सोशल

सावित्रीबाई फुले यांच्या 127 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! सत्यशोधक शंकरराव लिंगे

सावित्रीबाई फुले यांच्या 127 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

सत्यशोधक शंकरराव लिंगे

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी झाला ते नायगावचे सरप होते त्यांचा विवाह नव्या वर्षी पुण्यातील ज्योतिराव फुले यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी महात्मा फुले यांच्या इच्छेनुसार सगुनाबाई शिरसागर यांच्या नेतृत्वात शिक्षण घेण्यास सुरुवात केली

अहमदनगर येथील मशिनरी स्कूलमध्ये त्यांनी प्रशिक्षित शिक्षिकेचे ट्रेनिंग घेतले आणि त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका झाल्या एक जानेवारी 1848 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली भिडेवाडीतील या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी अध्यापनाचे काम चालू केलं आणि त्या शाळेच्या मुख्य अध्यापिका होत्या या घटनेस आज 175 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी 52 कशी व काव्य फुले असे त्यांचे दोन कवितासंग्रह आहेत आद्य कवियत्री आहेत

ज्यांना आपण पहिले कवी म्हणतो त्यांचा जन्म हा कवितासंग्रह लिहिल्यानंतर दहा वर्षांनी झालेला आहेत्या साहित्यिक होत्या निबंधक होत्या एक सामाजिक शिक्षक म्हणून त्या उत्तमरीत्या मुलींना शिकवण्याचं काम करीत होत्या त्यांच्यावर पुण्यातील सनातनी लोक शिकवण्यासाठी जाताना येताना दगड माती शेंन गोळे फेकून त्यांचा अपमान करीत होते तरीसुद्धा त्या घाबरत नव्हत्या एक साडी बरोबर जादा घेऊन जात होत्या आणि शाळेत गेल्यानंतर चिखल माती धोंडे यामुळे घाण झालेली साडी बदलून त्या आपलं शिक्षणाचे काम चालू ठेवीत होत्या

त्या धाडसी होत्या एकदा एका धतींग याने त्यांना शाळेत जात असताना अडविले हात धरला त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी त्याच्या गालात एक चमाटा मारला तो इतका जोरात होता की तो जवळपास थांबला सुद्धा नाही म्हणजे सावित्रीबाई फुले निर्भीड धाडसी आणि लढाऊ होत्या त्या आपल्या गंजपेढीतील वाड्यामध्ये महिलांसाठी रात्रीच्या शाळा चालविल्या महिला संघटन केलं कुटीर उद्योगाचे प्रशिक्षण त्या महिलांना दिलं फुले वाड्यामध्ये विधवा संगोपन बालहत्या प्रतिबंधक ग्रह बाळंतपण करण्याचं काम इत्यादी सामाजिक काम त्यांनी चालू ठेवलं त्यावेळी हंटर कमिशन ला त्जे निवेदन दिलं होतं

त्या निवेदनामध्ये मुलांची गळती मुलींची गळती त्यासाठी उपाय बहुजनांची मुलं मुली कशी शिकतील त्यासाठी कॉलरशिप बालमजुरी पासून पर्याय म्हणून त्यांना स्कॉलरशिप मध्यान भोजन शालेय साहित्य कपडे आणि बहुजन समाजातील गरीब मुला-मुलींना शिक्षण भत्ता पगार चालू करण्याची शिफारस वयाच्या 14 वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावं त्यांना प्राथमिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण द्यावे इत्यादी शिफारशी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना सांगितल्या होत्यात्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी मांडल्या

इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळेचा आणि त्यांचा सत्कारही विश्रामबाग वाडा येथे केला होता त्यांनी ज्या वेळेला पहिल्यांदा मुलींची परीक्षा घेतली त्यावेळेला परीक्षेतील मुलींना पाहण्यासाठी तीन हजार लोकांनी गर्दी केली होती 1876 ला पुण्यामध्ये भीषण दुष्काळा आला त्यावेळी धनकवडी येथे अन्नक्षेत्र उघडून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः स्वयंपाक करून अन्नधान्य गोळा करून अन्नदान क्षेत्र चालू केलं विधवा महिलांचे केस कापून त्यांना विद्रूप करणे याविरुद्ध सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी पुणे आणि मुंबईमध्ये नाभिक समाजाचा ऐतिहासिक संप घडवून आणला याची नोंद लंडन टाइम्स ने घेतली होती 28 नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन झालं समाजातील भावकीने महात्मा फुले यांचा अग्निसंस्कार करण्यासाठी शिकारी धरण्यासाठी नकार दिला

