वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अरेरावी करणाऱ्यांवर आवर घाला ललकार संघटनेची मागणी.

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अरेरावी करणाऱ्यांवर आवर घाला ललकार संघटनेची मागणी.
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुमन दादाराव कॉम्पलवार वय 65 वर्षे आजारी असल्यामुळे त्यांना 13 /10 /2024 रोजी भेटायला गेले असता तब्येतीबद्दल विचारपूस करण्याकरताही त्यांनी आत मध्ये येऊ दिले नाही .तेथील ड्युटीवर असलेले महाराष्ट्र सुरक्षा बल गार्ड ,एम एस एफ अनिल गायकवाड , यांनी निलेश नागमोते यांनी यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला सदर मोबाईल कव्हर मध्ये 5000 रुपयाची रक्कम होती ,

ती दरम्यानच्या काळात सदर रक्कम गहाळ झाली, मित्राला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करत त्यांनी बाहेर काढले. या प्रसंगी डॉक्टर सुभाष राठोड यांना बोलावले दोघेही अरेरावी करत उद्धटपणे बोलत होते .अनिल गायकवाड अतिमदय घेऊन होते .आणि सांगत होते मी पालकमंत्र्यांचा माणूस आहे तुझ्याकडून जे होते ते करून घे. कार्यकर्त्यांच्या संदर्भात जर अशा पद्धतीचे वक्तव्य दवाखान्यामध्ये होत असेल तर सामान्य माणसाची किती हाल होत असतील .त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ललकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीपक दादाराव कोम्पलवार यांनी दिलेला आहे .संबंधित निवेदनाची दखल सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केलेली आहे.



