सोशल

मंडलनामा क्रमशः महानायक दिलीप कुमार यांची ओबीसी चळवळीला साथ 42.दिलीपकुमारांची एन्ट्री

मंडलनामा क्रमशः

महानायक दिलीप कुमार यांची ओबीसी चळवळीला साथ

42.दिलीपकुमारांची एन्ट्री

मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याला भारतातील चित्रपट अभिनेते, महानायक दिलीपकुमार यांचा पाठिंबा मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरले. दिलीपकुमार यांचा फक्त पाठिंबाच मिळाला नाही तर या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे चळवळीला ‘टर्निंग पॉइंट’ मिळाला. चळवळ एकदम गतिमान झाली व प्रकाशझोतात आली. मुस्लिम ओबीसीच्या मंचावर दिलीपकुमार येतात म्हणजे शब्बीर अन्सारी यांच्या कामात काहीतरी दम आहे, असे अनेकांना वाटू लागले. याबद्दल मुसलमानांमध्येही चचर्चा झडल्या. त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

दिलीपकुमार यांचा चळवळीत प्रवेश कसा झाला ही घटना मोठी रंजक आहे. मी दिलीपकुमार यांना माझे मुद्दे पटवून देऊ शकलो, यावर माझा आजही विश्वास बसत नाही. मागासलेल्या मराठवाड्यातील मागास असलेल्या जालना जिल्ह्यातील एका मुसलमान विणकर कुटुंबातील तरुण दिलीपकुमार यांच्यापर्यंत पोहचतो. एवढेच नव्हे तर त्यांना चळवळीत सामील करून घेतो, हे कसे घडले याबद्दल त्या काळात अनेकांना कुतुहल होते. आजही आहे. माझ्यासाठी मात्र ते

अत्यंत अभिमानास्पद आहे.

त्यावेळी संघटनेचे काम वाढत होते पण मुस्लिम ओबीसींच्या मागण्यांकडे सरकार फार गांभीर्याने पाहत नव्हते. त्यामुळे मी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. हा काळ १९९५-९६ चा. मुसलमानांना जात प्रमाणपत्रे सुलभतेने मिळावित व मुस्लिम ओबीसींनी मंडल आयोगाचा लाभ घ्यावा, या दोन पातळ्यावर माझे काम सुरू होते. एकीकडे

सरकारकडे पाठपुरावा करणे व दुसरीकडे मुस्लिम समाजाचे प्रबोधन करणे, या दोन आघाड्यावर माझे काम सुरू होते. शरद पवार, विलासराव देशमुख या नेत्यांच्या सहकार्यामुळे सरकारकडे पाठपुरावा करता येत होता. या दोन नेत्यांची भूमिका सतत मदतीची व सकारात्मक असली तरी अधिकाऱ्यांकडील कामे मार्गी लागण्याचा वेग अत्यंत संथ होता. समाजाच्या पातळीवरील वाटचाल अडखळतच सुरू होती. झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे अत्यंत अवघड असते. येथे संपूर्ण समाजावर धार्मिक पगडा प्रचंड. ते त्याच्या पलीकडे विचार करण्यास तयार नव्हते. सवलती घेण्यातील अडथळे जीआर काढून दूर करता येतील. पण सवलती घेण्यासाठी कोणी पुढे आले पाहिजे ना? आधीच मुसलमानांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी, इतर समाजापासून फटकून वागण्याची सवय, आधुनिक ज्ञानापासून कोसो दूर, त्यातच मौलवी, उलेमांची जबर पकड. यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या सवलती घेऊन आपली मुले शिक्षण घेऊ शकतात, नोकऱ्या मिळवू शकतात. डॉक्टर, इंजिनीअर, प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात, असा विचार नव्हताच. त्यामुळे निद्रिस्त समाजाला आकर्षित करण्यासाठी एकदम मोठा धक्का देण्याची गरज होती.

मी मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी घेत होतो.

