सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 71

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
71

भोकरवाडी येथील सर्व्हे. नं. ७ मधील ६ एकर ३३ गुंठे जमीन संस्थेला मिळाली. पुढे या भूखंडावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अहिल्याश्रम उभा केला.
महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या सदस्यांमध्ये गोवंडेही सदस्य आहेत. पुढे गुढीपाडव्याच्या दिवशी सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत गोवंडे सहभागी झाले होते.

सदाशिवराव गोवंडे आणि सार्वजनिक काका यांनी पुणे येथे ‘सार्वजनिक सभा’ स्थापन केली होती. सदाशिवराव गोवंडे यांची पत्नी सरस्वतीबाई आणि सावित्रीबाई फुले जिवलग मैत्रिणी होत्या.

सत्यशोधक समाजाबरोबर गोवंडे यांच्यावर प्रार्थना समाजाचाही प्रभाव होता. सेवानिवृत्तीनंतर गोवंडे वेदांत तत्त्वज्ञानाकडे जास्तीच झुकलेले दिसतात. ‘गुरुविण मोक्ष नाही’ अशी ही सनातनी भूमिका आयुष्याच्या सायंकाळी गोवंडे यांची राहिली. आयुष्याच्या सायंकाळी ते तापाने आजारी पडले. या तापातच त्यांचे ८ एप्रिल १८८४ रोजी वयाच्या साठाव्या वर्षी पुणे येथ निधन झाले.

संदर्भ १. त्रिमूर्ती दर्शन डॉ. वि. भा. गोवंडे, २. महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर, ३. ज्ञानोदय आणि महात्मा फुले जी. ए. उगले

गोळे दौलतराव तुकाराम (इ.स. १९१४ – मृत्यू १० फेब्रुवारी २००४)

सत्यशोधक समाजाचे एक भूतपूर्व उपाध्यक्ष, नागपूर येथील सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दौलतराव तुकाराम गोळे गोळे उ ऊर्फ काकासाहेब गोळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९१४ रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील पाश्रट गावी झाला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना १९३४ साली अमरावती येथील शिवाजी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. पुढे त्यांनी प्राथमिक शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे ते तालुका बोर्डाचे सचिव झाले. डॉ. पंजाबराव देशमुख हे देवास संस्थानात चार वर्षे दिवाण असताना गोळे त्यांचे सहायक
सचिव होते. पुढे अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे ते कुलसचिव झाले आणि १९७६ साली ते त्याच पदावरून सेवानिवृत्त झाले. इ. स. १९६२ ते १९७२ पर्यंत ते नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे एक सदस्यही राहिले. दौलतराव गोळे अकरा वर्षांचे असताना अमरावती येथे ब्राह्मणेतर परिषदेला
जोडून सत्यशोधक परिषदेसह आणखी दोन अ. भा. पातळीवरील परिषदा संपन्न झाल्या. अॅड. केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक परिषद संपन्न झाली. या परिषदा महात्मा फुले पुतळा प्रकरणानंतर भरत असल्याने या परिषदांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या अधिवेशनांच्या प्रभावाखाली गोळेही आले. येथून पुढे ते सत्यशोधक समाजाकडे वळले. गोळे पुढे सत्यशोधक अधिवेशनांना आवर्जून उपस्थित राहू लागले. दिनांक

२३ व २४ सप्टेंबर १९९५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, रेशीमबाग, नागपूर येथे दौलतराव गोळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाचे २४ वे अधिवेशन भरले. या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नऊ मुद्दे मांडले. ते पुढीलप्रमाणे :- सत्यशोधक समाज एक मानवमुक्तीची चळवळ, सत्यशोधक समाजाची मूलभूत तत्त्वे, तत्कालीन सामाजिक संघटन, सत्यशोधक समाजाची प्रतिज्ञा, समाजाची फलश्रुती आदी प्रबोधनपर मुद्यांवर त्यांनी जोरकस प्रतिपादन केले. दरम्यान, ‘सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा’, ‘अखिल भारतीय सत्यशोधक समाज : काल, आज आणि उद्या’ या पुस्तिकांचे त्यांनी लेखन केले. तसेच ‘सत्यशोधक समाज जाहीरनामा’ या यशवंत मनोहरलिखित पुस्तिकेचे ते प्रकाशकही होते.

सत्यशोधक तत्त्वज्ञान सतत उराशी कवटाळून हयातभर त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार केला. विदर्भ प्रांताच्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. अशा या कर्तव्यनिष्ठ सत्यशोधकाचे १० फेब्रुवारी
२००४ रोजी वयाच्या ९० व्या वर्षों अमरावती येथे निधन झाले. संदर्भ – सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता जी. ए. उगले

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button