हे काय सुरू आहे? विश्व हिंदू परिषद या महामानवांच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाला मूठमाती देण्यासाठी हे असे बॅनर जाणीवपूर्वक लावत आहे.

हे काय सुरू आहे? विश्व हिंदू परिषद या महामानवांच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाला मूठमाती देण्यासाठी हे असे बॅनर जाणीवपूर्वक लावत आहे.
ज्या महापुरुषांनी बहुजनांना ही कर्मकांडे करण्यापासून परावृत्त केले त्यांचीच छायाचित्रे वापरून कावड यात्रेच्या शुभेच्छा देण्याचे हे षडयंत्र आपण समजून घेतले पाहिजे. एकप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारसा हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे आणि ही बाब हे लोक अनवधानाने करत नसतात. हळूहळू डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराजांनी कावड यात्रा केल्याचे काही पुरावे हे लोक सादर करतील तर काही नेम नाही !
हा कावा ओळखा बहुजन बांधवांनो आणि वेळीच सावध व्हा !!
शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


