सोशल

शरण गाथा क्रमशा.7

दिसतात. गोरोबा काका कुंभारांच्या घरी चिखल तुडविणारा पांडुरंग आपल्याला माहिती असतो, गोरोबा काकांपूर्वी सुम ारे २०० वर्षे गुंडय्या कुंभारांच्या घरी शिव चिखल तुडवून गेल्याची कथा आहे. रानात शेळ्या राखणाऱ्या गोल्लाळेशांना शेळ्यांच्या लेंड्यात देव दिसतो तसाच संतश्रेष्ठ सावतोबांना कांदा, मुळ्यात देव दिसतो. मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांनी कोठार रिकामे केल्याच्या कीर्तनात ऐकलेल्या कथा तिथून जवळच असलेल्या गुड्डापुरात दानम्मा दातृत्त्वाशी नाते सांगतात. ज्ञानोबाराया रेड्याच्या मुखातून वेद वदविण्यापूर्वी हाविनाळ कल्लय्यांच्या कुत्र्याच्या मुखातून वेदपठण झालेले असते. असे अनेक साम्यस्थळ आणि पुनरावृत्ती आपल्याला शरण परंपरा आणि वारकरी संतपरंपरेत दिसतील. नामदेवराय, तुकाराम महाराजांच्या अभंगात महात्मा बसवण्णा आणि शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या वचनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येते. दुसरीकडे नाथबाबा, एकनाथ महाराजांची भारूडं, अल्लमप्रभुदेव आणि इतर शरणांच्या कूट वचनांशी नातं सांगतात. (बेडगिन वचनगळु) अल्लमप्रभूची मंदिरे दूर मराठवाड्यातही आहेत. शरणांची स्मारके संपूर्ण देशात सापडतात. अशी साम्य स्थळं हजारोंच्या संख्येने आपल्या झोळीत येतील. आपण त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत इतकेच.

राजकारणात इतिहासाला शून्य तर धर्मकारणात दोनशे व त्याहून जास्त मार्क असतात, असे म्हटले जाते. कारण धर्मकारणात इतिहास हवा तसा वाकवता येतो. वाकवला जातो. जुन्या घटनांचे, जुन्या संदर्भाचे नव्याने अर्थ सांगितले जातात. बऱ्याच वेळा सांगणाऱ्यांच्या अजेंडानुसार हे सगळं ठरतं. तर दुसरीकडे राजकारणात मात्र अगदी कालपर्यंतचा इतिहास सोयीस्करपणे विसरला जातो. राजकारणात आजला महत्त्व आहे आणि उद्याही. काल तितकेसे महत्त्वाचे नाही. म्हणूनच गेल्या दशकात भारतीय राजकारणाचा बदललेला पोत आणि पक्षांतराचे झालेले उदात्तीकरण पाहता त्यांच्या इतिहासात वा भूतकाळात कोणालाही रस नसल्याचे दिसते. सगळ्यांच्या नजरा आजवर आणि उद्या मिळणाऱ्या सत्तेवर आहेत. त्यामुळेच इतिहासातील अनेक घटनांचे नव्याने मांडला जाणारा अन्वयार्थ म्हणूनच धोकादायक आहे.

पत्रकार आणि पत्रकारितेच्या अध्यापनात असल्याने ‘चिकित्सक अभ्यास’

हा माझा पिंड. माझी अध्यापकीय शैली नाही. सोपे शब्द आणि सरळ वाक्ये हे

पत्रकारितेचे बलस्थान असल्याने इतरांपेक्षा सोप्या भाषेत आपण शरणांच्या कथा हा

सांगू शकतो, हा विश्वास होता. आजपर्यंत केलेल्या वेगवेगळ्या रिपोर्टस्चा अनुभव
१३। शरणगाथा…7

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button