सोशल

माननीय सुशीलकुमार जी शिंदे साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे सोलापुरात आयोजन!

माननीय सुशीलकुमार जी शिंदे साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे सोलापुरात आयोजन!

डॉ. निर्मलकुमार फडकुले सिद्धेश्वर मंदिराजवळील सभागृह सोलापुरात
४ सप्टेंबर २०२४ रोजी भारताचे माजी गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार श्री रामदास फुटाणे यांचा” भारत कधी कधी माझा देश आहे” हा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. श्री रामदास फुटाणे यांच्या कार्यक्रमास ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम सोलापुरात झाला होता अतिशय लोकप्रिय कार्यक्रमास महाराष्ट्रात भरपूर दाद आजही मिळतो आहे.

त्याचबरोबर सोलापुरातील युवा गायक पीयुष आवारे यांचा भक्तीगीत, नाटयगीत व भावगीतांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पीयुष हा गोड गळ्याचा विविध गाण्याबरोबर शास्त्रीय गायनाचा त्याचा सत्संग आहे. महाराष्ट्रातल्या सारेगमप यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. हे दोन्ही कार्यक्रम बुधवार दि. ४/९/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता फडकुले सभागृहात आयोजित केला आहे.

दि. ४,५, व ६ संप्टेबर रोजी भव्य ग्रंथोउत्सव शाहीर अमर शेख कलादालनात सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत भव्य प्रमाणात आयोजित केले आहे. तरी याचा सर्व रसिक वाचकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे
माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचा जन्म 4 सप्टेंबर 19 40 सोलापुरातील एका दलित कुटुंबामध्ये झाला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुशील कुमार शिंदे साहेब यांनी गुड्डी का बाल विकून रात्रीच्या शाळेमध्ये आपले शिक्षण घेतले सुरुवातीला कोर्टामध्ये पट्टे वाल्याची नोकरी करून पुढील शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पोलीस खात्यामध्ये इन्स्पेक्टर झाले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सानिध्यात आल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर ची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला सुरुवातीला करमाळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सलग नऊ वर्ष महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला 1977 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून क्लोज मध्ये प्रवेश केला 1985 ला परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ओपन जागेवर ते लोकसभेला ही निवडून आले काँग्रेसमध्ये ते राष्ट्रीय महासचिव पदावरही कार्यरत कार्यरत होते 2003-4 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2004 ला आंध्र प्रदेशचे राज्यपाल झाले त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ऊर्जामंत्री देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारून देश सेवा केली आहे त्यांची मुलगी कुमारी प्रणिती ताई शिंदे याही आमदार झाल्या 2024 च्या निवडणुकीमध्ये प्रणिता ताई शिंदे या सोलापूरच्या खासदार झाल्या आहेत शिंदे साहेब यांना राजकारणाबरोबर वाचनाचा लेखनाचा नाटकाचा सर्वांगीण असा त्यांचा व्यासंग होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सामुदायिक विवाह अनुदान देण्यास सुरुवात केली आणि बघता बघता महाराष्ट्रामध्ये सामुदायिक व विवाहाची प्रतिष्ठा वाढली लोकांचा वेळ पैसा वाचला महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांना प्रथमच शिष्यवृत्ती लागू केली

त्यासाठी त्यांनी आर्थिक बजेट दिले सोलापूरमध्ये पावर ग्रिड एनटीपीसी प्रोजेक्ट सुशील कुमार शिंदे यांच्या ऊर्जामंत्री काळात झाला शिंदे साहेब अर्थमंत्री असताना सोलापूरला पिण्याच्या पाण्याची 100 किलोमीटर उजनी ते सोलापूर पाईपलाईन झाली अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना केली एम एम आर डी मार्फत सोलापुरातील रिंग रोड फोर लाईन विद्युतीकरण सुशोभीकरण केले पंधराशे एकरात चिंचोली एमआयडीसीची निर्मिती करून विविध उद्योगांना पुरेशी जागा 24 तास वीज पाणी सोयी सवलती उद्योगाला चालना दिली 10000 बिडी कामगारासाठी घरकुल बांधून दिले त्यांच्याच काळात रेल्वेचे दुहेरीकरण विद्युतीकरण करण्यास सुरुवात झाली त्यांच्यासारखं कोणत्याही खासदाराने सोलापूर साठी आजपर्यंत काम केलं नाही दोन वेळा ते खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले त्यामुळे सोलापूरचे खूप नुकसान झाले सोलापूरच्या विमानतळासाठी मोठी जागा खरेदी केलेली आहे (काँग्रेसचे सरकार गेल्यामुळे विमानतळ होऊ शकले नाही )इत्यादी अनेक कामे सुशीलकुमार जी शिंदे साहेब यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली आहेत त्याच्या विवेचन थोडक्यात करता येणार नाही एका दलित घरामध्ये जन्म घेऊन सोलापूरच्या सुपुत्राने आयुष्यामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय सुशील कुमार शिंदे साहेब तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार 84 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा‍ शुभेच्छु.
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button