सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.28

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.28
दत्तात्रय झोडगे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी म्हणजे ९ नोव्हेंबर २००१ रोजी पुणे येथे निधन झाले.
झोडगे
फुलवंताबाई दत्तात्रय
(१जानेवारी १९२०-१०मे २००१)
पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रकार सत्यशोधक फुलवंताबाई झोडगे यांचा जन्म १जानेवारी १९२० रोजी झाला. पुढे गावगाडा पत्राचे संपादक दत्तात्रय झोडगे यांच्याशी १९३० साली फुलवंताबाईंचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी राहिलेले शिक्षण पूर्ण केले.
‘प्रभात’ व ‘अंकुर’ आदी हस्तलिखिते आरंभी फुलवंताबाईंनी चालविली. कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांनी १९३९ साली सावित्रीबाई फुले यांचे आठ-नऊ पानी अल्पचरित्र प्रसिद्ध केले. तद्नंतर फुलवंताबाईंनी सावित्रीबाई फुले यांचे सविस्तर चरित्र १९६६ साली प्रसिद्ध केले.
प्रस्तुत चरित्र खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचे पहिले चरित्र होय! या चरित्राच्या आवृत्त्यावर आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.
‘सई’ (सामाजिक कादंबरी), थोर शिवाजी, राजमाता जिजाबाई, तुकाराम नीती, ज्ञानेश्वर नीती आदी विपुल वाङ्मय त्यांच्या नावावर उपलब्ध आहे. रोहिणी, गावगाडा, संध्या, समाजशिक्षण आदी नियतकालिकांमधून विपुल लेखन त्यांनी केले. पेशाने शिक्षिका असलेल्या फुलवंताबाईंना महाराष्ट्र शासनाने इ. स. १९८२-८३ ला ‘सावित्रीबाई फुले ‘पुरस्काराने गौरविले.
क्रांतिमाँ सावित्रीबाई फुले यांच्या आद्य चरित्रकार, फुलवंताबाई झोडगे यांचे
१० मे २००१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.
संदर्भ – पहिली भारतीय शिक्षिका – सावित्रीबाई फुले सौ. फुलवंताबाई
झोडगे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




