६० लाखावरच्या नोंदी आणि न्या. शिंदे समितीस दिलेली मुदतवाढ रद्द झाल्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा बचाव होऊ शकत नाही.

ओबीसी च्या बातम्या
1) ६० लाखावरच्या नोंदी आणि न्या. शिंदे समितीस दिलेली मुदतवाढ रद्द झाल्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा बचाव होऊ शकत नाही.
नव्याने दिले गेलेले खाडाखोड करुन, जिथं रिक्त जागा आहे तिथे कुनबी नोंद करुन,अधिकाराचा अतिरेकी वापर करुन ६० लाखावर नोंदी कागदपत्रांत घुसवून ओबीसी प्रनाणपत्र वितरित केली.
न्या शिंदे समितीस या कामी ओबीसींची न्या. शिंदे समिती बरखास्तीची मागणी असताना, ओबीसींच्या मागणीस केराची टोपली दाखवत बीजेपी-शिवसेना- राष्ट्रवादी सरकारने ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.
विरोधी काॅंग्रेस- शिवसेना (उठाबा) – राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी यास कसलाही विरोध न कता अनुमती दिली. या सर्वांना मिळून ओबीसी आरक्षण संपवायचे आहे, सध्या संपल्यातच जमा आहे.
सामान्य ओबीसींनी हा आरक्षण बचावाचा अर्थात कुनबी नोंदी रद्द करण्याचा लढा हाती घ्यायला हवा.
नेत्यांची कमजोरी आहे.
ते व्यक्त होऊ शकत नाहीत.
आरक्षण वाचवायचे असल्यास
ओबीसी बांधवांनी आमदार यांना कुनबी नोंदी रद्द करण्याबाबत जाब विचारावा.
कुनबी नोंदी रद्द होणार नाहीत तोपर्यंत कोणाही मराठा आणि प्रस्थापित वर्गातील उमेदवारास मतदान देणार नाही, अशी ठाम भुमिका घ्या. त्यातून सरकार ऐकत नसेल तर ओबीसी उमेदवार ओबीसी बहुजन पार्टी मधून विधानसभेत पाठवा.
सरकारने कधी नव्हे तितका सत्तेचा वापर करुन ओबीसींवर अन्याय केला. तो अन्याय मतातूनच दूर करावा लागेल.
प्रत्येक मतदारसंघात ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी, ओबीसींच्या अस्तित्वासाठी, ओबीसींच्या अस्मितेसाठी राजकीय परिवर्तनासाठी बैठक, परिषद घेवून कुनबी नोंदी रद्द होणार नाहीत तोपर्यंत मराठा उमेदवारास मतदान द्यायचे नाही ही चळवळ राबवा.
ओबीसी चळवळीतून ओबीसींसाठी कार्य करणारा प्रामाणिक कार्यकर्ता उमेदवार देवून तन मन धनाने त्यांना मुंबई सभागृहात पाठवा.
निवडणुकीच्या माहोलात सैरभैर न होता, पुढच्या पिढीची भाकरी वाचवा.
मा. प्रकाशआण्णा शेंडगे आणि सहकारी यांचे संघर्षास साथसोबत देवू. ओबीसी वाचवू…
ओबीसीचे किमान १००-१५० सक्षम उमेदवार उभे राहावेत.
सत्तेची चावी हातात घेवून अन्यायी आदेश ६०% ओबीसीची मतशक्ती दाखवून रद्द करावेत.
आम्ही सांगलीत ८ विधानसभा नतदारसंघात तशी व्हुवरचना करत आहोत. त्यानंतरच्या पंचायत समिती, झेडपी,नगरपंचायत,महानगरपालिका याही निवडणुका ओबीसी तत्वावरच लढून ओबीसींचे राजकीय परिवर्तन करु.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


