सोलापूर

🚩 पूर्व विदर्भात माळी महासंघाची मोठी ताकद वाढली! कैलाश तानकर यांच्यावर नागपूर विभागाध्यक्षपदाची जबाबदारी; ओबीसी हक्कांच्या लढ्याला मिळणार नवी धार!

🚩 पूर्व विदर्भात माळी महासंघाची मोठी ताकद वाढली! कैलाश तानकर यांच्यावर नागपूर विभागाध्यक्षपदाची जबाबदारी; ओबीसी हक्कांच्या लढ्याला मिळणार नवी धार!

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

अखिल भारतीय माळी महासंघाने पूर्व विदर्भातील संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने मा. कैलाश संपतराव तानकर (नागपूर) यांची नागपूर विभागाध्यक्ष (पूर्व विदर्भ) म्हणून नियुक्ती केली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर तसेच विश्वस्त व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

कैलाश तानकर हे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वामुळे आता पूर्व विदर्भात अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक चळवळ अधिक वेगाने उभी राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

महासंघ सध्या ओबीसीवरील अन्याय-अत्याचाराविरोधात, ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदने, तसेच जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी गावोगावी ग्रामपंचायतींचे ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्याची व्यापक मोहीम राबवत आहे. या जनआंदोलनात कैलाश तानकर यांचे नेतृत्व पूर्व विदर्भात निर्णायक ठरणार असून संघटना अधिक सक्षम व प्रभावी बनेल, यात शंका नाही.

निवडीनंतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

🔥 सोशल संपादकीय संदेश

पूर्व विदर्भ आता जागा होणार!
ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी, जातनिहाय जनगणनेसाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी गावोगावी संघटना उभी करण्याची हीच वेळ आहे. अखिल भारतीय माळी महासंघाची चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने संघटित व्हा. संघर्षाशिवाय अधिकार मिळत नाहीत; आता प्रत्येक गावातून आवाज उठला पाहिज

📲 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
WhatsApp : 7387737871

✅ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
✅ बातमी Like • Share • Subscribe • Forward • Comment करा.
✅ Bell Icon दाबा.
✅ WhatsApp Channel फॉलो करायला विसरू नका.

#Hashtags

#अखिलभारतीयमाळीमहासंघ #कैलाशतानकर #पूर्वविदर्भ #नागपूर #OBC #जातनिहायजनगणना #सामाजिकन्याय #माळीसमाज #संघटनहाचबळ #दिनबंधून्यूज #शिवक्रांती #सत्यशोधकशंकररावलिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button