मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 71

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
71
सांस्कृतिक दहशतवादाचे बळी : ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमाती
प्रा. सुदाम चिंचाणे
प्रास्ताविक
७ ऑगस्ट १९९० रोजी माजी पंतप्रधान मा. व्ही.पी. सिंगानी मंडल आयोगाची अंशतः अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये ओबीसींना २७% आरक्षण देण्याचा हा निर्णय या निर्णयाची घोषणा करताच भाजपाच्या बाहेरून पठिंबा असलेल्या व्ही.पी. सिंग सरकारच्या विरोधात कटकारस्थाने सुरु झाले. भाजपाने सरकारचा पाठिंबा काढला. “उन्होने मंडल निकाला, इसलिए हमने कंमडल निकाला” असा नारा देत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व प्रमोद महाजन आदी नेत्यांनी रामरथ यात्रेचा अभिनव प्रयोग सुरु करुन भारतवर्षात सिंग सरकारच्या धोरणाविरोधात राममंदिराचा प्रश्न उभा करून धार्मिक व सांस्कृतिक ध्रुवीकरणास प्रारंभ केला. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा व्ही. पी. सिंग सरकारचा मनोदय धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला. सामाजिक न्यायाच्या विरोधात वातावरण पेटविण्यासाठी आरक्षण विरोधी शक्तींना पाठींबा देत देशभरात SC. ST व OBC विरोधात वातावरण तयार केल्या गेले. दंगली पेटविल्या गेल्या. तरुणाईस भडकविले गेले. ओबीसी
भटके-विमूक्त या प्रवर्गास २७% आरक्षण म्हणजे घटनेच्या ३४० व्या कलमाची अंमलबजावणी होती परंतू ब्राम्हणवाद्यानी हे आरक्षण SC/ST लाच आहे असे वातावरण भासवण्याचा प्रयत्न केला. ओबीसी प्रवर्गात जनजागृती नसल्यामुळे देशभरात भटका-विमुक्त व ओबीसी वर्गही संघभाजपाच्या या बहुजनद्रोही राजकारणाच्या आहारी गेला. परिणामी ओबीसी आरक्षणाचा लढा हा बहुसंख्य अआंबेडकरवाद्यांनी लढविला. ज्या ओबीसींचा सामाजिक न्याय प्रस्थापित होणार होता तो ओबीसी आज आपल्या न्याय हक्काच्या लढाईत सामिल होण्याऐवजी संघभाजपाच्या हिंदु-मूस्लिम ध्रुविकरणाच्या म्हणजे रामजन्मभूमी आंदोलनाच्या पालकीचा भोई बनला. एकूणच सामाजिक न्यायाच्या लढाईस बळ मिळण्याऐवजी खच्चिकरण सुरु झाले. SC/ST/OBC व Minority यांची युती होण्याऐवजी हिंदु-मुस्लिम असे धार्मिक ध्रुवीकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे स्वप्न भंग करण्याचा यशस्वी डाव संघभाजपाने केला. आज त्याची फळे ते चाखत आहेत व पाशवी बहुमत घेऊन २०१४ पासून आजतागायत केंद्र सरकारमध्ये आरक्षण विरोधी असलेले लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा घेऊन भटके विमुक्त व समस्त ओबीसीवर घोर अन्याय करत आहेत. संघभाजपाचे हे हिंदुत्वाचा मुलामा दिलेले समस्त बहुजनविरोधी वातावरण ओबीसी, अनुजाती, जमाती यांच्या कल्याणाचा कृतीकार्यक्रम जोरकसपणे धुडकावून लावण्यात कमालीचे यशस्वी होतांनी दिसत आहे. २ खासदारा पासून सुरु झालेला भाजपा २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमत घेऊन अभूतपर्व यश संपावत आला आहे. तो याच ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा फायदा घेऊन धर्मनिरपेक्ष असलेलं भारतीय संविधान आज अप्रत्यक्ष संपवण्याचा यशस्वी घाट घालतांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. दुर्दैवाने सत्ताभिलाषी बहुजन देखील संघभाजपाच्या भुलभुलैय्याला बळी पडलेले दिसताहेत. भारताचे रुपांतर हिंदुस्थानमध्ये करून मुस्लिम, बौद्ध, इसाई, जैन, शिख इत्यादींना विरोध करुन हिंदुवर्चस्व म्हणजे परिणामी ब्राम्हणी वर्चस्व निर्विवादपणे भारतात आज प्रस्थापित झाले आहे.
अटलबिहारी वाजपेयीचा कार्यकाळ व सामाजिक न्याय
संघ भाजपाच्या धार्मिक व सांस्कृतिक राजकारणाचा पहिला अविष्कार अटलबिहारी वाजपेयीच्या नेतृत्वातील NDA सरकारने केला. न्या. व्यंकचलैव्या यांच्या नेतृत्वाखाली घटना पुनर्विलोकन आयोग नेमण्यात आला. भारतीय संविधानाच्या एखाद्या कलमामध्ये बदल वा दुरूस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे. यानुसार अनेक घटना दुरुस्त्या झाल्या व होत आहेत हे नैसर्गिक आहे, परंतु भारताच्या संविधानाचे पुनर्लेखन वा पुनर्विलोकन मात्र घटना समंत नाही. गोबेल्सनितीचा वापर करून भारतीय संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न अटलजींनी केला. सुदैवाने प्रबुद्ध भारतीय नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. भारतीय संविधानाला बदनाम करण्याचे प्रयत्न मात्र अटल सरकारने केले. रा.स्व. संघाचा संविधान विरोधी कृतिकार्यक्रमाचा हा एक भाग होता. संविधान व त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय सारख्या महत्त्वाच्या गाभातत्वांना बदनाम केले गेले विशेषतः सामाजिक न्याय सारख्या
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




