विनम्र अभिवादन! डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांच्या निधनानंतर अकराव्या दिवशी पुष्पांजली गोडाचा कार्यक्रम संपन्न!

विनम्र अभिवादन! डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांच्या निधनानंतर अकराव्या दिवशी पुष्पांजली गोडाचा कार्यक्रम संपन्न!
🍄🍄🟫🪸🌾💐🌷🌹🥀🪻🪷🌺🌸🌻🌼🍏🍎🍐🍊🍋🍋🍋🟩🍉🍇🍓🫐🍈🍒🍑🍍🍍🥥🥝🟣🟡🟠🔴
डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी लिंगे बी ए एम एस/MS/ स्त्री रोग तज्ञ बालरोग तज्ञ यांचा निधनाचा अकरावा सुतक फेडणे चार खांदेकरी यांना गोडाचे जेवण अकरा सुहासिनीना सौभाग्य लेणं देऊन गोडाचे जेवण पाहुणे मंडळींना मित्र सहकारी परिवारांना गोड जेवण पुष्पांजली चा कार्यक्रम 15 जुलै 2024 रोजी सकाळी अकरा वाजता स्मशानभूमी पेनुर मध्ये विसाव्याच्या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यात आला आज सुद्धा काक स्पर्श झाला नाही यावेळी सत्यशोधक शंकराव लिंगे म्हणाले आता आधुनिक धकाधकीच्या युगामध्ये दहावा तेरावा अकरावा कार्यक्रम रद्द करावा सर्व अंत्यविधीचे कार्यक्रम तीन दिवसात संपवावेत
अशी प्रथा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरच्या बऱ्याच तालुक्यामध्ये चालू आहे अंत्यविधी साधेपणाने सत्यशोधक पद्धतीने करण्याचे लिंगे यांनी अहवान केले जयश्री यांच्या निधनाबद्दल पांडुरंगाचे व डॉक्टर जयश्री लिंगे गवळी प्रतिमेचे पूजन ज्ञानेश्वरी चे वाचन पसायदान नंतर जयश्रीच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी पुष्पांजली झाली पूजन करून सर्व शोकाकुल लिंगे गवळी परिवाराने जयश्रीच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले शोक व्यक्त केला डॉक्टर प्रशांत केराप्पा गवळी कुमार साई जय श्री प्रशांत गवळी सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी वस्त्र डोक्यावर घालून धुुकटे काढले सुतक फेडण्यात आले अकरा सुहासिनी चार खांदेकरी यांना सर्व पाहुणे मंडळींना गोड जेवण देण्यात आले त्यांचे आभार मानण्यात आले पेनुर माळवाडी येथे डॉक्टर जयश्री गवळी यांच्या नावाने वडाचे झाड लावण्यात आले
शिवाजी पटकळे महाराज व अशोक गवळी गुरुजी
चि.साई गवळी व कु सिद्धी गवळी
डॉ. प्रशांत गवळी
के टी गवळी
सौ.निर्गुणा गवळी
सौ भारती भुजबळ
श्री चेतन गवळी
श्री तानाजी गवळी
श्री अनिल गवळी
श्री कांतीलाल गवळी
श्री भाऊसाहेब गवळी
श्री रामचंद्र डोके
श्री राहुल चव्हाण
श्रीमती शांताबाई गवळी
पेनुर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोहोळ पंढरपूर रोड पेनुर येथे गवळी यांच्या राहत्या घरी सर्व लिंगे गवळी परिवारातील शोकाकुल पाहुणेमंडळी मित्रमंडळी नातेवाईक भाऊ की यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती शोकाकुल: लिंगे, गवळी परिवार🟥
🔵🔴🟠डॉ. जयश्री प्रशांत गवळी BAMS MS स्त्रीरोगतज्ञ (सत्यशोधक उद्योगपती ओबीसी नेते अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे व सौ सुनंदा शंकरराव लिंगे यांची लाडली दि ग्रेट जेष्ठ कन्या) शुक्रवार दि ०५-०७-२०२४ रोजी दुपारी एक वाजता जीवन यात्रा भुलीचे इंजेक्शन देऊन संपविण्यात आली दुःखद अकस्मात निधन झाले.
🛑🟠🔵🔴🟨🟥🟦डॉक्टर जयश्री लिंगे-गवळी यांचा जन्म २० जानेवारी १९८५ रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला. लिंगे कुटुंबांमधील ती पहिलीच मुलगी असल्याने लिंगे परिवारात सर्वांची लाडकी होती सर्व लिंगे परिवारामध्ये तिला मानाचे स्थान होते सर्वजण तिचा सन्मान करत होते आदर्श घेत होते तिच्या प्रेरणेने भावाच्या चार मुली डॉक्टर झाल्या मी गर्वाने सांगत होतो मी डॉक्टर नाही एमबीए नाही इंजिनीयर नाही परंतु मी या सर्वांचा बाप आहे मुलगी डॉक्टर मुलगा इंजिनियर मुलगा एमबीए आहे तिच्या जन्मानंतर लिंगे कुटुंबाची अतिशय वेगवान प्रगती झाली KG ते १०वी पर्यंत शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये शंकरराव मोहिते-पाटील इंग्लीश स्कूल, धवलनगर, अकलुज येथे झाले.
