मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 70

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
70
हे वर्तन मात्र मराठा राजकारणाशी मिळते जुळते दिसत नाही. कारण मराठा अस्मितेची जाणीव निर्माण करून आत्तापर्यंत ज्या ज्या मराठा नेतृत्वाने आपली राजकीय बस्थान बसवले अशा प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधामध्ये एक प्रकारचा अविश्वास विस्थापित मराठा समाज दाखवताना दिसून येत आहे. कारण लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये निघालेले क्रांतीमोर्चे या मोर्चाचे नेतृत्व एकाही प्रस्थापित मराठा समाजातील नेत्याला विस्थापित मराठा समाजाने करू दिलेले नाही, कारण प्रस्थापित मराठा नेतृत्व विषयी अविश्वास विस्थापित मराठा समाजामध्ये निर्माण झालेला दित्ततो. महाराष्ट्रातील वर्तमान मराठा राजकारण हे अंतरिक द्वंद्वामधून जात असलेले दिसून येत आहे. पूर्वी प्रस्थापित मराठा आणि वंचित मराठा यांच्यामध्ये चांगला समन्वय होता
मराठा जाती अस्मितेला फुंकर घातला की सामान्य मराठा समाजामध्ये जो असंतोष होता तो असंतोष विरून जायचा आणि या अस्मितेच्या राजकारणाचा फायदा प्रस्थापित मराठा समाज घ्यायचा. आज मात्र मराठा समाजामधून एकीकडे सहकार सम्राट, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, डेअरी सम्राट, असा धनदांडगा राजकीय दृष्ट्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे सत्ता केंद्र नियंत्रित करणारा त्यावर प्रभाव गाजवणारा मराठा असताना दुसरीकडे अठराविश्व दारिद्र्याचा सामना करणारा, काबाडकष्ट करूनही अत्यंत हलाखीमध्ये जीवन जगणारा असा दुसरा वर्ग आहे. या दुसऱ्या वर्गामधील नवतरुण मंडळी या पहिल्या वर्गाला अनेक प्रश्न विचारत आहे. यामधून मराठा वर्चस्वाच्या राजकारणामध्ये द्वंद्व निर्माण झाल्याचे दिसते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वतःला मागास मानायला तयार नसणारा मराठा समूह आज स्वतःला मागास मानायला तयार झालेला दिसून येतो.
आपण सत्ताधारी जात आहोत हा जो अहंकार होता तो गळून पडलेला दिसून येतो राजकीय सत्ता दीर्घकाळ असूनही प्रस्थापित मराठ्यांच्या नाकर्त्यापणामुळेच सामान्य मराठा आज हालाखी मध्ये जगत आहे. अशी अस्वस्थता विस्थापित मराठा तरुण-तरुणी मध्ये दिसून येते आहे. यामधून आपणासही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी तो रस्त्यावर उतरतो आहे. आणि या आरक्षण लढ्याचे नेतृत्व विस्थापितांमधून आलेला एक सामान्य शेतकरी मनोज जरांगे पाटील करत असलेले दिसून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे अनेक स्थित्यंतरे घडून येत आहेत. ही स्थित्यंतरे घडताना मात्र उत्तर भारतामध्ये जसे सत्तेचे स्थलांतर झाले सत्ता प्रस्थापितांच्या किंवा अभिजन वर्गाच्या हातून विस्थापितांच्या हातामध्ये आली तसे महाराष्ट्रामध्ये घडताना दिसून येत नाही.
आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेचे स्थलांतरण घडवायचे असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच अग्रणी असलेल्या मराठा समाजामधील वंचित किंवा विस्थापित सामान्य मराठा तरुण तरुणींनी सत्ता हस्तगत करण्यासाठी उजव्या प्रतिगायत विचारांच्या पक्षांशी समन्वय न करता पुरोगामी लोकशाहीवादी विचाराच्या पक्षाशी समन्वय साधून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.
संदर्भ:
१) कॉ. गोविंद पानसरे, मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न, लोकसाहित्य प्रकाशन, सिडको, औरंगाबाद,
२) गणेश राऊत, ज्योती राऊत, महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास, डायमंड पब्लिकेशन, पुणे.
३) अरुण विश्वंभर, मराठा क्रांती मोर्चा आणि क्रांती, कबीर प्रकाशन, दादर (पश्चिम) मुंबई.
४) ज.वी. पवार, आंबेडकरोत्तर आंबेडकर चळवळ, खंड पहिला १९५६ ते १९५९, अस्मिता कम्युनिकेशन, (बोरीवली) मुंबई.
५) प्रताप आसबे, मराठा आंदोलन असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा, जिजाई प्रकाशन, पुणे.
६) भा.ल. भोळे, जातीपातीचे राजकारण, अशोक प्रकाशन, नागपूर.
७) सचिन माळी, मराठा आंदोलन जातीयुद्ध की जातीअंत, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




