मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

संपादकीय
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या महाराष्ट्रात ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ चर्चेचा विषय ठरला आहे. मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी लावून धरल्यामुळे हे आंदोलन पेट घेत गेले. त्यानिमित्ताने क्रिया- प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप, सभा प्रतिसभा मोठ्या प्रमाणात होत आहेत
आणि त्याचे पडसाद सर्वच क्षेत्रात उमटत आहेत. ओबीसी प्रवर्गात सामील असणाऱ्या जातींनी मराठ्यांच्या आरक्षण मागणीला आपला विरोध दर्शविला आहे. ओबीसींचे राजकीय नेते म्हणवून घेणारे छगन भुजबळ ओबीसींच्या बाजूने उतरले आहेत. या मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ अशी महाराष्ट्रात दुही निर्माण झाली आहे. ही दुही निर्माण करण्यात अनेकांनी भूमिका अदा केली. या निमित्ताने घडलेल्या घटनाक्रमाने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेला आहे. तसेच आंदोलनाचे तात्कालिक व दुरगामी परिणाम म्हणजे जातीवादी शक्ती त्यांचा स्वार्थ साधून घेण्यात यशस्वी होत आहेत.
मराठा जातीच्या ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीस आतापर्यंत वेगवेगळ्या नऊ आयोगांनी नकार दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही मराठ्यांना आरक्षण देण्याचे नाकारले आहे. त्यामुळे मराठे सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा दावा टिकत नाही. मंडल आयोगाने मागास असण्यासाठी ज्या कसोट्या वापरल्या त्यामध्येही मराठा जात बसत नाही. म्हणजेच ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही मराठ्यांची मागणी मंडल आयोगाच्या निकषांना नाकारणारी ठरते.
मराठा जातीला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यास सकल ओबीसी प्रवर्गाचा विरोध नाही. ओबीसी समूहाने मराठ्यांना ओबीसी कोट्याच्या बाहेर आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेतलेली आढळते. सरकारमधील अनेक मंत्रीही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना न्यायालयात टिकणार आरक्षण देणार असे म्हणतात. परंतु ते कसे देणार हे अजून त्यांना स्वतःलाच स्पष्ट झाले आहे असे दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने एक समिती गठीत करून तिला मराठ्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी शोधण्यास सांगितले आहे. त्यानुसार समितीने अशा नोंदी शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. समितीने शोधलेल्या नोंदीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. परंतु त्यांकडे दुर्लक्ष करून अनेक मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र वाटले जात आहेत.
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐🟡🟡🟡🟡
क्रमशः भाग पहिला
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
७३८७ ३७७८ ०१




