सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 52

मराठा आरक्षण विरुद्ध एडवोकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
52

भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती, पान- १३७) अशा परिस्थितीत भारतातील भांडवली लोकशाही क्रांतीचा मार्ग खुला करण्यासाठी मंडल आयोगाची संपूर्ण अमलबजावणी तंतोतंत, जलद व सुक्ष्मस्तरावरून होणे गरजेचे आहे. या काटेकोर अमंलबजावणीसाठी लागणारी आकडेवारी व तपशिलातील माहिती जातनिहाय जनगणनाच देऊ शकते. हे काम जातनिहाय जनगणनेतून बिहारने सुरू केले आहे, ते आता लवकरात लवकर देशपाळीवर पोहचले तर भारतातील जात्यंतक भांडवलशाही क्रांती मार्गी लागेल व जुलमी जातीव्यवस्थेतून आपणास कायमची मुक्ती मिळेल. या जातीअंताच्या क्रांतिपर्वाचे नेतृत्व स्टॅलिन, लालु, मुलायम, नितीश हे चार ओबीसी नेते करीत आहेत, ही फार मोठी समाधानाची व आश्वस्त करणारी बाब आहे.

□□□

११. मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष : बेरोजगारीच्या प्रश्नावर पांघरूण घालण्याचे राजकारण संपादक मंडळ, कामगार बिगुल

अस्मितावादाला दूर सारा, रोजगार अधिकाराचा संघर्ष उभा करा ! संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवण्याचे राजकारण जोमाने सुरू असताना आज राज्यातील व देशातील सर्वजातीय युवकांनी, कामगार कष्टकऱ्यांनी गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे की या आंदोलनांच्या मागण्या अर्थहीन आहेत, भरकटवणाऱ्या आहेत. कोणत्याही नवीन आरक्षणाच्या मागणीने आज विशेष काहीही साध्य होणार नाही, वास्तवात, या दोन्ही आंदोलनांच्या माध्यमातून समाजात पसरत असलेल्या बेरोजगारी विरोधातील असंतोषाला भरकटवण्याचे काम आज सर्व प्रमुख भांडवली पक्षांची नेतेमंडळी एकत्र येऊन करत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या उपोषणाची नुकतीच सांगता झाली. फडणवीस, शिंदे व शरद पवारांसहित सर्वपक्षीय नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनाच्या आधारावर २४ डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देऊन हे उपोषण संपले आहे. मधल्या काळात दबाव टिकवण्यासाठी साखळी उपोषणे, सभा यांचे सत्र मात्र चालूच राहणार आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश करावा या मागणीच्या विरोधात १७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे सत्तेत मंत्रीपद उपभोगणारे छगन भुजबळ, भाजपचे वाचाळवीर गोपीचंद पडळकर, कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अशी विविध पक्षीय ओबीसी नेत्यांची आरक्षण बचाव महाएल्गार सभा जालन्यात पार पडली आहे. दोन्ही बाजूंनी शडू ठोकून एकमेकांना आव्हाने दिली जात आहेत. टीकेचा स्तर आता वैयक्तिक झाला असून ‘सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’ इथपर्यंत वैयक्तिक टीका केली जात आहे, तर दुसरीकडे मराठा असल्याचा गर्व दाखवत आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या पुरणार नाहीत’ असे म्हणत तथाकथित खालच्या जातीना हिणवणारे

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button