मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 59

मराठा आरक्षण विरुद्ध एडवोकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
59
प्रयत्न केला. पण लालूप्रसाद यादव यांनी तर स्त्रियांना बिहार मध्ये पंचायत राज पासून संसद उमेदवार पर्यंत ५० टक्के आरक्षण देऊन टाकले.
भूतपूर्व ओबीसी नेते खासदार शरद यादव यांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात दिलेली मुलाखत you tube वर आहे. ते म्हणतात,
हिंदुस्थान की मा गुलाम है जाती के चलते और जाती तुटती नही है इसीलिए 33 प्रतिशत क्यू मै कहता हु कि सौ प्रतिशत दिजीये और अगर आरक्षण देना है तो दलित शूद्र पिछडे वर्ग की महिलाओं को संपूर्ण आरक्षण देना चाहिए आप क्यू नही मुसलमान महिला को हिसा देंगे पुरी पार्लमेंट मेरे सामने हम बस करके थक गये है.
“जर ३३ टक्के आरक्षणात ओबीसी स्त्रियांना कोटा दिला नाही तर मी माझे शिर अर्पण करीन, आणि हे बिल ओबीसी महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. म्हणून एस सी, एस टी सोबतच लोकसभा आणि राज्यसभेत तेव्हाच पारित होईल जेव्हा ओबीसी स्त्रियांना कोटा मध्ये त्यांच्या संख्ये प्रमाणात कोटा द्यायला हवा.” असे म्हणणाऱ्या शरद यादव यांना या देशातील उच्चवर्णीय
स्त्रियांनी असुर ठरवले.
आधीच ओबीसी या शब्दाबद्दल देशात एक प्रकारचे नकारात्मक आणि घृणेचे वातावरण आहे. परंतु ओबीसी नेते शरद यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्या वक्तव्यावर एवढी राळ का उठली? कारण शरद यादव यांच्या भाषणातील एक वाक्य सर्व राजकीय पक्षातील स्त्री प्रतिनिधी, माध्यमं आणि स्त्री आंदोलनाने लक्ष्य केले. हे सगळे ओबीसी स्त्रियांच्या बाजूने असूनही शरद यादव यांच्या भूमिकेच्या विरोधात गेले. हे वाक्य होते, ये सब पर कटी औरते।
सर्व माध्यमांनी त्यावरच आपले लक्ष केंद्रित केले आणि माननीय शरद यादव यांचे सर्व स्त्रियांना आरक्षण मिळण्या संदर्भातील अतिशय मुद्देसूद, तर्कशुद्ध भाषण पुरोगामी ब्राह्मणवादी स्त्रियांनी ऐकले नाही. आणि हे नेमके भाजपा आणि आरेसेस सारख्या कमंडलू प्रवृत्तीच्या पथ्यावर पडले.
कळतनकळत ३३ टक्के महिला आरक्षणात ओबीसी स्त्रियांना त्यांच्या (अंधश्रद्ध होण्याची जी तक्रार याच करतात) अंधश्रद्धेत लोटण्याचे काम सर्व पक्षातील उच्चवर्णीय स्त्रियांनी केले. ज्यांनी कधी नांगर चालवला नाही, गोफण फिरवली नाही, ऐरणीवर कधी लोहे तापवले नाही, कधी मडकी बनवली नाही, कधी शेतातून धान्य काढून टोपलीतून, पातीतून डोक्यावर वाहिली नाही, कधी गुरे राखली नाही. दूध दुभते केले नाही, कधी गवताच्या गंज्या, भारे वाहीले नाहीत की ५ किलोमीटर दुरून पाणी आणले नाही… त्यामुळे यांनी आमच्या चुलीवर एक दिवस चहा केला तरी त्यांची तसबीर पत्रकार त्यागाचे प्रतीक म्हणून कौतुक करतात. त्यांनी हे केले पाहिजे असे असे मुळीच नाही. पण एखाद दिवशी सेल्फी/पापाराजी पत्रकारांसाठी करून त्या कष्टकरी समाजाच्या प्रतिनिधी किंवा नेतृत्वाकडे करू शकतात? त्यांनी आपल्या शिक्षण व संशोधन जोरावर सहयोगी व्हावे परंतु नेतृत्व तळागाळातील कर्तबगार स्त्रियांनी करावे. यांनी निवडणुका जिंकाव्या किंवा त्यांना आयती पदे मिळतीलच अभिनेत्री, लेखिका आणि विद्वान म्हणून पण आज अशा कष्टकरी स्त्री पुरुषांच्या खऱ्या प्रतिनिधींना नाकारल्या मुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आणि लोकतंत्र, रयतेचे गणराज्य बाजूला ठेवून संविधान बस्त्यात गुंडाळून हुकूमशाही वाढत चालली आहे. त्यात आज सर्वात जास्त ज्यांना शूद्र, अतिशूद्र, बहिष्कृत मानले गेले, वंचित ठेवले त्यांचा बळी जातो आहे. म्हणूनच आज फुले, शाहू, पेरियार, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाला मानणाऱ्या सत्यशोधक ओबीसी चळवळीने आपला विस्तार सर्व आघाड्यांवर केला पाहिजे. प्रत्येक जातीचे स्वतंत्र संघटन, त्यातील स्त्रियांचे स्वतंत्र संघटन आणि ओबीसी संघटनेत आपल्या जाती संघटनेचा सहभाग, प्रतिनिधित्व अशा संयुक्त ओबीसी आघाड्या देशभर स्थापन व्हायला हव्यात.
देशभरात शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि राजकारण यात ओबीसी आरक्षण आणि ओबीसी महिला आरक्षण मिळण्यासाठी आता मंडल ते सच्चर, मिश्रा ते नचीअप्पन, रेणके ते गायकवाड ते रोहिणी आयोग, ज्या शिफारशी ओबीसी समूहाच्या फायद्याच्या आहेत, त्या घेऊन आपण या उच्च वर्णीय समूहाला एक उत्पादक, उद्योजक आणि निर्मिती समूह म्हणून आपली राजकीय ताकद दाखवायला हवी.
कारण ओबीसी स्त्रियांचा एक दैदिप्यमान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पातळीवर क्रांतिकारक असा वारसा आपल्याजवळ आहे. जेव्हा या उच्च वर्षीय समूहातून कुणी गुलामगिरी विरुद्ध लढल्या नाही तेव्हा या आज ओबीसी समूहात असलेल्या, शूद्र गणल्या गेलेल्या स्त्रियांनीच विद्रोह केला, विद्रोहाचे नेतृत्व केले, शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली, विद्यादान केले, प्रत्येक क्षेत्रात प्रथम आपला ठसा उमटवला तो या बहुजन ओबीसी जातीतील स्त्रियांनी.
मग ती महाराणी जिजाऊ, असो की महाराणी अहिल्या होळकर असू दे, जनाबाई असू दे की महदंबा, फुलो जाणो असू दे की राणी दुर्गावती, राणी चांदबी असू दे की झलकारी, मुक्ता साळवे दे की ताराबाई कृती, डॉ रखमा.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




