महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.22

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.22
महात्मा फुले : जडणघडण
खिस्ती धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव
खिस्ती धर्मातील मानवतावादाने जोतीरावांच्या विचारांत अधिक स्पष्टता व सुसूत्रता आली असेल. पण त्यापेक्षाही खिस्ती धर्मोपदेशकांचे व्यक्तित्व आणि कार्यपद्धती यांची त्यांच्या मनावर दृढ छाप पडली होती. कारण त्यांच्या उक्तीतून व कृतीतून मानवतावादी नीतिधर्माचा त्यांना रोजच्या रोज प्रत्यय येत होता. हिंदुधर्मग्रंथात अशा उदात्त नीतितत्त्वांचे प्रतिपादन नाही असे म्हणता येणार नाही. उपनिषदे, रामायण, महाभारत, भागवत इत्यादी ग्रंथांतून उच्चतर नीतिमूल्यांची महती गाईलेली आहे. भगवद्गीतेत जे दैवी संपत्तीचे वर्णन आहे, त्यात समाजधारणेला उपकारक असा नैतिक गुणांचाच समावेश आहे.
मराठी संतवाङ्मयात तर परमार्थसिद्धीसाठी भक्तीइतकीच नीतीची कशी आवश्यकता आहे ते वारंवार आवर्जून सांगितले आहे. हे सर्व खरे असले, तरी या ग्रंथांनी ज्या समाजव्यवस्थेला दैवी अधिष्ठान प्राप्त करून दिले होते, तिने शूद्रांतिशूद्रांना माणसाचे साधे नैसर्गिक हक्कही शतकानुशनके नाकारले होते. शिवाय हिंदुधर्माचे परंपरागत प्रवक्ते जे शास्त्रीपंडित, पुराणिक-पुरोहित त्यांच्या नेहमीच्या वागण्यात नैतिकतेचा, सहृदयतेचा, समाजहितबुद्धीचा लवलेशही नव्हता. लोकहितवादींची शतपत्रे वाचली की, अव्वल इंग्रजीत स्वतःला ‘भूदेव’ म्हणविणाऱ्या या लोकांचा हरएक बाबतीत किती अधःपात झाला होता,
त्याची कल्पना येते. मोठमोठी तत्त्वे जुन्या ग्रंथांतच राहिली, आणि प्रत्यक्ष धर्माचरणात मात्र अज्ञान, गतानुगतिकता, स्वार्थ आणि ढोंगबाजी यामुळे पदोपदी त्या उदात्त तत्त्वांचे विडंबनच चालू होते. महाराष्ट्रात वारकरी पंथ अत्यंत लोकप्रिय होता. पण त्यातही अनेक मठपती व महाराज उदयास येऊन महंतगिरी वाढीस लागली होती. त्यांच्या कीर्तननिरूपणात बदललेल्या परिस्थितीचे भान ठेवून लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य उरलेले नव्हते. उलट खिस्ती धर्मोपदेशकांच्या कार्यामधून त्यांची विद्याभिरूची, धर्मनिष्ठा, समर्पणशीलता, उद्योगप्रियता, कर्तव्यदक्षता आणि अगदी खालच्या थरांतील माणसाविषयींचा कळवळा इत्यादी गुणांची सर्वांनाच निरंतर साक्ष पटत होती. आपला उपदेश आणि आचरण यांत सुसंवाद राखण्याची त्यांची धडपड खचितच गौरवास्पद होती. आपल्या समाजातील धर्ममार्तंडांनी कधीतरी खालच्या लोकांश
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


