सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.85 चव्हाण श्रीपतराव रामजी

सत्यशोधकाचे अंतरंग
क्रमशा.85

चव्हाण श्रीपतराव रामजी

श्रीपतराव रामजी चव्हाण हे कोल्हापूरकर सत्यशोधक असून, ११ जानेवारी १९११ रोजी स्थापन झालेल्या सत्यशोधक शाखेचे सक्रिय कार्यकर्ते होते. इ. स. १९१४ साली राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक शाखेला सत्यशोधक भवनासाठी कोल्हापुरातील गंगावेशीत मोफत जागा दिली. या जागेवर सत्यशोधक भवन बांधण्यासाठी कोल्हापूरकर सत्यशोधक डोणे, ह. ल. चव्हाण आणि श्रीपतराव चव्हाण यांनी सावकाराकडून कर्ज काढून १२ महिन्यांचा पगार देऊन इमारत निधी उभा केला. या भवनात पुढे सत्यशोधक पुरोहित शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत आणि इतरत्र चव्हाण सत्यशोधकी पुरोहिताचे कार्य करीत असत. सत्यशोधक समाजाचे सहावे अधिवेशन १९१६ साली बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे पार पडले. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी श्रीपतरावांचे काही दिवस निपाणी येथे वास्तव्य होते.

संदर्भ- सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ-१९३३-संपादक-माधवराव बागल

चावक

दत्तात्रय गणेश

दत्तात्रय गणेश चावक हे मौजे अल्हाणवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील सत्यशोधक होत. ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या संपर्कात आल्यावर (सोमठाणे) दत्तात्रय चावक हे सत्यशोधक मत ग्रहण करते झाले. दत्तात्रय चावक यांचा विवाह सत्यशोधक समाजमते संपन्न झाला. या सत्यशोधकी विवाहाला ‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील, ‘प्रबोधन’ कार केशवराव ठाकरे आदी दिग्गज सत्यशोधक उपस्थित होते.

अल्हाणवाडी आणि पंचक्रोशीत शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून १९१४ सालच्या जानेवारी महिन्यात येथे एक जाहीर सभा चावक यांनी आयोजित केली होती. हणमंतराव जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सत्यशोधकी सभेत ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांचे व्याख्यान झाले. या सभेला बीडसांगवी, देऊळगाव, सोमठाणे, बेलतुरी, गंगादेवी आदी गावचे ५०० ग्रामस्थ उपस्थित होते.

सत्यशोधक समाजाचे पाचवे अधिवेशन ११ व १२ मे १९१५ रोजी अहमदनगर येथील बागडे थिएटरमध्ये पार पडले. या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे चावक सदस्य होते.

जहागीरदार दत्तात्रय चावक यांनी शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत सत्यशोधक समाजासाठी विविध ठिकाणी दौरे केले. चावक यांनी एक ग्रंथ सिद्ध करून तो मुकुंदराव पाटलांना अर्पण केला होता.

संदर्भ दीनमित्र अंक ७-१-१९१४, २. सत्यशोधक उत्तमराव माधवराव पाटील यांच्या माहितीवरून

चिकटे

एस. टी.

(जन्म-१४ जून १९५६)

डॉ. एस.टी. चिकटे हे चंद्रपूर येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १४ जून १९५६ रोजी झाला. ते उच्चविद्याविभूषित सत्यशोधक असून, पेशाने शिक्षक आहेत. गेल्या वीस वर्षांपासून ते चंद्रपूर जिल्हा सत्यशोधक चळवळीत कार्यरत आहेत. सध्या ते चंद्रपूर जिल्हा शाखेचे सचिव आहेत.

डॉ. चिकटे यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. सत्यशोधक समाजाच्या प्रचार-प्रसारासाठी व्याख्याने, तसेच वर्तमानपत्रातून ते लेखन करीत असतात. त्यांना शासनाच्या वतीने आणि समाजाकडून पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे.85

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button