मंडलनामा क्रमशः 39.नर्सिंग स्कूलची स्थापना

मंडलनामा क्रमशः
39.नर्सिंग स्कूलची स्थापना
मुस्लिम महिलांमध्ये नर्स होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, या व्यवसायाचे प्रशिक्षण संपल्यानंतर लगेच रोजगार मिळतो. हे ओळखून नसीम महात यांनी मिरज येथे नर्सिंग स्कूल स्थापन करण्याची कल्पना माझ्यापुढे मांडली. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने त्यासाठी शासनाकडून मान्यता मिळवली. महात यांनी २०११ मध्ये माझ्या नावाने ‘शब्बीर अहमद अन्सारी नर्सिंग स्कूल’ सुरू केले. नर्सकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन दुषित असल्याने मुस्लिम मुली प्रवेश घेण्यास उत्सुक नव्हत्या. नसीम महात यांनी त्याची हरप्रकारे समजूत काढून प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. या कार्याची ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘गल्फ न्यूज’ या आघाडीच्या दोन वृत्तपत्रांनी दखल घेतली. या दैनिकांनी विशेष प्रतिनिधी पाठवून रिपोर्ट प्रकाशित केले. नर्सिंग स्कूलनंतर संघटनेच्या ट्रस्टला मेडिकल कॉलेजचीही परवानगी मिळाली होती. आम्ही शुल्क भरून ही परवानगी तीन वर्षे राखली. मेडिकल कॉलेज स्थापनेसाठी लंडनमधील एक सामाजिक संस्था आर्थिक मदत करणार होती. परंतु, त्यावेळी धर्मांतरासाठी परदेशातून पैसा पुरविला जातो, अशी आवाई देशभरात उठविण्यात आली होती. त्यामुळे परदेशातून आर्थिक साह्य मिळविण्याची परवानगी मिळाली नाही व मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचे नसीम महात यांचे स्वप्न अपुरे राहिले. महात यांचे १९ ऑक्टोबर २०१७ रोजी न्युमोनियाच्या आजाराने निधन झाले. दिलीपकुमार त्यांच्या सभांमधून नसीम महात यांचे ‘झाशीची राणी’ असे वर्णन करत असत. आम्ही सर्वजण त्यांच्यासारख्या धडाडीच्या कार्यकर्तीला मुकलो आहोत.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




