सोलापूर

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त ऐतिहासिक निर्णयांची मागणी; फुले दांपत्याला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द्या – अखिल भारतीय माळी महासंघाचे महाराष्ट्र सरकारला आक्रमक निवेदन

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त ऐतिहासिक निर्णयांची मागणी; फुले दांपत्याला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द्या – अखिल भारतीय माळी महासंघाचे महाराष्ट्र सरकारला आक्रमक निवेदन

मुंबई | प्रतिनिधी :

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, ओबीसी व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे तसेच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त देशभर गौरव वर्ष साजरे करण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातही महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा व्यापक सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याचे शासकीय स्तरावर जतन व्हावे, यासाठी महासंघाने महत्त्वपूर्ण मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत.

महासंघाच्या प्रमुख मागण्या

१) महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याला भारतरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी.

२) महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर व प्रमुख चौकांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत.

३) महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर फुले दांपत्याच्या पुतळ्यांचे लोकार्पण करण्यात यावे.

४) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एका महाविद्यालयाला “महात्मा ज्योतिराव फुले महाविद्यालय” असे नाव देण्यात यावे.

५) महाराष्ट्रातील सर्व मुलींच्या शाळांना आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे.

६) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात महात्मा फुले दांपत्याच्या जीवनकार्यावर स्वतंत्र धडा समाविष्ट करावा.

७) केजी ते पीजी (KG to PG) पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा.

८) मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख उद्यानांना “महात्मा ज्योतिराव फुले पार्क” असे नाव देण्यात यावे.

९) महाराष्ट्रातील सर्व मार्केट यार्ड, भाजी मंडई आणि फळबाजारांना महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे.

१०) प्रमुख सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि महाविद्यालयांच्या भिंतींवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात यावीत.

११) दरवर्षी ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किमान ५ समाजसेवकांना प्रत्येकी ₹२ ते ₹५ लाखांचा “महात्मा फुले पुरस्कार” प्रदान करण्यात यावा.

१२) दरवर्षी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किमान ५ आदर्श महिला शिक्षिकांना प्रत्येकी ₹२ ते ₹५ लाखांचा “सावित्रीबाई फुले पुरस्कार” प्रदान करण्यात यावा.

१३) विद्यापीठ व बोर्ड परीक्षांमध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना महात्मा फुले दांपत्याच्या नावाने विशेष सन्मान निधी देण्यात यावा.

१४) महाराष्ट्रातील प्रत्येक महानगरपालिकेत एका परिसराला “महात्मा ज्योतिराव फुले नगर” आणि दुसऱ्या परिसराला “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नगर” असे नाव देण्यात यावे.

१५) महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त ₹२०० च्या नोटेवर त्यांचे छायाचित्र छापण्यात यावे.

१६) महाराष्ट्रातील एका प्रमुख रेल्वे स्थानकाला “महात्मा ज्योतिराव फुले रेल्वे स्थानक” असे नाव देण्यात यावे.

महासंघाने मांडलेल्या या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

✍️ संपादकीय संदेश

महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री-मुक्ती आणि मानवतेचा विचार देशाला दिला. त्यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त केवळ स्मरणोत्सव साजरे करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांना शासनाच्या धोरणांत स्थान मिळाले पाहिजे. शिक्षण, सामाजिक न्याय आणि समान संधी यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाने मांडलेल्या मागण्या समाजहिताच्या आणि दूरदृष्टीच्या आहेत. महाराष्ट्र सरकारने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, हीच फुले दांपत्याला खरी अभिवादन ठरेल.

📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 संपर्क : 7387377801

आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 7387377801 हा क्रमांक जोडा. बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button