त्यांना चळवळीत ओढण्याचा माझा प्रयत्न होता. नाहीतरी मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पाठिशी हिंदुंमधीलच व्यक्ती जास्त होत्या. मुसलमान त्यांचे का ऐकतील? त्यामुळे माझा हा प्रयत्न होता. या प्रयत्नातच सुप्रसिद्ध लेखक व गीतकार हसन कमाल आमच्यासोबत जोडले गेले. विलास सोनवणे यांच्या चळवळीतील प्रवेशामुळे काही बुद्धिवादी, अभ्यासक जोडले गेले. मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याबद्दल त्यांच्यात आस्था निर्माण झाली. त्यांची मदत मिळत होती. परंतु, त्यांचा प्रभाव साक्षर मुसलमानांपर्यंतच होता आणि त्यालाही मर्यादा होत्या. शिक्षणाचा सूर्यच ज्यांच्या आयुष्यात उगवला नव्हता, अशा मुसलमानांना मला मंडलयात्रेत सामील करून घ्यायचे होते. त्यामुळे मी सर्वस्तरातील मुसलमानांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होतो.

चित्रपटांचा समाजावर मोठा प्रभाव असल्यामुळे चित्रपटसृष्टीतील काही मुसलमानांनी मुस्लिम ओबीसींबद्दल दोन शब्द बोलल्यास मुसलमानांना पटेल, असे मला वाटत होते. चित्रपट अभिनेत्यांचा समाजावर खूप प्रभाव असतो. त्यांचे अनुकरण अनेकजण करतात. त्यामुळे मी गीतकार हसन कमाल यांच्यापर्यंत पोहचण्यात यशस्वी झालो. त्यांच्यापेक्षाही प्रभावी व्यक्ती आली पाहिजे, असे मला सतत वाटत होते.

जनमानसावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील व्यक्ती होते दिलीपकुमार व अमिताभ बच्चन. दिलीपकुमार यांचे मूळ नाव युसूफ खान. पेशावर येथून आलेले हे कुटुंब पक्के महाराष्ट्रीय झालेले. त्यांच्या वडिलांचा भाजीपाला व फळे विकण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबाने मुंबईत फळविक्री व्यवसायात जम बसवला. मी चळवळ करत होतो त्या काळातही त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती क्रॉफर्ड मार्केटमध्ये भाजीपाला, फळ व सुकामेव्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे त्याचा रितसर परवाना होता. दिलीपकुमार सिनेमातील हिरो आहेत, एवढेच मला माहीत होते. इतर माहिती चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मिळाली. मुलसमानांतील बागवान हे फळ व भाजीपाला पिकवतात व विकतात. दिलीपकुमार यांच्या कुटुंबाचा भाजीपाला, फळ विक्रीचा व्यवसाय आहे म्हणजे ही सांगड घालता येईल, असे मला वाटले व त्यांना भेटण्यासाठी माझी धडपड सुरू झाली.

मी याबद्दल हसन कमाल यांच्याशी बोललो. ही कल्पना त्यांनाही आवडली. मात्र दिलीपकुमार यांची भेट घेणे सोपे नव्हते. हसन कमाल यांच्यामुळे दिलीपकुमार यांच्यापर्यंत निरोप पाठण्यात यशस्वी झालो. मुस्लिम ओबीसीबद्दल शब्बीर अन्सारी हे तुमची भेट घेऊ इच्छितात, असा निरोप आम्ही पाठवला. पण कोण शब्बीर अन्सारी आणि ही मुस्लिम ओबीसी काय भानगड आहे? ओबीसी माहीत आहे पण मुसलमानात ओबीसी कोठून आले? त्यांच्याकडून भेटीसाठी नकार आला. त्यानंतरही मी, हसन कमाल, बाबुभाई कुरेशी, युसूफ लकडावाला यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. सतत प्रयत्न केल्यानंतर एकेदिवशी त्यांच्याकडून निरोप मिळाला. ‘जॉगर्स पार्कमध्ये भेटा.’

आता आली का पंचाईत. जॉगर्स पार्क म्हणजे सार्वजनिक ठिकाण. तेथे मुस्लिम ओबीसी सारख्या गंभीर मुद्यावर दिलीपकुमार यांच्यासोबत चर्चा कशी होणार? हा प्रश्न होता, पण भेटीसाठी वेळ मिळणे हेच आमच्यासाठी मोठे काम.

