सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 69

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
69

या जातीमधून राजकीय नेतृत्व उदयास येण्यास व राजकीय संघटन उभारण्यास चालना मिळालेली दिसते. पारंपारिक स्थानाची जाणीव आणि आधुनिक परिस्थितीमध्ये नेतृत्व करण्याची आकांक्षा यांचा मिलाप या जात भानामध्ये असलेला दिसून येतो. मराठा अस्मिता घडण्याला किंवा मराठा वर्चस्व राजकारणामध्ये प्रस्थापित होण्याला बहुजन ही संकल्पना देखील मदतगार ठरलेली दिसून येते. ब्राह्मण ब्राह्मणोत्तर वादामधून ब्राह्मणाशिवय सर्व जातींचे संघटन बहुजन या संकल्पनेमध्ये मराठा नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या नंतर केलेले दिसून येते.

आपले जातीय हितसंबंध व्यापक अशा बहुजातीय वैचारिक आधारावर प्रस्थापित करणे मराठा नेतृत्वाला शक्य झाले. कारण महाराष्ट्र मध्ये मराठा वर्चस्वाला भौतिक गोष्टी सुद्धा पूरक असलेल्या दिसून येतात. मराठा जात ही प्रामुख्याने शेती व्यवसायाशी जोडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये शेतीच्या प्रश्नांना प्राधान्य असणे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व शेतकरी असणे यामुळे आपोआपच महाराष्ट्र मध्ये मराठा वर्चस्वचे राजकारण घडत गेलेले दिसून येते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारच्या नियोजनानुसार महाराष्ट्रामध्येही त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यात आली.

या संस्थांच्या निर्मितीमध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना होती. महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्यानंतर त्यांनी देखील मराठा वर्चस्व जडणघडणीमध्ये हातभार लावलेला दिसतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाने आपले नियंत्रण सुरुवातीच्या काळामध्ये मिळवले. स्थानिक संस्थांमध्ये स्थानिक पातळीवरील अभिजनांना सत्तेमध्ये सहभागी करून घेउन जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्थांमध्ये स्थानिक अभिजन यांना सत्ता केंद्रावर नियंत्रण काँग्रेस पक्षामार्फत मिळवता आले. स्थानिक अभिजन हे प्रामुख्याने मराठा जातीमधील श्रीमंत मराठा शेतकरी होते.

काही भौगोलिक भागांमध्ये उदाहरणार्थ नाशिकच्या पट्ट्यामध्ये माळी समाज, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या पट्ट्यामध्ये धनगर समाज, तर बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाज यासारख्या इतर मागास जातीमधील शेतकरी अभिजन यांना देखील स्थानिक संस्थावर सत्ता पदे मिळाली. परंतु राज्य पातळीवरचा विचार करता बहुसंख्य पदे मराठा जातीकडे असलेली दिसतात. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेबरोबरच सहकारी चळवळ सत्ताधारी वर्गाने चालू केली.

प्रत्येक सहकारी चळवळी मधून जी बिगर राजकीय सत्ता केंद्र निर्माण झाली तिच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाने आपले वर्चस्व टिकवले. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणारी भौतिक यंत्रणा म्हणजे सहकारी चळवळ या चळवळी मधून निर्माण झालेल्या संस्थामध्ये व पंचायतराज व्यवस्थेमध्ये स्थानिक अभिजनांना सगळ्यांनाच सामावून घेणे शक्य होत नव्हते त्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा दिसते. समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा राजकारण काहीसे मागे पडलेले दिसून येत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर जशी मराठा वर्चस्वाची पकड होती

तशी पकड ही वर्तमान राजकारणामध्ये दिसत नाही. संख्यात्मक दृष्ट्या मराठा राजकारण कमी झालेली नाही म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून येणाऱ्या मराठा आमदारांची संख्या कमी झालेली नाही, परंतु गुणात्मक दृष्ट्या मराठा वर्चस्व काहीसे कमी होऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतर जातीचे निर्णय वर्चस्व दिसू लागले आहे. त्यामध्ये ब्राह्मण व तत्सम वरिष्ठ जाती बरोबरच इतर मागासवर्गीय जातींचाही प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे राजकारण मराठा वर्चस्वाचे राजकारण दिसत असले तरी सर्वच मराठा या वर्चस्वाचा राजकारणामध्ये प्रस्थापित नव्हते. जे प्रस्थापित मराठा राजकारणामध्ये होते त्यांनी अपेक्षित मराठा आणि प्रस्थापित मराठा यांचा समन्वय साधण्यासाठी मराठा जातभान जागवले व इतर जातींचा समन्वय साधण्यासाठी ब्राह्मण ब्राह्मणेत्तर चळवळी मधून आलेली बहुजन ही संकल्पना वापरलेली दिसून येते.

समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा जात भान जागृत करून मराठा अस्मितेचे राजकारण करण्याचा प्रयत्न मराठा नेतृत्वाकडून झालेला दिसतो. त्यातून सकल मराठा समाज एकत्र पण होतो परंतु इतर जाती बहुजन राजकारणाच्या नावाखाली मराठा नेतृत्वावर विश्वास ठेवण्यास तयार नसलेल्या दिसून येतात. त्यामुळे वर्तमान परिस्थितीमध्ये मराठा वर्चस्वाचे राजकारण कमकुवत झाल्यासारखे दिसते. बहुजन संकल्पनेमधून राजकीय पटलावर जो वेगवेगळ्या जातींचा समूह तयार होऊन अभिजनांविरुद्ध लढत होता तो आता विखुरलेला दिसून येत आहे. यातून बहुजन राजकारणामध्ये उणीव निर्माण झाल्यासारखे दिसते आहे. महाराष्ट्र मधील वेगवेगळे जाती समूह एकमेकाकडे शंकेने आणि असूयाणे बघत असलेले दिसतात. वर्तमान समाजकारणामध्ये मराठा समूहाचे वर्तन मराठा अस्मितेशी सुसंगत होताना दिसते. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने त्याचा परिचय आलेला आहे. परंतु मराठा अस्मितेशी सुसंगत असणारे

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button