सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 80

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
80

करून ‘वाई’ पंचक्रोशीत सत्यशोधकी विचार रुजविले-संगोपित केले. दिनांक ७ मार्च १९२६ रोजी सातारा जिल्हा सत्यशोधक समाजाचे एकदिवसीय अधिवेशन वाई येथे संपन्न झाले. वाई येथील सिद्धेश्वराच्या वाळवंटात संपन्न झालेल्या या अधिवेशनाला आठ-नऊ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. कोल्हापूरकर सत्यशोधक बाबूराव यादव, पुणेकर अॅड, केशवराव बागडे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, जलसाकार सोनोपंत कुळकर्णी आदी बिनीच्या सत्यशोधकांनी या अधिवेशनाला मार्गदर्शन केले होते. या सफल अधिवेशनामध्ये नारायणराव चव्हाणांचे परिश्रम होते.

इ. स. १९३३ पर्यंत सत्यशोधक समाजात कार्यरत असलेल्या सत्यशोधक नारायणराव चव्हाण यांचे २१ जानेवारी १९६० रोजी वार्धक्याने वाई येथे पहाटे निधन झाले.

संदर्भ – १) नारायणराव चव्हाण स्मृतिग्रंथ संपादक – रामराव कृष्णराव बाबर, २) अ. भा. स. स. अध्यक्ष भास्करराव जाधवांचे पत्र दि. २१-३-१९२७

(२९-१०-१९१३-१०-०४-१९३)
चव्हाण रा. ना.

सत्यशोधक मूलगामी व्यासंगी, चिंतक, लेखक, ब्राह्मो समाज-प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते, इहवादी विचारवंत, दलितमित्र रामचंद्र नारायणराव चव्हाण यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९१३ रोजी वाई (नावेचीवाडी), जिल्हा सातारा येथे झाला, पुढे आई यशोदाबाई आणि सत्यशोधक वडील नारायणराव चव्हाण यांनी त्यांच्या शिक्षणाची काळजी वाहिली. रा. ना. चव्हाणांचे प्राथमिक शिक्षण वाईच्या रविवार पेठेलगतच्या साठे यांच्या वाड्यात नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. पुढे वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. नंतर पुणे येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधून इ. स. १९३५ साली ते मॅट्रिक झाले. १९३६-३७ साली ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून प्रथम वर्षाची परीक्षा

पास झाले आणि येथेच त्यांचे शिक्षण थांबले.

पुणे येथील वास्तव्यात ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कर्तृत्वाकडे आकर्षिले गेले. त्यांचे महर्षीकडे जाणे-येणे वाढले. (यापूर्वी महर्षीचे वास्तव्य वाईस नारायणराव चव्हाणांकडे काही दिवस होते). महर्षीपासून लेखनाची प्रेरणा घेऊन त्यांनी ‘ब्राह्मधर्म आणि बहुजन समाज’ हा पहिला वैचारिक लेख शब्दबद्ध केला. असे असले तरी वाई येथील शालेय जीवनापासून त्यांनी अनेक हस्तलिखित अंक काढले. त्यातील एक अंक महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वावरही आहे. ‘ब्राह्मधर्म आणि बहुजन समाज’ हा लेख १९३६ साली ‘सुबोधपत्रिका’मध्ये प्रसिद्ध झाला.

पुढे शिक्षण थांबल्यावर रा. ना. चव्हाण नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे नाशिक, देवळाई, ठाणे (अंबरनाथ), सातारा आदी ठिकाणी नोकरी करून रा. ना. चव्हाण सेवानिवृत्त झाले. सातारा येथील वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी वाचन, चिंतन, मनन करून सातत्याने लेखन केले.

संस्कार, सत्संग आणि व्यासंग आदी रा.नां. च्या लेखनाचे बलस्थान होते. सात्त्विक अभ्यासक आणि समन्वयवादी भूमिका हे रा.नां. चे ठळक वैशिष्ट्य होय. महात्मा फुले यांच्या विचारांशी समरस होऊन त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘ज्योती निबंध’ ग्रंथ शब्दबद्ध करण्यास प्रेरित केले. वाई येथील शिवाजी वाचनालयाचे आणि बाई ब्राह्मो समाजाचे सचिवपद काही

काळ त्यांनी सांभाळले. ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक चळवळ, ब्राह्मो समाज, प्रबोधनपर, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र निर्मिती, दलित प्रश्न, बहुजनवाद, सामाजिक चळवळी, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारधन, शिवाजी महाराज, महात्मा फुले आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. या वैचारिक लेखांची संख्या १५०० च्यावर असून महात्मा फुले आणि त्यांच्या चळवळीच्या अनुषंगाने ५१२ लेखांचे लेखन उपलब्ध आहे. या विपुल लेखांपैकी असंख्य लेख अप्रकाशित आहेत. या लेखांच्या व्यतिरिक्त रा.नां. च्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथांची जवळपास छापील पाने ३३०० च्यावर आहेत.

रा. ना. चव्हाण यांना इ. स. १९८३ साली महाराष्ट्र शासनाने ‘दलित मित्र’ पुरस्कार देऊन गौरविले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून त्यांना मानद पदवी बहाल केली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button