दिलीपकुमार यांच्या घराजवळ वांद्र्यात समुद्राशेजारी एक जॉगर्स पार्क आहे. तेथे दिलीपकुमार रात्री जॉगिंग करत. त्यांनी तेथे भेटण्यासाठी बोलावले. मी हसन कमाल यांच्यासह दिलीपकुमार यांनी दिलेल्या वेळेआधीच जॉगर्स पार्कमध्ये पोहोचलो. तेथे वांद्रे व आसपासच्या भागातील अतिश्रीमंत लोक जॉगिंग करत होते. दिलीपकुमार अजून आले नव्हते. आम्ही तेथेच थांबलो. दिलीपकुमार ठरलेल्या वेळी आले. आम्ही त्यांची उभ्याउभ्याच भेट घेतली.
म्हणजे आम्ही उभे होतो व दिलीपकुमार पायाच्या पंज्यावर उड्या मारत होते.

त्यांचे आमच्या बोलण्याकडे लक्षआहे की नाही, अशी शंका मला आली.

ते म्हणाले, ‘क्या है बोलो’

मी म्हणालो, ‘मै शब्बीर अन्सारी, मुस्लिम ओबीसी संघटनेचे बारा-चौदा वर्षांपासून काम करतो….’

मी बोलत असतानाच त्यांनी पळण्यास (जॉगिंग) सुरुवात केली. ते झटकन पुढे गेले. ही संधी वाया घालवायची नव्हती. मी त्यांच्या मागे पळालो. ते जॉगिंग करत होते व मी त्यांच्या सोबत पळत होतो. माझ्या सोबत आलेले हसन कमालही पळत होते. पळत पळत मी त्यांना ओबीसी चळवळ, मंडल आयोग, या चळवळीतील नेते, मुसलमान समाज, त्यांच्यातील शिक्षणाबद्दलची अनास्था, गरिबी, असे मला सुचेल ते सगळं सांगत होतो. ते जॉगिंग करत
होते व मी त्यांच्या मागे धावत मुसलमानांचे दारिद्र्य पटवून देत होतो. हा प्रसंग कसा असेल, तुम्ही कल्पना तर करून बघा. मी जीव तोडून बोलतहोतो. ते माझ्याकडे बघतही नव्हते. त्यांचे लक्ष जॉगिंगवर होते. मुसलमानांतील गरिबीचा मुद्दा आल्यावर त्यांचा वेग कमी झाला व ते भरभर चालायला लागले. चालणे कसले, माझ्यासाठी धावणेच होते. मला एक क्षण वाटले ते माझ्याकडे लक्ष देत आहेत. मी मुस्लिम समाजातील ओबीसी, त्यांना प्रमाणपत्र मिळाल्यास शिक्षण व नोकऱ्यात संधी मिळू शकते, असे काहीबाही बोलत होतो. मला वाटायचे त्यांचे लक्ष आहे की नाही. पण बोलायची संधी मिळाली आहे तर बोललेच पाहिजे. मी अक्षरशः बडबडत होतो. बैठकीत समोरासमोर बसून मुद्देसूद बोलता येते. पळता पळता कशाची आली मुद्देसूद मांडणी ?

दिलीपकुमार फक्त अभिनेतेच नव्हते तर अत्यंत विद्वान व विचारी गृहस्थ होते. त्यांना अनेक भाषा येत. त्यांना जगभरातील घडामोडींची माहिती होती. पण या घडीला माझ्याशी बोलत नव्हते. माझे बोलणे ऐकत आहेत की नाही, याबद्दल शंका होती. परंतु, गरीब मुसलमांची मुले उच्चशिक्षित होऊ शकतात, हे वाक्य ऐकताच ते क्षणभर थांबले. माझ्याकडे पाहिले व म्हणाले, ‘कल घर आओ अकेले.’ मी अर्धा पाऊण तास तरी त्यांच्या मागे पळत असेन. प्रचंड दमलो व घामाच्या धारा लागल्या होत्या. सतत बडबड करत होतो. दिलीपकुमार माझ्याशी मोजून फक्त चार शब्द बोलले, पण मला वाटले माझ्या पळण्याचे सार्थक झाले.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button