ओबीसी विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांना तात्काळ संरक्षण द्यावे.

ओबीसी विचारवंत प्राध्यापक श्रावण देवरे यांना तात्काळ संरक्षण द्यावे.
महाराष्ट्रातील तमाम ओबीसीला जागृत करण्याकरता सातत्याने प्रयत्न असणारे ,प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर ,ओबीसी विचाराची भूमिका आक्रमकपणे मांडणारे ,प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या घरावर काही माथे फेरूंनी नुकताच हल्ला केला. ओबीसी समाजाच्या जागृतीमुळे प्राध्यापक श्रावण देवरे यांचा जीव वाचला .
ओबीसी युद्ध प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर सुद्धा काही माथे पेरूणी याच पद्धतीने मॉबल इंजिन करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र मध्ये ठिकठिकाणी ओबीसी अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा प्रयत्न चालू आहे कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहे ओबीसीची भूमिका आक्रमकपणे मांडणार यांच्या घरावर चुकीच्या पद्धतीने जाण्याचा हा प्रकार हा भारतीय संविधानाच्या विरोधी आहे राज्य सरकारने असे विरोधी कृत्य करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी व ओबीसीचं काम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे
अशी मागणी आम्ही करीत आहोत तसेच.राज्य सरकारने प्राध्यापक श्रावण देवरे यांना लवकरात लवकर संरक्षण द्यावे .ही मागणी ओबीसी जन मोर्चा भारतीय पिछडा ओबीसी शिष्य संघटन ओबीसी कर्मचारी अधिकारी संघटन यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. याप्रसंगी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास काळे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत दोडके मायाताई गोरे ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाचे उपाध्यक्ष इंजिनिअर संतोष झेंडे प्रभाकर खोडे आधी बांधव उपस्थित होते




