सोशल

उमेद च्या मागण्या आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र शासनाने मान्य कराव्यात. – व्यंकटराव पनाळे लोकाधिकारप्रमुख

उमेद च्या मागण्या आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र शासनाने मान्य कराव्यात.
– व्यंकटराव पनाळे लोकाधिकारप्रमुख

[gspeech-button]

लातूर :- (प्रतिनिधी) लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसाचे उपोषण आज दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातून या उपोषणासाठी महिला भगिनी व कर्मचारी उपस्थित होते.
या आंदोलकासमोर लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आपले विचार व्यक्त करत असताना उमेद च्या मागण्या रास्ता आहेत. मागील १०-१२ वर्षापासून सेवा देत असलेल्या उमेदच्या कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत कायम समाविष्ट करून घेणे अत्यावश्यक आहे.
शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे असेही आवाहन लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांना याप्रसंगी बोलताना केले.

उमेद महिला व कर्मचारी संघटना लातूरच्या वतीने एकदिवसीय उपोषण करून उमेद कर्मचारी व समुदाय संसाधन महिलांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सुरू आसलेल्या उमेद महारष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत सर्व कर्मचारी व समुदाय संसाधन महिला कर्मचारी संघटनांच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय उपोषण व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

उमेद अभियानास शासनाचा स्वातंत्र्य विभाग म्हणून मान्यता द्यावी , अभियानात कार्यरत कॅडर यांना आशा कार्यकर्ती तसेच अंगणवाडी कार्यकर्ती समकक्ष पदाचा दर्जा देऊन १० हजार पर्यंत मानधनात वाढ करावी. तसेच उमेद कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करावे अशा प्रमुख मागण्या जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

वरील मागण्या संदर्भात उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने यापूर्वी देखील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले होते परंतु शासनाने याबाबत लेखी आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी केलेली नसल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर उमेद कर्मचारी यांच्या वतीने जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आंदोलनाचा कृती कार्यक्रम आराखडा तयार केला असून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
आज लातूर उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या एकदिवसीय आंदोलनात जिल्ह्यातील उमेद अभियानात कार्यरत जिल्ह्यातील सर्व समुदाय संसाधन तसेच सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका तसेच जिल्हा संघटना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button