त्यावेळेला इतिहासामध्ये पहिल्यांदा एक महिला सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांची टिटविधरली महात्मा फुले यांना वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अग्नी दिला महात्मा फुले यांच्या निधनानंतर महात्मा फुले यांनी पॅरलेस झाल्यानंतर डाव्या हाताने लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ छापून 1891 ला जुन्नर येथे प्रकाशित केला सावित्रीबाई फुले या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा झाल्या महात्मा फुले यांच्यानंतर त्यांनी सात वर्ष अध्यक्ष पद भूषवलं अनेक सभा मिळावे घेतले अध्यक्ष स्थानावरून भाषण केले 1892 ला मुंबईमध्ये मोठी हिंदू मुस्लिम जातीय दंगल उसळली होती त्या दंगलीमध्ये बहुजनांचं अतोनात नुकसान होत होतं त्यासाठी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या कामगार संघटनेच्या मार्फत मुंबईतील कामगार वस्तीमध्ये जाऊन झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन सर्व समाजाची जागृती करून भायखळा येथे साठ हजार लोकांची सभा घेतली

त्यावेळेला मुंबईची लोकसंख्या सहा लाख होती आणि दंगल अटोक्यात आणली दंगलीमुळे कोणाचा आणि कसं नुकसान होतं हे पटवून दिल जातीय सलोखा भाईचारा निर्माण केला सावित्रीबाई फुले यांनी केलेले हे महान कार्य मुंबईमध्ये नंतर शंभर वर्षे दंगल झाली नाही हा इतिहास आहे1896 ला पहिल्यांदा मुंबईमध्ये साथीचा रोग आला त्यावेळेला सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दवाखाने उघडून साथीचा रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये साथीच्या रोगाची लागण होऊन आठ फेब्रुवारी 1897 ला नारायण मेघाजी लोखंडे यांचे निधन झालं त्यानंतर पुण्यामध्ये अशी सात परत 1897 ला आली पुण्यातील सर्व मोठी नेतेमंडळी गाव सोडून गेले होती कोणी कोणाला छातीमध्ये कसलीही मदत करत नव्हते रोग आटोक्यात आटोक्यात आणण्यासाठी आपला दत्तक पुत्र यशवंत जो मिलिटरी मध्ये डॉक्टर होता त्याला बोलवून घेतलं आणि हडपसर येथील ससाने नगर मध्ये आरोग्य कॅम्प उघडला आणि त्या कॅम्पमध्ये सावित्रीबाई फुले यांनी हडपसर आणि आसपासच्या भागातील साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी त्यांची तपासणी औषध उपचार करून रोगमुक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक दलिताचा मुलगा पांडुरंग गायकवाड याला त्यांनी आपल्याजवळ असलेल्या चादरीमध्ये गुंडाळून पाठीवर घेऊन ससाणे नगर येथील वैद्यकीय कॅम्प मध्ये आणले आणि त्याचीच या साथीच्या रोगाची लागण सावित्रीबाई फुले यांना झाली आणि दलितांची सेवा करत करत सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च 1897 ला प्लेगच्या साथीमुळे लेगाची लागण झाल्यामुळे त्यांचा देहअंत झाला. अशा या महान सामाजिक क्रांतीकारक क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुले यांनी चालवलेली पहिली शाळा तो भिडेवाडा आज अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे तो आता शासनाने ताब्यात घेतलेला आहे त्यावर अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अनेक संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नाने 100 कोटीचा निधी राखून ठेवला आहे प्रत्यक्ष मध्ये सावित्रीबाई फुले यांचे स्मारक अजून व्हायचे आहे

ते व्हावे ही शासनास नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुणे विद्यापीठाचा नाम विस्तार करीत असता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नाम विस्तार करण्यात आला परंतु या विद्यापीठाचा लोगो हा विषय मतेचे प्रतिक शनिवार वाडा आहे तो त्वरित हटवून त्या ठिकाणी फुले वाडा हा लोगो बोधचिन्ह म्हणून वापरावा सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव या ठिकाणी त्यांचे स्मारक आहे जन्मगाव जन्मस्थळ स्मारक म्हणून शासनाने अधिकृत करून सुशोभित केले आहे याच नायगाव मध्ये सावित्रीबाई फुले सृष्टी जागतिक पातळीवरची करावी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना मरणोत्तर जागतिक दर्जाचा पुरस्कार द्यावा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे मुंबईत फार मोठे काम आहे त्यामुळे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईत व्हावे प्रत्येक गावामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा शासनाने बसवावा सावित्रीबाई फुले यांनी हंटर कमिशन ला सुचविलेल्या सूचनाचा फिलॉसॉफीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रम बनवावा इत्यादी मागण्या मान्य कराव्यात आणि प्रत्यक्षात कृती करावी बहुजनांचे कुलदैवत म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे लग्न झालेल्या जोडप्याने जाऊन दर्शन घेऊन त्यांचे कार्य अंगीकृत करावे सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी 3 जानेवारी जन्मदिनी व दहा मार्च रोजी स्मृति दिनानिमित्त नायगाव ला भेट देऊन अभिवादन करावे अशी मागणी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केली आहे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button