शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर या संस्थेची दैदीप्यमान वाटचाल

प्रेस नोट
शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर या संस्थेची दैदीप्यमान वाटचाल
शासकीय तंत्रिकेतन सोलापूर ही जिल्ह्यातील 70 वर्षे जुनी तांत्रिक शिक्षण देणारी सर्वात मोठी संस्था आहे. संस्थेच्या 32 एकर अशा विस्तीर्ण परिसरात 11 इमारतींपैकी मुलांचे दोन वस्तीगृह (300 क्षमता) आणि मुलींचे तीन वस्तीगृह ( 200 क्षमता) आहेत. संस्थेमध्ये मुले व मुनी असे एकूण 2000 विद्यार्थी ( निव्हिन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स बेंड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग कॉम्प्युटर टेक्रोलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्रॉलॉजी) तांत्रिक शिक्षण घेतात. आजतागायत संस्थेने जवळपास 25 हजार अभियंते निर्माण केले. त्यापैकी बरेचसे अभियंते हे देशातील व विदेशातील मोठमोठ्या कंपन्या व शासनामध्ये मोठ्या पदावरती कार्यरत आहेत मध्या पुणे येथीन उद्योजक थी मनोज गायकवाड यांच्यासारखे कित्येक उद्योजक या संस्थेने निर्माण केले. संस्थेने तांत्रिक शिक्षणा संदर्भातील महाराष्ट्र राज्य शासनाचा व नरसी मोनजी उत्कृष्ट पॉलीटेक्रिक गौरव मिळवलेला आहे.
दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी या संस्थेच्या प्राचार्यपदी आयआयटी ( बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसी) मध्ये शिकलेले व अधिव्याख्याता विभाग प्रमुख, प्राचार्य व तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य महाय्यक संचालक अशा विविध पदांचा 40 वर्षांचा अनुभव असलेले डॉ. अशोक उपाध्याय हे रुजू आले. संस्थेचा भूतकाळातील गौरव पाहून या संस्थेस भारत देशातील सर्वात नामांकित तंत्रनिकेतन बनवणे असा संकल्प त्यांनी बांधलेला आहे. त्या अनुषंगाने या संस्थेसाठी विद्यार्थ्यांची निवड, निकाल, प्लेसमेंट, संस्थेमधील कैम्पस डेव्हलपमेंट व साफसफाई तसेच गव्हर्नन्स, आणि संस्थेकडून शासनास निर्माण होणारा महसून या पाच मुद्यांच्या वाचतीत डॉ. अशोक उपाध्याय यांनी विशेष असे लक्ष केंद्रित केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम वर्ष प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजेच वीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी स्कूल कनेक्ट या उपक्रमांतर्गत करण्यात आली; संस्थेचा अंतिम वर्षाचा उन्हाळी 2024 बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 95 टक्के पेक्षा जास्त लागना मेकॅनिकल विभागातील दोन विद्याभ्याँची दुबई व जपान येथे अनुक्रमे 9 लाख व 18 नास पॅकेजसाठी निवड ज्ञानी 40 लाख रुपये किमतीची 12 वर्षापासून बंद असलेली सीएनसी मशीन चालू केली; पुरुष अधिकारी व महिला अधिकारी यांवेसाठी दोन गेस्ट हाऊस बालू केले; दोन व्हॉलीबॉल, दोन कवाही आणि दोन खोखो असे सहा नवीन लाल मातीची मैदानी निर्माण केली सदरील मैदानावरती रात्रीमाठी देखील विद्युत व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे संस्थेच्या वेळापत्रकामध्ये दररोज सायंकाळी पाच ते सहा ही वेळ खेळासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक ठेवण्यात आली असून या वेळेमध्ये सर्व विद्याथ्यांकडून विविध प्रकारच्या खेळांचे व योगाचे सराव करून घेतले जातात; नियोजित 1000 वृक्ष लागवडीपैकी 400 वृक्षांचे लागवड पूर्ण झाली असून ऑगस्ट 2025 पर्यंत उर्वरित वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. संस्थेची ही देदीप्यमान वाटचाल पाहून मोलापूरचे मा. जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद व मोलापूरच्या मा.आयुक्त श्रीमती शितल तेली यांनी देखील संस्थेच्या खेहसंमेलन प्रसंगी भेट दिली व संस्थेचा विकामाचा आराखडा पाहुन त्यानी देखील संस्थेला सहळ हाताने शासकीय मदत करण्याचे आधासन दिले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून संस्थेमाठी डिजिटल इक्रिपमेंट माठी 1 कोटी 85 लाख रुपयांची प्रशासकीय मंजूरी मिळाली संस्थेच्या सर्व शाखाचे NBA मानांकनाची प्रक्रिया दि. 29 गतेम्बर रोजी पूर्ण झाली असून त्याचा निकाल दि. 15 ऑक्टोबर पर्यंत अपेक्सीत आहे. संस्थेने एकाच वेळीच सर्वच्या सर्व सहा लाखांचे NBA मानाकनाची प्रक्रिया पार पाडल्यामुळे महाराष्ट्र राज्यात एक नवा इतिहास रचना आहे. सूक्ष्म व लघु उद्योग या केंद्राच्या विभागाकडून 20 कोटीचा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी दिल्ली येथे पाठवलेला
आहे , त्याचे काम अंदाजे येत्या जानेवारीपासून सुरू होईल.
या मंग्वेग येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर नंबर एकचे तत्रनिकेतुन बनवण्याचा संकल्प मस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी श्री कुमार बाशीर्वाद यांचे समवेत घेतलेला आहे 2016 रोजी मंजूर झालेले नवीन शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज बाजू करणे बाबत पाठपुरावा चालू केला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे परिषद आयोजन करण्याचा मानस देखीन प्राचार्याचा आहे; विशेष करून संस्थेच्या ग्रंथालयात स्वातंत्र्य सैनिकांवरती आधारित पुस्तकांचा वेगळा विभाग बनवण्याचे नियोजन चालू आहे: देशाच्या स्वातंत्र्यास 75 वर्ष पूर्ण झाले त्या आठवणीच्या निमित्ताने 75 फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज देखील संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर नावण्याचा संकल्प आहे; त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे संस्थेग जिल्हा नियोजन समितीकडून एक हजार विद्याथ्यांची क्षमता अमणारे ऑडिटोरियम व स्वतंत्र ग्रंथालयाची बिल्डिंग असे दोन प्रस्ताव पाठवण्याचे कामकाज देखील चालू आहे. विशेष म्हणजे सामाजिक बाधिनकी म्हणून मोजापूर जिल्ह्यातील सर्व तंत्रनिकेतनांना एकत्रित पऊन सर्वाच्या परिधमाने गुणवत्तापूर्वक तंत्र शिक्षण देऊन मोलापूर जिल्हा हा भारत देशातील नत्रशिक्षण देणारा सर्वोत्कृष्ट जिल्हा करण्याचे विशेष नियोजन देखील पाचायचि आहे. पाचावत सोलापूर जिल्ह्यातील गर्व नरनिकेतनाच्या प्राचार्याची विशेष बैठक दिनांक 18 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे घेण्यात आती.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




