सोशल

अखिल भारतीय माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मधुसूदन देशमुख यांची निवड; अनुभवी नेतृत्वामुळे राज्यातील संघटन अधिक बळकट होणार

अखिल भारतीय माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मधुसूदन देशमुख यांची निवड; अनुभवी नेतृत्वामुळे राज्यातील संघटन अधिक बळकट होणार

नागपूर | प्रतिनिधी :
अखिल भारतीय माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर मा. मधुसूदन देशमुख (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष मा. सत्यशोधक शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर आणि विश्वस्त मा. गोविंदराव वैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आले.

मधुसूदन देशमुख यांचा सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, संघटनात्मक आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अखिल भारतीय माळी महासंघाची राज्यभर संघटनात्मक ताकद वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देशमुख यांचा जन्म १ जुलै १९५३ रोजी झाला. त्यांनी Diploma in Journalism & Mass Communication हे शिक्षण पूर्ण केले असून ते नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सन २०१९ पासून अखिल भारतीय माळी महासंघाचे नागपूर महानगर अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच क्रांती ज्योती माळी विकास संस्था, नागपूर येथे सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. २०१३ पासून नागपूर येथील गीतामंदिर येथे माळी समाज युवक-युवती परिचय संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त फुले विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, ओबीसी समाजावरील अन्याय-अत्याचार व प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निवेदने देणे, तसेच जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव मंजूर करण्याची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

त्यांच्या निवडीबद्दल मा. विठ्ठलजी तोडकर, मा. शिवशंकर काऊलकर, मा. विठ्ठलजी सातव, मा. दामोदर रामकृष्ण गाडगे, मा. प्रभाकरजी सातव, मा. भिमरावजी कोथिंबीरे, मा. अमर बोराटे, मा. डॉ. देविदासजी शेंडे, मा. मनीषजी गिऱ्हे, मा. अभय तायडे, मा. वसुधा रामकृष्ण येनकर, मा. कैलासजी जामगडे, मा. ज्योती मुरलीधर निरपासे, मा. जनाबापू मेहेत्रे, मा. डॉ. गजाननजी अजगर, मा. माधुकरजी घिरके, मा. राजेश द. मेहेत्रे, मा. केशवराव सोनुने, मा. शरदजी बनकर, मा. कार्तिकजी बेहेरे, मा. राजेंद्रकुमार पल्हाडे, मा. विजय राजाभाऊ खरात आणि मा. कारभारी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

✍️ संपादकीय संदेश

मधुसूदन देशमुख यांची निवड ही अखिल भारतीय माळी महासंघासाठी संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील संघटन उभारणीस निश्चितच होईल. महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांचा प्रसार, ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी लढा आणि सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी हे नेतृत्व मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.

— संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

📞 संपर्क : 7387377801

👉 हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राईब करा.
📲 फॉरवर्ड करा.
💬 कमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबा.
📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल व ग्रुपला फॉलो करायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button