ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रेचा शनिवारी समारोप प्रा. हाके, वाघमारे, शेंडगे, अन्सारींची राहणार प्रमुख उपस्थिती

ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रेचा शनिवारी समारोप प्रा. हाके, वाघमारे, शेंडगे, अन्सारींची राहणार प्रमुख उपस्थिती
गेवराई/प्रतिनिधीः तालुक्यातील
बागपिंपळगाव येथून दि.१७ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी वडगाव ढोक येथे होत आहे. या सभेसाठी मुख्य अतिथी म्हणून प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, माजी आ. प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, डॉ. नारायण मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.आरक्षण बचाव पदयात्रा बाग पिंपळगाव या ठिकाणाहून सुरू झाली. या पदयात्रेच्या निमित्ताने ओबीसी बांधवांच्यावतीने काही मागण्या शासनाकडे ठेवण्यात आल्या. यामध्ये जात निहाय जनगणना, मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी, राजकीय आरक्षण रद्द करू नये,
ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती तात्काळ द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका आदी मागण्याही प्रत्येक गावात शासनाला करण्यात आल्या. बाग पिंपळगाव, बेलगाव , धोंडराई, उमापूर, तळणेवाडी, गुळज, मालेगाव, गायकवाड जळगाव, चकलांबा, तरडगव्हाण, शेकटा, बंगालीपिंपळा, खडकी, सिरसमार्ग, तरटेवाडी, शहाजानपूर ईटकुर, मादळमोही, पाडळसिंगी, हवेली नांदूर, खामगाव, चिंचोली, कामखेडा तांदळवाडी, पेंडगाव, बहिरवाडी, म्हाळस जवळा, पिंपळनेर, ताडसोन्ना, केसापुरी , नाथापूर, अमला वाहेगाव, सुलतानपूर, शिरसदेवी, जातेगाव, मारफळा, खेरडा वाडी, तालखेड, तेलगाव, एकदरा आदी ठिकाणी दि.१७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान ही पदयात्रा काढण्यात आली.
पदयात्रेचा समारोप गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे ३१ ऑगस्ट रोजी सायं ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. यावेळी प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, माजी आ. प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, डॉ. नारायण मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वडगाव ढोकच्या ग्रामस्थांच्या वतीने या रॅलीचा समारोप होणार आहे. पदयात्रेच्या समारोपाला गेवराई तालुका व पंचक्रोशीतील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा.पी.टी. चव्हाण, परमेश्वर वाघमोडे, बाबुराव शेंडगे, बजरंग सानप , बापू गाडेकर, दादासाहेब चौधरी, अंबादास बाबा पिसाळ, बाबासाहेब घोडके व सुकाणू समितीतील सर्व सदस्यांनी केले आहे.
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




