वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी लिंगायत समाजातील सर्व पोटजातीच्या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…

वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी लिंगायत समाजातील सर्व पोटजातीच्या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…
सोलापूर : वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने दि. १५ डिसेंबर २०२४ रविवार रोजी सकाळी १०.०० वा. हुतात्मा स्मृती मंदिर, पार्क चौक, सोलापूर येथे वीरशैव लिंगायत समाजातील जंगम समाजासह सर्व पोटजातीचा १० वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजशेखर विजापूरे यांनी दिले.
गृहस्थाश्रम हा एक पवित्र आश्रम समजले जाते. त्यासाठी विवाह विधों महत्त्वाचा आहे. विवाह जमविणे जेवढे जिकरीचे तेवढेच महत्त्वाचे कार्य आहे. हे सामाजिक व सेवाभावी काम असून त्याच वृत्तीने ते केले तरच खरा आनंद व समाधान मिळते पाच सामाजिक बांधिलकीच्या जाणोवेतून गेल्या ९ वर्षापासून वध-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
१० व्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याच्या स्वागत अध्यक्ष पदी डॉ. शैलेशकुमार पाटील (चेअरमन, हृदयम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल) यांची तर कार्याध्यक्षपदी अंङ रितेश मिलिद थांबडे (विधिज्ञ उच्च न्यायालय, मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहकार्याध्यक्षदपदी श्री.उदयशंकर चाकोते (माजी नगरसेवक) व रेवणसिध्द बिज्जरगी (उद्योजक) यांचोही निवड झाली आहे.
गेल्या ९ वर्षापासून वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. मागील ९ वर्षात या वधु-वर परिचय मेळाव्यात ८६४० वधु-वरांनो नोंदणी केली होती. या मेळाव्याच्या माध्यमातून ७० ते ८० टक्के वधु-वरांचे विवाह या वधु-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून जुळलेले आहेत. यंदाच्याही वर्षी ६०० ते ७०० वधु-वर १० व्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यात नोंदणी करुन उपस्थित राहतील, अशी आशा आहे.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




