मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 61

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलना निमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
61
विधेयक पुन्हा मांडण्याचे प्रयत्नही करण्यात आले. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (UPA)-I ने २००८ मध्ये ते सादर केले आणि स्थायी समितीकडे पाठवले. राज्यसभेने ते संविधान (एकशे आठवी सुधारणा) विधेयक, २००८ म्हणून मंजूर केले, परंतु ते लोकसभेद्वारे पुढे जाऊ शकले नाही. शेवटी, हे विधेयक संविधान (एकशे अठ्ठावीसवी सुधारणा) विधेयक २०२३ म्हणून मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव असलेल्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा भारतीय संविधानात अनुच्छेद ३३०A समाविष्ट करून, SC आणि ST च्या महिलांसाठी राखीव ठेवण्याचाही या विधेयकाचा प्रयत्न आहे.
ओबीसी स्त्रिया काय स्त्रिया नाहीत? असा प्रश्न प्रा. निवेदिता मेनन (२०१३) यांनी आपल्या लेखात विचारला होता. हा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची गरज २०२४ मध्ये निर्माण झाली आहे. त्यांना का आरक्षणात प्रतिनिधित्व नाही?
आज ओबीसी आरक्षणावर ओबीसी महिलांचे आरक्षण अवलंबून असेल असे पुरोगामी स्त्रियांना वाटत असेल तर त्यांना शरद यादव यांनी वापरलेल्या ‘घर कटी’ शब्दांचा बदला घ्यायचा आहे. अशावेळी त्या ओबीसी स्त्रियांचे संधी अवसर काढून घेत आहेत. त्या ही लढाई ओबीसी पुरूष विरुद्ध ब्राह्मण स्त्री म्हणून बघत आहेत. जर तसे करायचे असते तर बळीराजाला वामनाने गाडले म्हणून वामनाला शिधा मिळू दिला नसता तर आज पृथ्वीवर ब्राह्मण शिल्लक नसते. असे करणारी सूड बुद्धी ओबीसी या निर्मिती, उत्पादक वर्गात नाही. म्हणून मोदी आणि मुखर्जी युतीतून मान्यता मिळालेले हे बिल, ओबीसी स्त्री आणि मुस्लिम स्त्रियांना वगळणारे हे बिल ओबीसी व मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक स्त्रियांवर अन्याय करणारे बिल आहे.
म्हणून आता ओबीसी स्त्रियांनी आपली प्रत्येक कार्यक्षेत्रात फुले-शाहू आंबेडकरवादी, संविधान आधारित आपली मुक्ती पीठ उभी करणे गरजेचे आहे. ओबीसी महिला राजकीय आघाडी स्थापन करून ओबीसी राजकीय आघाडी ने २०२४ मध्ये एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.
आता संपूर्ण देशात सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय पातळीवर ओबीसी महिला सहभागी तर असतीलच पण स्थानिक पातळीवर आपले नेतृत्व उभे करतील, अशी आशा आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




