सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.20

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.20
१९२३ ते १९३० पर्यंत केशवराव जेधे यांनी तन, मन, धनाने या मेळ्याच्या उन्नतीसाठी परिश्रम केले. सतत सात वर्षे या मेळ्यासाठी केशवरावांनी पद्यरचना केली. प्रसंगी काही गाणीही गायली. इ. स. १९२५ साली मशीनगनी सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या ‘देशाचे दुश्मन’ पुस्तिकेचे प्रस्तावनाकार म्हणून त्यांना न्या. फ्लेमिंग यांनी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. पुढे न्या. लॉरेन्स यांच्या कोर्टातील फेर अपिलात ते निर्दोष सुटले; परंतु काही दिवस त्यांना येरवडा जेलमध्ये बंद राहावे लागले. सत्यशोधक मताचे पत्र ‘विजयी मराठा’ आणि रामचंद्र लाडांचे ‘मजूर’ पत्राला त्यांनी मदत केली. त्यांनी ‘श्री शिवस्मारक’ पत्रही चालविले. मात्र ते अल्पजीवी ठरले. महाड आणि पुणे येथील पर्वती मंदिर
सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. पुणे नगरपालिकेचे सदस्य (इ. स. १९२५) असताना जेधे यांनी एक अविस्मरणीय- ऐतिहासिक ठराव न. प. मध्ये मांडला. पुणे येथील बुधवार पेठेत महात्मा फुले यांचे उचित स्मारक व्हावे म्हणून फुले यांचा पुतळा उभारणीचा ठराव मांडला. या ठरावाला सनातन्यांनी, सदस्यांनी माकडचेष्टा करून विरोध केला. ल. ज. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ४ सप्टेंबर १९२५ रोजी या ठरावावर चर्चा झाली. केशवराव जेधे, वायाळ, सणस, विठ्ठलराव झेंडे या ठरावाच्या बाजूने असलेल्या न. प. सदस्यांची सनातनी सदस्यांनी बहुमताच्या जोरावर कोंडी केली. दरम्यान, केशवराव जेधे, वायाळ, सणस, विठ्ठलराव झेंडे यांनी सभात्याग केला. यानंतर ग. म. नलावडे लिखित आणि विश्वनाथ महादेव फुले यांची प्रस्तावना लाभलेली’ सत्यशोधक-का-ख्रिस्तसेवक ?’ ही महात्मा फुले यांची असंसदीय भाषेत बदनामी करणाऱ्या पुस्तिकेची मुद्दामहून याच दिवशी दुसरी आवृत्ती प्रकाशित करून सभागृहात वितरित करण्यात आली. त्यामुळे झाले असे की, सनातनी सदस्यांनी माकडचेष्टा करून केशवराव जेधे यांचा हा क्रांतिकारी ठराव हाणून पाडला. तिकडे हा ठराव फेटाळल्याने सत्यशोधक दुःखी झाला. दुःखी होऊन तमाम सत्यशोधक भानावर आला. जोतिरावांचे चुलत नातू सत्यशोधक गजानन गणपतराव फुले यांनी न. प. सदस्य बाबूराव फुले यांच्यावर फुले यांची बदनामी केली म्हणून न्या. फ्लेमिंग यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली. बाबूराव फुले आणि विश्वनाथ फुले यांचा संदर्भाने मराठी मुलखात विशेष सभा घेऊन निषेध करण्यात आला. अमरावती येथे याचवर्षी भरलेल्या अ. भा. दुसऱ्या ब्राह्मणेतर काँग्रेस परिषदेमध्ये प्रस्तुत प्रकरणाचे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


