राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला श्री संत सावता महाराजांचे नाव द्यावे

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला श्री संत सावता महाराजांचे नाव द्यावे
बीड (प्रतिनिधी)
दरवर्षी राज्यात अनेक ठिकाणी राज्य शासनाच्या अनुदानाने भव्य आणि कृषी प्रदर्शने भरविण्यात येतात. येथून पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला श्री संत सावता महाराज यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शने होतात. त्याचा उद्देशही चांगला आहे. या कृषी प्रदर्शनाला आतापर्यंत शासन कोणतेच नाव देत नव्हते.अलीकडच्या काळात दुग्ध क्रांतीच(धवलक्राती)जनक स्वामीनाथन यांचे नाव देण्यात येत आहे. डॉ. स्वामीनाथन यांचे नाव सामान्यांना अपरिचित आहे .डॉ.स्वामीनाथन यांनी कृषी मालाच्या उत्पादन मूल्याच्या आणि माल विक्री संदर्भात शासनाला ज्या सूचना केल्या आहेत
त्यांची अंमलबजावणी शासनाने केलेली नाही. कृषी प्रदर्शनाला नाव देऊन डॉ. स्वामीनाथन आणि शेतकऱ्यांचाही अपमान करू नये. स्वामीनाथन आयोग सरकारने स्वीकारलाच पाहिजे, तरच शासनाला त्यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे,असे पत्रकात नमूद करून पुढे म्हटले आहे की श्री संत सावता महाराज एक कृषीतज्ञ होते. त्यांनी भरपूर उत्पादन देणारा भाजीपाला तसेच फळभाज्या याबाबत लोकांना अवगत केले होते.स्वत: शेतीत राबत असत.त्यांच्याकडच्या फळे भाज्या लोक आवर्जून विकत घेत असत. ते आयुर्वेदाचार्य होते.कोणत्या अंग-रोगासाठी कोणत्या वनस्पतीचा काढा घ्यायचा याबाबत प्रचंड त्यांना ज्ञान होते.थोडक्यात, श्री संत सावता माळी आणि कृषी उत्पादन यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यामुळे श्री संत सावता महाराज यांचच नाव कृषी प्रदर्शनाला देणे औचित्य आहे. येथून पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला श्री संत सावता महाराज यांचे नाव न दिल्यास अ.भा.माळी महासंघ प्रबोधनात्मक आंदोलन छेडणार असून याबाबत कृषीमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला जाणार आहे, असे शेवटीं पत्रकात म्हटले आहे.
शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा




