सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 66

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
66
‘सुबोधमाला’ आदी पत्रांमधून त्यांचे सत्यशोधकी प्रबोधनपर लेख, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. ते सिरसगाव सत्यशोधक शाखेचे सचिव होते. बी. एम. गुजर यांना ऐन बावीसाव्या वर्षी क्षय रोगाने ग्रासले. क्षयाच्या आजारात त्यांचे शनिवार, दिनांक १३-१०-१९१७ रोजी सायंकाळी ७ वाजता सिरसगाव येथे निधन झाले.
संदर्भ दिनमित्र अंक ३१-१०-१९१७
गुंदेकर श्रीराम रावसाहेब (जन्म १२ ऑक्टोबर १९५५)
सत्यशोधकी साहित्य-संस्कृती आणि संशोधन परिषदेचे खऱ्या अर्थाने मराठी मुलखात रोपटे रुजवणारे डॉ. श्रीराम गुंदेकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९५५ रोजी मौजे आंबेसावळी, तालुका-जिल्हा बीड येथे झाला. डॉ. गुंदेकर व्यवसायाने प्राध्यापक असून राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे मराठी विभागप्रमुख होते. डॉ. गुंदकर हे इ. स. १९७२ पासून युवक क्रांती दल चळवळीत सहभागी होते. इ. स. २००० पासून अ. भा. सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीत चिटणीस आहेत; तर अ. भा. सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. डॉ. गुंदेकर इ.स. १९९८ मध्ये सत्यशोधक समाज संघटनेत प्रविष्ट होताच त्यांनी लातूर परिसरात आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने सत्यशोधक समाजाचे कार्य विस्तारत नेले.
त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक २ व ३ फेब्रुवारी २००२ रोजी अग्रसेन भवन, लातूर येथे सत्यशोधक समाजाचे ३२ वे अधिवेशन अॅड. वसंतराव फाळके यांच्या अध्यक्षतेखाली घेतले.या सफल अधिवेशनाचे उद्घाटन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी केले. या सफल अधिवेशनानंतर डॉ. गुदेकर यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद स्थापन व्हावी म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास १०० साहित्यिक, अभ्यासक, विचारवंतांना निमंत्रण पाठविले. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी क्रांतिवीर हुतात्मा नानकसिंग यांच्या जयंतीदिनी ही बैठक दिनांक २७ मे २००१ रोजी हुतात्मानगर, सोनवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे घेतली.
या बैठकीला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, नटसम्राट निळू फुले, बाबूराव बागूल, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. भारत पाटणकर, प्रा. बा. ह. कल्याणकर, डॉ. एस. एस. भोसले, नागेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सत्यशोधकी साहित्य परिषदेची स्थापना होऊन डॉ. आ. ह. साळुंखे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर डॉ. गुंदेकर यांच्याकडे सचिवपदाची धुरा देण्यात आली. पुढे डॉ. साळुंके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. गुंदेकरांना सन्मानाने एका बैठकीत अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. दरम्यान, परिषद स्थापन झाल्यावर डॉ. गुंदेकर आणि सत्यशोधकांनी पहिले सत्यशोधकी साहित्य संमेलन बीड येथे व्हावे म्हणून प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश न आल्याने डॉ. गुंदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुक्ताई’ मंगल कार्यालय, लातूर येथे दिनांक २० व २१ डिसेंबर २००३ रोजी पहिले
सत्यशोधकी साहित्य संमेलन घेतले. ही परंपरा रुजविण्यात आणि संगोपित करण्यात गुंदेकरांचा मोलाचा सहभाग राहिला. सातारा येथे आयोजित सहाव्या (३०, ३१ मे २००९) सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. सत्यशोधक मताचा प्रचार आणि प्रसार पुनश्च मराठी मुलखात व्हावा म्हणून त्यांनी अनेक सत्यशोधक मतांचे ग्रंथही सिद्ध केले आहेत. त्यांची सत्यशोधकी ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :- महात्मा जोतिबा फुले विचार आणि वाड्मय, म. जोतिबा फुले : साहित्य आणि साहित्यमूल्ये, सत्यशोधकी साहित्य : परंपरा आणि स्वरूप, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, ग्रामीण साहित्य: प्रेरणा आणि प्रयोजन, राजर्षी शाहू महाराज (नवसाक्षरांसाठी पुस्तिका), सत्यशोधकी साहित्याचा इतिहास, तसेच बळिबा पाटील, ढड्डाशास्त्री पराने, देशभक्त लीलासार, सत्यशोधकी निबंध आदी ग्रंथांचे संपादनही केले आहे. सत्यशोधकी साहित्याच्या इतिहासाचे चार खंड प्रकाशित झाले असून, या सत्यशोधकी लेखनाबरोबर त्यांचा बालकविता संग्रह ‘ढगाची तहान’, ‘उचल आणि लगाम’ आदी कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना साहित्य लेखनाचे सामाजिक संस्थांचे आणि महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संदर्भ – सत्यशोधकी साहित्याचा इतिहास – (खंड पहिला)- प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




