सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 74

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
74

नाकारले. परिणामी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काँग्रेस बरोबरच संघ-भाजपानेही हात झटकले आणि ओबीसी/भटके विमुक्तविषयीचे आमचे धोरण एकच असल्याचा निष्कर्ष आम्हाला काढता आला. ओबीसीची जातनिहाय जनगणनेची गरज नसल्याचे सांगायलाही संघ भाजपा विसरले नाहीत. भारतातील अनेक ओबीसी व भटके विमुक्तांच्या संघटनेने केलेली आंदोलने, चळवळी वाया गेल्या COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे २०२१ ची प्रस्थावित जनगणना झालीच नाही. जनगणना होवो वा ना होवो OBC/VJ/NT च्या आकडेवारीसाठी SC/ST प्रमाणे जातनिहाय जनगणना आपण करणार नसल्याचे केंद्र सरकारने संसदेमध्ये व संसदेबाहेर संघ-भाजपाने घोषित करून हिंदुत्वाच्या नावाने OBC/VJ/NT ची मते घ्यायची पण सामाजिक न्याय मात्र यांच्या पदरात पडू द्यायचा नाही. याचा चंग संघ भाजपाने बांधला आहे हे निर्विवाद सत्य आहे.

जातनिहाय जनगणना हा विषय आज बाजूला ठेवून धार्मिक व सांस्कृतिक राजकारणात हिंदू घटकांना अडकवून ठेवले आहे. राम मंदिराचे उ‌द्घाटन हा राष्ट्रीय सोहळ्यासारखा सोहळा पार पडला. स्वतः पंतप्रधान, रा.स्व.सं. सरसंघचालक आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला. केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र हे पुरोगामी? राज्य असल्यामुळे पुर्ण दिवसाची सुट्टी मिळाली. महाराष्ट्रात ओबीसी-भटके विमुक्ताच्या न्याय हक्कांवर गदा येत असतांना आम्ही ‘राममय होत आहोत. महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्ताचे आरक्षण अखेरच्या घटका मोजत आहेत. मराठा ही प्रभुत्वशाली शेतकरी जात असतांना तीचे कुणबीकरण करुन ओबीसी प्रवर्गात तिला ढकलले जात आहे. मतांच्या राजकारणासाठी तसेच आपल्या अनैतिक सत्तेला राखण्यासाठी ओबीसी भटक्या-विमुक्तांचा बळी दिला जात आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते व संघटना याविरोधी लढत आहेत. प्रस्थापित नेत्यांनी आपआपल्या परीने स्वार्थी भूमिका घेतल्या आहेत. ‘नायक’ या चित्रपटात दाखविल्या प्रमाणे मराठ्यांना सवलती मिळत आहे. रातोरात त्यांच्या साठी GR निघत आहेत. आयोग बसविले जात आहेत. लोकशाहीविरोधी निर्णय घेऊन सरकार त्यांचा अंधानुनय करत आहे.

समारोप

संघभाजपाच्या सांस्कृतिक व धार्मिक राजकारणाचा बळी ५४% ओबीसी व भटके विमुक्त बनला आहे. आपल्या घटनादत्त अधिकाराची लढाई सोडून
राममंत्राचा जप जपण्याचा कार्यक्रम सर्वसामान्य बहुजनवर्गाने घेतला आहे. घातून बाहेर पडण्यासाठी स्वतःची पक्ष, संघटना स्थापन करुन आपल्या न्यायहक्काचे पूर्णवेळ राजकारण ओबीसी भटक्या विमुक्तांनी करुन हा धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादा पासून मुक्त व्हावयास हवे नाहीतर पारतंत्र्यापेक्षाही भयानक गुलामगिरीस सामोरे जावे लागणार आहे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button