एसटी मधून आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात अमरण उपोषण! एक जण चक्कर येऊन पडला 16 सप्टेंबर 2024 पासून आंदोलनाचीतीव्रता वाढणार “!!

एसटी मधून आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात अमरण उपोषण!
एक जण चक्कर येऊन पडला 16 सप्टेंबर 2024 पासून आंदोलनाचीतीव्रता वाढणार “!!

देश स्वतंत्र झाल्यापासून धनगर आणि धनगड एकच असल्याचे दिसून येते त्यामुळे धनगड एसटीमध्ये आरक्षण आहे धनगरांना नाही महाराष्ट्रात एनटी आणि देशात ओबीसी आरक्षण आहे रेणके आयोगाने सुद्धा वीस वर्षांपूर्वी रिपोर्ट दिला होता धनगरांना भटक्यांना भटक्या विमुक्त जाती जमातींना एसटीच्या सवलती दिल्या पाहिजेत आजी भटक्या विमुक्त जाती जमातींची अवस्था अत्यंत बिकट आहे बऱ्याच लोकांना राहण्यासाठी घर नाही जागा नाही शिक्षण नाही नोकरी नाही रेशन कार्ड नाही ओळखपत्र नाही जातीचा दाखला नाही आधार कार्ड नाही शासनाच्या कोणत्याही सवलती मिळत नाहीत या समाजाची दयनीय अवस्था आहे त्यामुळे ही मागणी जोर धरू लागली आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून महाराष्ट्रातील धनगर समाजाची एकमेव मागणी आहे एसटी मधून आरक्षण द्या अनेक मुख्यमंत्र्यांनी यांना आश्वासन दिलेले आहे
मात्र कोणीच पूर्ण केलं नाही त्याचा जास्तीत जास्त राग हा फडणवीस युती सरकारवर आहे गेल्या पाच दिवसापासून धनगर समाजाचे सहा जन माऊली हरणवर पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक बोरुडे जालना यशवंत अण्णा गायकी बीड गणेश जी केसकर सातारा अहिल्यानगरहून एक विजयजी कम्मल सहा जण मल्हार योद्धे उपोषणास बसले आहेत त्यापैकी योगेश धरम एकाची तब्येत खालावलेली आहे चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले आहे परिस्थितीच चीगळण्याच्या अगोदरच 70-80 जणांचे महाराष्ट्रातील एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवले आहे
15 सप्टेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथी ग्रहावर मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक झाली त्यामध्ये समिती नेमून धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण कसे देते येतील त्याचा मसुदा लवकरच तीन चार दिवसात तयार होईल त्यानंतर आरक्षण देण्याचा विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे हा प्रस्ताव उपोषण कर्त्यांना समाजाला मान्य नाही सोमवार दिनांक 16 सप्टेंबर पासून याची तीव्रता वाढणार आहे आंदोलन उग्ररूप धारण करणार आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आज अनेकांची भाषणे झाली त्यामध्ये महत्त्वाचं भाषण जे होतं ते धनगर समाजाचे नेते माळशिरस तालुक्याचे भावी आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये लोकसभेला प्रवेश केलेले
फडणवीस साहेब यांना चॅलेंज करून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार निंबाळकर यांचा पराजय करून धैर्यशील मोहिते पाटील यांना आणि अजित दादांना चॅलेंज करून सुप्रियाताई सुळे यांना बारामतीतून निवडून अन्यायामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते पूर्वीचे मोहिते पाटलाचे कट्टर विरोधक आजचे कट्टर समर्थक उत्तमरावजी जानकर यांचे भाषण आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली त्यामध्ये त्यांनी या युती सरकारवर नाराजी व्यक्त केली आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ संघटित झालं पाहिजे असं सांगितलं
आता महाराष्ट्रामध्ये तीन समाजाचे उपोषण आंदोलन चालू आहे त्यामध्ये मराठा समाजाचे अंतरवाली सराटी दोन नाभिक समाजाचे सांगोला आणि आझाद मैदानावर होणार आहे ओबीसी समाजाच आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे आणि आता धनगर समाजाचे उपोषण आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार असे चित्र दिसत आहे निवडणुक तोंडावर आहे सर्वांचे समाधान करणे शिंदे सरकारला शक्य नाही तरीसुद्धा कोणत्याही मार्गाने कसलेही जीआर काढून हे सरकार डॅमेज कंट्रोल करण्याच्या मनस्थिती मध्ये आहे मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलाव नयाच्या तयारीत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये 17 याचिका आहेत याची सुनावणी सुद्धा धिम्या गतीने कोर्ट चालवत आहे 15 15 दिवसाची तारीख मिळत आहे
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चालढकल करून निवडणुकीच्या नंतर निकाल लागण्याची शक्यता आहे 25 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी आहे विनाकारण आरक्षण हा मुद्दा युती सरकारने गुंतागुंतीचा केलेला आहे यामध्ये भारत सरकारने लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे जातनिहाय जनगणना करून 340 341 342 कलमाप्रमाणे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी देऊन सर्व समाजाला समान न्याय दिला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना केजी ते पीजी शिक्षण मोफत दवाखान्याचे राष्ट्रीयकरण करून सर्वांना आरोग्य सुविधा मोफत शेतकऱ्यांना पाणी वीज खते बी बियाणे मोफत बिगरव्याची कर्जपुरवठा केला पाहिजे शेतीमालास हमीभाव स्वामीनाथन आयोगणि केलेल्या शिफारशी प्रमाणे दिला पाहिजे अग्निवीर सैन्य भरती बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती केली पाहिजे पूर्वीप्रमाणे पेन्शन दिली पाहिजे सरकारी उद्योगाच खाजगीकरण थांबविले पाहिजे खाजगी उद्योगांमध्ये आरक्षण शक्तीचे केले पाहिजे मागेल त्याला काम आणि योग्य दाम दिले पाहिजे
सर्व लाडक्या मोफत योजना बंद केल्या पाहिजेत विकर विधवा अपंग अनाथांना मदत केली पाहिजे श्रेणी एक आणि श्रेणी चार मधील पगाराची तफावत कमी करून श्रेणी चारच्या दुप्पट श्रेणी एकला पगार केला पाहिजे त्यापेक्षा जास्त असू नये जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक निधी ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय: नोकऱ्या मध्ये आरक्षण दिले पाहिजे तरच आरक्षणाची तीव्रता कमी होऊ शकते सर्व समाज एकत्रित राहू शकतात देशाची प्रगती होऊ शकते जातिवाद होणार नाही दंगली जाळपोळ होणार नाही गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल प्रत्यक्ष पाहणी स्पेशल रिपोर्ट दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा



