शरण गाथा क्रमशः 14

शरण गाथा क्रमशः 14
चपला घालण्याची आपली लायकी नाही, या कुडलसंगमदेवाच्या पादुका असल्याच सांगत बसवण्णांनी त्या पायात घालण्यास नकार दिला.
हरळय्यांशी भेट ही बसवण्णांच्या आयुष्यातलीच नाही, तर भारताच्या इतिहासाती ही एक महत्त्वाची घटना ठरली. कारण हरळय्यांच्या या चपलांनीच पुढे एका क्रांतीतला जन्म दिला. या भेटीचे वर्णन बसवण्णांच्या प्रत्येक चरित्रात सविस्तर येते. त्या प्रत्येक ठिकाणी या दोघांनी एकमेकांना हात जोडून नम्रपणे नमस्कार केल्याचे नोंदवले आहे. इतिहास म्हणून तेच योग्य आहे. पण माझ्यासारख्या वारकरी विचारांचा प्रभाव असणाऱ्याला उगाच वाटते की, बसवण्णांना बघून हरळय्या त्यांच्या पायाच पडले असतील. त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत बसवण्णाही ‘शरणू शरणार्थी’ म्हणत तेही हरळय्यांच्या पाया पडले असतील. त्यामुळेच ती एक क्रांतिकारक कृती ठरली असावी. त्यामुळेच स्वतःच्या कातडीचे जोडे करून देणे, ही कृतज्ञतेची सर्वकालीन परिसीमा हरळय्यांनी प्रत्यक्षात आणली असावी. ‘रामकृष्णहरी’ म्हणत जात, धर्म, पैसा, प्रतिष्ठा न पाहता एकमेकांच्या पायी लागण्याच्या वारकरी परंपरेची मुळे या ‘शरणू शरणार्थी मध्ये शोधावी लागतात.
इतिहासाच्या संदर्भ साधनात हे पाया पडणे नसले तरी या भेटीने इतिहास घडवलाच. बसवण्णांना पाण्यात पाहणाऱ्या मधुवरस नावाच्या ब्राह्मण मंत्र्याने हरळय्यांनी बनवलेले जोडे पायात घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या अंगाची आगआग होऊ लागली. हरळय्यांच्या मोरीतल्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर ती बरी झाली. त्यामुळे सगळा अहंकार गळून पडला आणि मधुवरस बसवण्णांच्या विचारांचे अनुयायी म्हणजे शरण बनले. शरण म्हणजे इथल्या भाषेत संतच. अशावेळेस तुकोबारायांचे शिष्य रामेश्वरभट्ट वाघोलीकर आठवतात. जातीच्या अहंकारामुळे रामेश्वरभट्ट तुकोबांचा द्वेष करायचे. त्यामुळे फकीर अनगडशहा बाबांनी त्यांना अंगाचा दाह होण्याचा शाप दिला. त्यानंतर रामेश्वरभट्ट आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर धरणं धरून बसले. शेवटी माऊलींनीच आपण आणि तुकोबा एक असल्याचे सांगितले. रामेश्वरभट्टांचा जातद्वेष संपला आणि ते सगळी जगरहाटी तोडून तुकोबांना आपला गुरू मानू लागले. शरण होण्यासाठी किंवा वारकरी होण्यासाठी ‘डिकास्ट’ होणे ही पूर्वअट होती आणि आजही आहे. त्याशिवाय बसवण्णांचे किंवा तुकोबारायांचेही होताच येत नाही.
मधुवरस ‘डिकास्ट’ होऊन बसवण्णांचे झाले. बसवण्णांप्रती त्यांची निष्ठा इतकी होती की त्यांनी आपली मुलगी कलावतीचं लग्न हरळय्यांचा मुलगा शीलवंत याच्याशी लावून दिले. परिणामी आक्रीत घडलं. वर्णाश्रमधर्म बुडवल्याच्या आरोपात हरळय्या,
२० । शरणगाथा
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01




