सोशल

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

1) सरकारचा आधार आणि जरांगे यांचा जनाधार संपला: नवनाथ वाघमारे

ओबीसी आरक्षण आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर आज पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारचा आधार आणि जरांगे यांचा जनाधार आता संपला आहे त्यामुळेच त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांची रसद

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुख्यमंत्री रसद पूर्वत होते असा आरोप करत जरांगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शिवराळ भाषा वापरून मराठा समाजाचा अपमान केल्याचा देखील नवनाथ वाघमारे म्हणालेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सध्या सरकारला तारीख वाढवून दिली आहे. मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यासाठी ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीविरुद्ध ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आल्यानंतर नवनाथ वाघमारे बोलत होते.

2) शरद पवारांनी जरांगे-पाटलांच्या मागणीविषयी भूमिका स्पष्ट करावी : प्रकाश आंबेडकर

खा. शरद पवारांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. मराठा व ओबीसी समाजामधील सामाजिक दरी कमी करण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचे काम होत असल्याचा आरोप वंचित प्रमुख अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.

माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी आरक्षण यात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी अॅड. आंबडेकर पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी फाटे फोडण्याचे काम सुरू आहे. राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सध्या मतांचे राजकीय भांडण चालू आहे. ते राजकीय राहावे. सामाजिक सलोखा बिघडू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या गावात जिल्ह्यात शांतता राखणे हे आपले काम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर उपस्थित होत्या.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button