११ वी १२वी सायन्स साईडने सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज येथे झाले. BAMS वैद्यकिय शिक्षण विजापुर येथील BDL कॉलेज मध्ये झाले. नंतर २००९-१० युनिक हॉस्पिटल सोलापूर येथे स्त्रीरोगतज्ञ बालरोग निदान तज्ञ म्हणुन प्रॅक्टिस केली.०९ डिसेंबर २०१० रोजी त्यांचे लग्न डॉ. प्रशांत केराप्पा गवळी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या बरोबर झाले. दोघांनीही पेनुर मधील सावता माळी शॉपींग सेंटर मधील एका गाळ्यामध्ये वैद्यकिय सेवेचे काम चालु केले. तेथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतःचे पेनूर मध्ये सहा गुंठे जागेत
पंढरपुर रोड सुसज्ज असे बांधकाम करुन श्री साईकृपा हॉस्पिटल नावाने सेवा चालु केली. त्यामध्ये डिलेव्हरी, महिलांचे रोग, बालरोग X-Ray, सोनोग्राफी, सर्व तपासणीचे लॅब लहान मोठी ऑपरेशनची सेवा देत होते. डॉ. जयश्रीने बेळगांव जिल्हातील बेलहुंगल कॉलेजमधून लग्नानंतर M.S.ची डिग्री संपादन केली त्यांना बालरोग निदान करण्याचाही चांगला अनुभव होता. डॉक्टर जयश्री लिंगे परिवारातील पहिल्या केजी ते पीजी शिकलेल्या उच्चशिक्षित होत्या त्याचा मला अभिमान वाटतो!
त्यांचे पती प्रशांत गवळी यांचे कोडोली-कोल्हापूर येथे BAMS झाले होते. त्यांनीही लग्नानंतर M.D. मेडिसीन ची डिग्री कर्नाटकातून मिळवली. दोघांच्या सहकार्याने चांगली वैद्यकिय सेवा सोलापुर, पंढरपुर शहरापेक्षा ४०- ते 50 टक्के कमी दराने देत होते. तरीसुद्धा महिन्याला सात-आठ लाख रुपयांचे प्रॅक्टिस जयश्रीचे होते डॉ. जयश्रीची सेवा २४तास चालु होती, त्यामुळे त्यांचे नाव पेनूर आणि आसपासच्या २०-२५ गावात प्रसिद्ध झाले होते. डॉ. जयश्री गवळी हिचा स्वभाव प्रेमळ, कनवाळू दयाळू मनमिळाऊ हर्ष उल्हासित आणि सेवाभावी होता. त्यांना महाराष्ट्र मध्ये मेडिकल प्रवेश मिळाला नाही तरी तीने डॉक्टर बनण्याची जिद्द सोडली नाही. कर्नाटक मध्ये प्रवेश मिळवुन कन्नड भाषेतील अभ्यासक्रम समजून घेऊन मेडिकलचे पेपर इंग्लिश मध्ये देऊन डॉक्टर बी. ए.एम.एस. ही पदवी जिद्दीने मिळवली.
त्यांना हिंदी मराठी इंग्लिश कन्नड भाषा चांगल्या बोलता येत होत्या जिद्द, चिकाटी, अहोरात्र परिश्रम करण्याची सचोटी वाखाणण्याजोगी होती. डॉ. जयश्री यांना स्वयंपाकातील निरनिराळे १५० पदार्थ बनवण्याचीही कला ट्रेनिंग हस्तगत केले होते सु गृहिणी होत्या. कोणतेही काम करण्यास लाजत नसत, नकार देत नव्हत्या.कामगार आला नाही तरी त्यांचे सर्व काम बाथरूम साफ करण्यापासून झाडलोट, धुणेभांडी, स्वयंपाक स्वयंस्तुतीने आनंदाने करत होत्या. हरहुन्नरी कष्टाळू स्वाभिमानी अभिमानी स्वयंपूर्ण सेल्फ होत्या.त्यांना भाषण करणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे, कार्यक्रमाचे आधुनिक नियोजन करणे, कोणत्याही सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणे इत्यादी गोष्टीची ही आवड होती. कोणत्याही गोष्टीचा अहंकार नव्हता अशा गुणी आदर्श डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌸🌺🍁🪸🪷🪻🌷🌹🥀🍏🍎🍐🍊🍋🍋🟩🍌🍉🍇🍓🫐🍈🍒🍑🥭🍍🥥🥝🍅🍆🥑🫛🥦🥬🥒🌶🫑🌽
🛑🟠🔴


