समाज जागृती करून ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देणार . प्रकाश अण्णा शेंडगे

समाज जागृती करून ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देणार . प्रकाश अण्णा शेंडगे
ओबीसी जन मोर्चा ,ओबीसी बहुजन पार्टी व समविचारी संघटनांचा अमरावती विभागीय मेळावा शासकीय विश्राम गृह अकोला या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी ओबीसी जन मोर्चा, ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय प्रकाश अण्णा शेंडगे होते. सर्व समविचारी संघटनांना एकत्रित घेऊन तिसरी आघाडी निर्माण करून ओबीसीचे अस्तित्व निर्माण करून ओबीसी लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार अशा प्रकारची भूमिका या मेळाव्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे ,राष्ट्रीय महासचिव चंद्रकांत बावकर ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष जे डी तांडेल , पे बॅक टू सोसायटी प्रोग्रॅम व्ही डी काळे ,माजी आमदार नारायणराव गव्हाणकर ,विभागीय अध्यक्ष प्रवीण पेटकर ,माजी आमदार तुकाराम बिडकर ,ओबीसी जन मोर्चा अध्यक्ष आकाश कवडे ,सुनिता ताई सरोदे, चंद्रकांत सावजी ,शंकरराव इंगळे ,सुगत वाघमारे ,अनिल शिंदे ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष ,राजूभाऊ राऊत ,मायाताई इरतकर ,प्राध्यापक सविता हजारे ,विदर्भ विभाग प्रमुख सुनिता काळे ,जनतांत्रिक राष्ट्र निर्माण समितीचे गोविंद चव्हाण ,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर संतोष झेंडे, यवतमाळ जिल्हा सचिव गोपाल आडे ,उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन मोर्चा उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी केले तर भूमिका डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी मांडली संपूर्ण अमरावती विभागातून प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींना ओबीसी बहुजन पार्टी ओबीसी जन मोर्चाच्या संदर्भातले पद या ठिकाणी देण्यात आलेले आहेत .अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सुधीर सुर्वे यांनी कळविले आहे.
शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




