सोशल

आज नवी मुंबई येथे महात्मा फुले सोसायटीच्या वाशी शाखेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सौ भुजबळ मॅडम आणि त्यांचे चिरंजीव कुमार प्रतीक भुजबळ यांचा सत्कार करण्याचा योग जुळून आला

आज नवी मुंबई येथे महात्मा फुले सोसायटीच्या वाशी शाखेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सौ भुजबळ मॅडम आणि त्यांचे चिरंजीव कुमार प्रतीक भुजबळ यांचा सत्कार करण्याचा योग जुळून आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षकी पेशातून सुरुवात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या सौ भुजबळ या मूळच्या सातारा जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत. महाराष्ट्राच्या विविध विभागात शिक्षण क्षेत्रात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असतानाच लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून आता सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत त्या धडाडीने काम करीत आहेत.
त्यांच्या मनोगतातून त्यांचा शिक्षण क्षेत्रातला प्रवास उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

सामाजिक, राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रात देखील स्त्रियांच्या वाटेला आलेला अनुभव त्यांनी देखील घेतला आहे. केवळ आपण स्त्री आहोत म्हणून उपेक्षित राहू शकत नाही, किंबहुना आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपण मुख्य प्रवाहात सामील होत असताना इतर सहकाऱ्यांचा असहकार असताना देखील स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये असायला हवी, असे सांगतानाच या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं.

त्यांचा मुलगा कुमार प्रतीक भुजबळ याने देखील एमएससी करताना शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश मिळवण्याचे निश्चित केले. संपूर्ण भारतभर घेतली जाणारी नेट परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण करत भविष्यात महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी त्याचीही तयारी झालेली आहे.
बँकिंग क्षेत्रातील उच्च पदावरील नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्यासाठी प्रतीक देखील सज्ज झाला आहे.

सातारा सारख्या ऐतिहासिक धार्मिक परंपरा लाभलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना आदर्शवत वाटावं इतकं यश मिळवण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अनिल नाईक व इतर सर्व संचालक आवर्जून उपस्थित होते.
अत्यंत आटोपशीर आणि देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या कार्यक्रमामुळे आमच्या संस्थेशी ही मायलेकाची जोडी कायमची जोडली जाणार यात शंका नाही . या सुंदर उपक्रमाचा भाग होता आले, याचा निश्चितच अभिमान आहे.

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज 73 87 37 78 01 व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या ग्रुप मध्ये नंबर ॲड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button