माळी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत संपन्न,!
सपकाळ यांच्या अध्यक्षते मध्ये काँग्रेसच्या टिळक भवन दादर मुंबई कार्यालयात महाराष्ट्रातील प्रमुख माळी समाजाच्या नेत्यांची बैठक संपन्न !..
माळी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत संपन्न,!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील माळी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत संपन्न !
!सपकाळ यांच्या अध्यक्षते मध्ये काँग्रेसच्या टिळक भवन दादर मुंबई कार्यालयात महाराष्ट्रातील प्रमुख माळी समाजाच्या नेत्यांची बैठक संपन्न
बैठकीमध्ये प्रामुख्याने माजी आमदार दिप्ती ताई चवधरी यांनी काँग्रेस मधील माळी समाजावर अन्याय झाल्याची खंत अध्यक्षांना बोलून दाखविली माळी समाजाचे नेते काँग्रेस मधील एकेक करून कमी झाले माळी समाजाचे नेतृत्व एकेकाळी काँग्रेसमध्ये नेतृत्व करत होते आज काँग्रेस मधील माळी समाज नेतृत्व हीन झालेला आहे काँग्रेसने माळी समाजाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने जात निहाय जनगणनेचा कायदा रद्द केला आणि एससी एसटी फक्त जातनिहाय जनगणना केली ओबीसींची जातनिहाय जनगणना केली नाही त्यामुळे काँग्रेसवर बरीच टीका इतर पक्षातून केली जाते नाना पटोले साहेबांनी सभापती असताना जातनिहाय जनगणनेचा ठराव मांडला परंतु प्रत्यक्षात बजेट न दिल्यामुळे जात निहाय जनगणना आपलं सरकार असून झाली नाही काँग्रेसचे सरकार 55 60 वर्षे केंद्रात आणि राज्यात असून सुद्धा जात निहाय जनगणना झाली नाही ओबीसीकडे दुर्लक्ष झाले यामुळे ओबीसींचा विश्वास काँग्रेस पक्षामध्ये कमी झाला ओबीसींचे नेते इतर पक्षांमध्ये गेले ओबीसींच्या मतदाराचा ओघ इतर पक्षांमध्ये गेला महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष ज्यावेळेला चालू झाला त्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे फक्त एका एल्गार सभेला विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार आले होते सभा चालू असतानाच विजय वडेट्टीवार यांना पवार साहेबांचा फोन आला आणि ते पवार साहेबाकडे बारामती ला गेले त्यानंतर ते कोणत्याही ओबीसी एल्गार मेळाव्यांना उपस्थित राहिले नाही त्यामुळे ओबीसी समाज काँग्रेस पासून दूर गेला नाराज झाला ओबीसी नेत्याना प्रस्थापीतनेत्यानी – दब वा खाली ठेवले काँग्रेस पक्षाने आज पर्यंत ज्या समाजाला जेवढे दिल तेवढं जर ओबीसी समाजाला दिलं असतं तर काँग्रेस या देशात नेहमीच 400 च्या वर खासदार आणि महाराष्ट्रामध्ये 200 च्या वर आमदार घेऊन विजयी झाली असती आता ज्या सामाजाला क्रॅ भ्रेसन मोठ केल ते सर्व स्वताला वाचवण्य साठी कॉंग्रेस ल्या विरोधात काम करू लागले
काँग्रेसच्या ताब्यामध्ये अनेक राज्य आहेत त्या राज्याने जात निहाय जनगणना केलेली आहे ती पूर्णपणे जाहीर केलेली नाही ती तेलंगणा सारखी जाहीर केली पाहिजे आणि ओबीसींचा विश्वास संपादन केला पाहिजे माळी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सावता महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले नारायण मेघाजी लोखंडे देशातील पहिले साखर कारखानदार गोपाळराव गिरमे यांचे स्मारक त्यांचा इतिहास त्यांचा गुणगौरव काँग्रेस पक्षाकडून आज पर्यंत मोठ्या प्रमाणात झाला नाही तोच विषय अस्मितेचा बनवून बीजेपी ने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे माळी समाज आणि ओबीसी समाज काँग्रेस पासून दुरावला आहे आत्तापासूनच आपण जर प्रयत्न केले आणि जातनिहाय जनगणना करून या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण 27% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी ठाम भूमिका काँग्रेसने मांडावी त्याचबरोबर कमीत कमी कालावधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात ज्या ठिकाणी आरक्षण नसेल त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने 1931 च्या जनगणनेचा आधार घेऊन त्या त्या समाजाला त्यांचे त्यांचे नेतृत्व दिले पाहिजे कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 ला पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करण्याचे आवाहन इंग्रज सरकारना केले आणि त्यांनी पुढे ती काँग्रेस काळातच देश स्वतंत्र झाल्यानंतर बंद झाली ती पूर्ववत करण्यासाठी आंदोलन उभे करावे इत्यादी मागण्या शंकराव लिंगे केल्या महाराष्ट्रातला जातिवाद कमी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा काढून जातिवाद कमी करण्यास सुरुवात केल्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन ही शंकराव लिंगे यांनी केले
अनेक माळी समाजाच्या नेत्याने अनेक प्रश्न मांडले त्याप्रमाणे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ओबीसी माळी धनगर वंजारी बारा बलुतेदार भटक्या जमातींना योग्य तो वाटा दिला जाईल त्यासाठी प्रत्येकाने काँग्रेसमध्ये सामील होऊन प्रतिनिधित्व केले पाहिजे महाराष्ट्रात जो जातिवाद मोठ्या प्रमाणात होत आहे तो समूळ उपटून काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्याची सुरुवात म्हणून प्रथम 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती ला फुलेवाडा पुणे येथून सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्रात 11 एप्रिल ज्या ज्या ठिकाणी माळी समाज असेल त्या त्या ठिकाणी बैठका घेऊन त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल असे आश्वासन ही अध्यक्षांनी दिले
- बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी म्हाडा सभापती किशोर कन्हेरे, माजी आमदार दिप्तीताई चवधरी, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, जेष्ठ ओबीसी नेते अखिल भारतीय माळी महासंघ संस्थापक अध्यक्ष शंकरराव लिंगे, अविनाश उमरकर, संजय ठाकरे, नंदकिशोर नगरकर, प्रकाश तायडे, डॉ सदानंद धनोकार, महेश गणगणे, अजय तायडे, प्रा. गजानन खरात, विजयराव महाजन, तुकाराम माळी, प्रशांत सुरसे, सुरेंद्र उगले, प्रमोदभाऊ चिंचोळकर, गणेश राऊत बिड, नीलेश हाडोळे, सुनील शिंदे, शशांक केंढे, अशोक इंगळेर, गणेश माळी आदी प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. अशी माहिती दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिली#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात #हर्षवर्धन सपकाळ #प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष #किशोर कनेरे #दीप्ती ताई चवधरी #काँग्रेस प्रेमी माळी समाज
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


