सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः 12

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः 12
विधी शिकून घेतले. त्यांनी सावखेड येथील पुरोहितशाहीचे वर्चस्व झुगारून स्वतः पुरोहित झाले. आजही या गावात ब्राह्मण पुरोहित वर्ज्य आहे. भाऊराव पाटील यांनी मावसगव्हाण शेजारील लामगव्हाण, धूपखेडा, लोहगाव येथे असंख्य सत्यशोधकी विवाह लावले. अनेक सत्यशोधकी विद्यार्थी तयार केले. गावात खाजगी शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिकविले. तसेच आपल्या मुलांना सत्यशोधक मताचे केले. भाऊराव पाटलांचे नातू आणि पणतूही आज सत्यशोधक आहेत. खऱ्या अर्थाने शास्त्री महाधट हे मावसगव्हाणचे सत्यशोधक गुरू होत. पाच पिढ्यांपासून सत्यशोधक असलेल्या ‘मावसगव्हाण’चा मात्र कुठलाही उल्लेख सत्यशोधक दस्तऐवजात उपलब्ध नाही! असो. कडवे सत्यशोधक भाऊराव रामजी जाधव यांचे १७ नोव्हेंबर १९८५ रोजी निधन झाले.
संदर्भ – १. रमेशराव जनार्दनराव जाधव, मौजे मावसगव्हाण, ता. पैठण, जि. औरंगाबाद (दि. २९/१०/२०११) यांची मुलाखत
जाधव पी. जी.
सत्यशोधक शाहीर जाधव पांडुरंग गेणू ऊर्फ पांडुरंग पैलवान हे मौजे भक्तवडी, ता. कोरेगाव, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत. इ. स. १९५१ च्या सातारा जिल्हा सत्यशोधक परिषदेत त्यांनी सत्यशोधक लेखक जे. बी. लाहिगुडे लिखित एक छोटे प्रहसन सादर केले होते. शाहीर पांडुरंग पैलवानांनी पुढे जे. बी. लाहिगुडे यांच्या ‘ग्यानबाची मेख’ या लोकनाट्याचा पाडळी येथे प्रयोग करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01




