मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. त्यातच आता ओबीसी बांधवांकडूनही अंतरवालीत उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. गनिमी काव्यानं अंतरवालीत जात शिंगारे वस्तीत मंगेश सासनेंसह सहा जण उपोषणाला बसले आहेत. सरकार अंतरवालीला रेड कार्पेट देतं असं म्हणत हे उपोषण सुरू केलं आहे. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी ओबीसी बांधवांनी केलीय. ओबीसींनी सुरू केलेल्या उपोषणामुळे जरांगेंच्या आंदोलनामुळे अडचणी वाढू शकतात. यामुळे अंतरवालीत दोन समाजात संघर्ष झाल्यास तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
ओबीसी बांधवांकडून उपोषणाचं हत्यार उपसण्यात आलं. आता पुन्हा एकदा मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण होऊ शकतो. अंतरवालीत उपोषणाला बसलेल्या ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांनी सांगितलं की, सरकार अंतरवाली सराटीला रेड कार्पेट देतं. त्यांचा लाड करतं. सगळे अधिकारी मंत्री अंतरवाली सराटीत येतात. त्यामुळेच आम्ही अंतरवाली सराटीत बसलोय.
मराठा समाजाला आरक्षण देताना सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. याच मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होऊ नये. बोगस कुणबी दाखले रद्द करण्यात यावेत यासह अनेक मागण्यांसाठी अंतरवालीत ओबीसी समाजानं आंदोलन सुरू केलंय. महाराष्ट्रातील सर्व भटक्या विमुक्त जाती जमाती बारा बलु दार ओबीसी यांनी अंतरवाली सराटीच्या दिशेने अधिकच करा आणि आंदोलनाला सर्व प्रकारचे सहकार्य करा प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावर प्रचार चालू करा

