबांनी केलं.
qमंडल आयोगापासून ते कालपर्यंतच्या सर्व आंदोलनापर्यंत देशात आणि महाराष्ट्रात केंद्रस्थानी आदरणीय भुजबळ साहेब राहिले जेव्हा जेव्हा ओबीसी वर अडचणी आल्या तेव्हा तेव्हा आदरणीय भुजबळ साहेब पक्ष सोडून नेहमी ओबीसी समाजाच्या बाजूने उभे राहिले आरक्षणाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल ,
पदोन्नतीचा प्रश्न असेल विद्यार्थी वस्तीग्रहाचा प्रश्न असेल यासारखे अनेक प्रश्न आदरणीय भुजबळ साहेबांनी सोडवलेले आहेत त्यामुळे भुजबळ साहेब या देशातल्या तमाम बहुजनांचं ओबीसींच बळ आहेत असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही. गेल्या 13 महिन्यांमध्ये या महाराष्ट्रातील ओबीसी दबला गेला होता,पिचला गेला होता ,झुंडशाहीच्या दबावाला बळी पडत होता.ओबीसी भरडला जात होता.ओबीसी समूहावर अत्याचार केले जात होते
तेव्हा हाच ओबीसीचा वाघ मंत्रिमंडळातील राजीनामा देऊन ओबीसीसाठी रस्त्यावर उतरला सरकारमध्ये असून देखील सरकारच्या विरोधात ओबीसी समाजाची बाजू लावून धरण्याचा काम आदरणीय भुजबळ साहेबांनी केलं म्हणून ओबीसी चा श्वास मोकळा झाला ओबीसी लिहायला लागला ओबीसी बोलायला लागला ओबीसी स्वाभिमानाने चालायला लागला याचा सर्व श्रेय आदरणीय भुजबळ साहेब तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच जाते . म्हणून आदरणीय साहेब आपणच या देशातील ओबीसीची शान, मान ,
सन्मान आणि अभिमान आहेत साहेब आम्हा तमाम ओबीसी बांधवाकडून आमच्या अंगाचा कातड करून जरी तुमच्या पायात घातल तरी तुमचे उपकार हा ओबीसी कधीच विसरू शकत नाही. आमच्या ओबीसीच्या आयुष्यातला एक एक दिवस कमी झाला तरी चालेल पण तो एक एक दिवस साहेब आपणास मिळो एवढीच निर्मिती प्रार्थना करतो पुन्हा एकदा साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनःपूर्वक तमाम ओबीसी बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपलाच समता सैनिक प्रा संतोष वीरकर प्रदेश प्रचारक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद छ्त्रपती संभाजीनगर




