सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.22

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.22
होते. या सहाव्या प्रांतिक सत्यशोधक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष वर्धा येथील सत्यशोधक चंपतराव येडे हे होते.
या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबूराव जेधे यांचे भाषण उपलब्ध असून हे भाषण ‘श्री दत्तात्रय छापखाना, ९९ रविवार, पुणे’ या प्रेसमधून मुद्रित केले आहे. जेधे यांचे हे भाषण विस्ताराने सविस्तर असून, तत्कालीन सत्यशोधकी चळवळीचा सखोल विचार त्यात मांडला आहे.
या भाषणात भारतीयांसाठी वैदिक काळ सकल समाजासाठी ‘सुवर्णकाळ’ असल्याचे त्यांनी आरंभीच म्हटले आहे. सकल भारतीय समाज, या कालखंडात समता विघटित विचारसरणी अवलंबून संक्रमण करत होता. मात्र पुराणांची निर्मिती होताच समाजात विषमतेने डोके वर काढले. पुढे वर्णव्यवस्था निर्माण करून विषमतेला अधिकचे खतपाणी घातले गेले. जन्मानुसार श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यात आले. यामुळे ब्राह्मण प्रबळ झाले. ब्राह्मणांखेरीज सकल समाज धार्मिक अंगाने गुलाम झाला. दरम्यान बौद्ध, जैन धर्माने प्रस्थापित ब्राह्मण्याच्या विरोधात बंड पुकारले.
सत्यशोधक समाजाच्या मूलगामी तीन तत्त्वांवर भाष्य करून दलित-बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान करण्याचे प्रतिपादन जेधे यांनी केले. पुढे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि सत्यशोधक समाज संघटनेचा आढावा त्यांनी घेतला. सत्यशोधक वाङ्मय सांप्रत काळात विपुल असल्याचे मतही त्यांनी मांडले. जाता जाता ‘जलसा’ चळवळीवरही त्यांनी भाष्य केले आहे.
अशा या सत्यशोधकाचे ९ मार्च १९६८ रोजी निधन झाले. संदर्भ – वऱ्हाड मध्य प्रांत सत्यशोधक परिषद (वर्धा) – सन १९२९ – अध्यक्ष बाबूराव मारुतीराव जेधे यांचे भाषा.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




