सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा. 25

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा. 25

महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ १२ किती गाजली असतील ते कळून येते. “आम्ही युक्तिवाद करतो, बळाचा वापर करून कुणावर जबरदस्ती करत नाही.”” हा जॉन विल्सनचा दावा त्यांच्या प्रचारपद्धतीतील उदारमतवादी दृष्टीचा द्योतक आहे. धर्मप्रवचने व व्याख्याने यांच्याप्रमाणेच हे धर्मोपदेशक हिंदुधर्मातील दोषस्थळे दाखवून देणाऱ्या लहान लहान पुस्तिकाही प्रसिद्ध करीत होते. त्यांची छोटी मोठी पुस्तके वाचनासाठी जोतीरावांना उपलब्ध होती. त्यामुळे त्यांचे समाजचिंतन अधिक डोळस व मर्मग्राही बनले. या चिंतनातूनच आपल्या सहजस्फूर्त विचारांना एकत्र गुंफणारे अंतःसूत्र त्यांना गवसले. हिंदुसमाजातील शूद्रातिशूद्रांच्या दुरवस्थेला उच्च्चवर्णियांचा स्वार्थ, अदूरदृष्टी आणि असहिष्णुता हे व्यक्तिगत दोष तर कारणीभूत आहेतच;

पण त्यापेक्षाही त्यांच्या श्रुतिस्मृतिप्रणीत शास्त्रग्रंथात सामाजिक विषमतेची व गुलामगिरीची बीजे आहेत हे त्यांना कळून चुकले. मात्र जोतीरावांच्या पूर्वायुष्यात तरी या निषेधपर दृष्टीपेक्षाही खिस्ती धर्मोपदेशकांच्या कार्याचे विधायक अंगच त्यांना अधिक उद्बोधक व स्फूर्तिदायक वाटले होते. या धर्मोपदेशकांची येथील वाटचाल निष्कंटक नव्हती. जुन्या सनातनी पंडितांचा व पोटभरू भिक्षुकांचा त्यांच्यावर रोष होत. त्याबरोबरच इतर सामान्यजनांकडूनही त्यांना वारंवार त्रास होत होता.

या खिस्ती “उपदेशकांस पाहिजेल त्याने पकडावे, झोडावे, कुटावे पिटावे व धूर्त टकांच्या फुसलावणीवरून अज्ञानी शूद्रांच्या पोरासोरांनी त्यांच्या मागे बोंबा, आरोळ्या मारता मारता त्याजवर धूळ-मातीचा भडिमार करून, त्यास पाहिजेल तिकडे खिदडावे ” असा प्रकार नेहमीचा होऊन बसला होता. जेम्स मिचेल व जॉन स्टिव्हेन्सन हे स्कॉटिश मिशनचे दोघे उपदेशक धर्मप्रसारासाठी पुण्यास येऊन राहिले होते. हे काम करताना त्यांचा पावलोपावली कसा पाणउतारा केला जात असे, ते पुणे वर्णनकार ना. वि. जोशी यांनी नमूद करून ठेवले आहे. “मिचेलसाहेव उपदेशास बाहेर निघाले म्हणजे लोक त्यांचे फार हाल करीत. शिव्या देत, टोपी उडवीत, हुर्यो हुर्यो करीत, त्यांच्या पाठीस लागत, धोंडे मारीत, कोणी थापट्या मारीत, कोणी शेणमार करीत; तरी ते इतके सहनशील होते की, कोणास चकार शब्दही न बोलता उलटे त्यांस चांगल्या गोष्टी सांगत.” इतका कडवा विरोध होता, तरीदेखील हे धर्मोपदेशक

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button