सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 70

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
70

तिसरी-चौथीपर्यंत झालेले होते. सत्यशोधक चळवळीशी पुंजाबाबांचा संपर्क येताच त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या झेंड्याखाली नाशिक जिल्ह्यात खेड्यापाड्यांत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यात मोठी आघाडी घेतली. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसाठी त्यांनी खेड्यापाड्यांतून बोर्डिंगसाठी धान्य गोळा केले. १९४८-४९ साली त्यांनी इगतपुरी किसान लढ्याचे नेतृत्व केले. पुंजाबाबा नाशिक जिल्ह्यातील उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते. ते १९५७ ते १९६२ या कालखंडात इगतपुरी मतदारसंघाच्या समितीचे आमदार होते.

पुंजाबाबा गोवर्धने यांनी सांजगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या अंतर्गत एक हायस्कूल सुरू केले होते. इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील विद्यालय त्यांच्या नावाने आहे. पुढे पुंजाबाबांच्या निधनानंतर जवळपास ३५ वर्षांनी इगतपुरी महाविद्यालयास त्यांचे नाव देण्यात आले. १४-२-२००७ रोजी संस्थेने इगतपुरी महाविद्यालयास त्यांचे नाव देऊन उशिरा का होईना एका सत्यशोधकाचे शैक्षणिक स्मारक केले, हेही नसे थोडके !!

शेतकरी नेते, शेतकऱ्यांचे पाठीराखे पुंजाबाबा गोवर्धने यांचे मराठा मंदिर हॉस्पिटल, नाशिक येथे ९ ऑगस्ट १९७१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर संसारी गावी दारणा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सत्यशोधक कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार त्यांचे दशक्रिया, श्राद्ध आदी विधी करण्यात आले नाहीत.

संदर्भ – प्राचार्य वसंतराव पुंजाजी गोवर्धने, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, इगतपुरी, जि. नाशिक यांची मुलाखत प्रा. अशोक सोनवणे, नाशिक यांची मुलाखत

गोवंडे
सदाशिवराव बल्लाळ
(८ डिसेंबर १८२४-८ एप्रिल १८८४)

महात्मा फुले यांचे शाळकरी मित्र, अस्पृश्य मुलांच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सत्यशोधक समाजाचे एक सदस्य रावबहादूर सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांचा जन्म पुणे येथील काळ्या हौदाजवळील वाड्यात ८ डिसेंबर १८२४ रोजी झाला. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. सदाशिवराव हे बल्लाळ गोवंडे आणि तारूबाईचे चौथ्या क्रमांकाचे अपत्य होते. खरे तर गोवंडे यांच्या कुळाचे मूळ नाव साठे होते. साठे घराणे मालवण तालुक्यातील कांदळ गावचे वतनदार होते. गोवंडे घराणे १७९० साली कोकणातून येऊन पुण्यातील काळ्या हौदाजवळ स्थायिक झाले होते.

सदाशिवरावांचे प्राथमिक शिक्षण एका गावठी शाळेत झाले. स्कॉटिश मिशनच्या शाळेत पुढील शिक्षण झाले. पुढे सरकारी इंग्रजी शाळेतून सातवी पास झाले. सातवी पास झाल्यावर विश्रामबाग वाड्यातील शाळेत ते इंग्रजीचे शिक्षक म्हणून १ ऑक्टोबर १८४३ रोजी रुजू झाले. पुढे १८४५ मध्ये ते ‘रस्ते आणि तळे खात्यात’ हिशोबनीस म्हणून काम करू लागले, तर अहमदनगर येथील न्यायालयात १८४८ ते १८५० पर्यंत कारकून होते. पुढे मुंबईत ९ सप्टेंबर १८५० पासून महसूल विभागात महसूल अधिकारी म्हणून काम पाहू लागले. १९ सप्टेंबर १८५१ रेव्हेन्यू सर्व्हे खात्यात वरिष्ठ लिपिक झाले. १८५२ मध्ये त्यांची पुणे येथील इनाम कमिशन कार्यालयात बदली झाली. पुढे पेशवे दप्तर कार्यालयातून १९ फेब्रुवारी १८७४ रोजी गोवंडे सेवानिवृत्त झाले.

महात्मा फुले यांनी अहमदनगर येथे फेरॉर बाईंची, सदाशिवरावांसमवेत १८४८ च्या जून महिन्यात भेट घेतली. पुढे फेरॉर बाईच्या शाळांपासून प्रेरणा घेऊन १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली (भारतीयांनी काढलेली) शाळा सुरू केली. यासाठी गोवंडे यांनी आपल्यापरीने सहकार्य केले. दिनांक १० सप्टेंबर १८५३ रोजी ‘महार-मांग इत्यादी विद्या शिकवण्याकरिता मंडळी’ ही दलित विद्यार्थ्यांकरिता शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव गोवंडे हेच होते. मोरो विठ्ठल वाळवेकर सचिव होते, तर जोतीराव फुले या संस्थेचे संस्थापक – सदस्य होते. या शाळेची एक विद्यार्थिनी मुक्ता साळवे ही होय. जिने मांग-महारांच्या दुःखाविषयी क्रांतिकारी निबंध लिहिला. या शाळेला आरंभी पाट्या-पेन्सिली आणि दर महिन्यास दोन रुपये देणगी गोवंडे देत असत. पुण्यातील मराठा दप्तर कार्यालयातील नोकरी सांभाळून अधूनमधून या शाळेला ते भेट देत असत. अशा प्रसंगी ते शिकवतही असत. दरम्यान, या शाळेला भूखंड मिळावा, नियोजित इमारतीसाठी सरकारी निधी उपलब्ध व्हावा आणि सरकारी ग्रॅन्ट मिळावी म्हणून वाळवेकरांसमवेत सदाशिवरावांनीही प्रयत्न केले.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button