सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः56

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः56

प्रस्तुत जलशात काम करीत. या गावी उत्तमराव कडू यांच्या मालकीचा आणखी एक जलसा होता. संदर्भ- १. सत्सार स्मरणिका २०१० सतीश जामोदकर यांचा लेख

खोंड (खोंडे) सखाराम पाटील

सखाराम खोडे पाटील इसारवाडी (विसारवाडी), तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद या सत्यशोधकांचा, सत्यशोधक दस्तावेजांमध्ये ‘सखाराम खोड पाटील’ असा उल्लेख आढळतो, सखाराम पाटील इसारवाडीचे सत्यशोधक असले तरी त्यांचे मूळ वतनाचे गाव मौजे चौका, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद असून त्यांच्या पूर्वजांनी चौका गावावरून इसारवाडी येथे स्थलांतर केले आणि त्यांचे वंशज कायमचे इसारवाडीकर झाले.

सखाराम खोड पाटील यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बहुधा खाजगी शाळेत अक्षर ओळख होण्यापर्यंत त्यांचे शिक्षण झाले असावे. सत्यशोधक पत्रकारितेचे उद्‌गाते, दीनबंधु पत्राचे आद्य संपादक, कडवे

सत्यशोधक कृष्णराव पांडुरंगराव भालेकर इ. स. १८९७ ते १९०० च्या दरम्यान मराठवाडयातील होऊ घातलेल्या हैदराबाद मनमाड लोहमार्गावरील कामावर ओव्हरसियर म्हणून काम पाहत होते. पुढे १९०० साली औरंगाबाद – पैठण या नव्याने होऊ घातलेल्या सडकेचे काम पाहत होते. या सडकेच्या भरावाचे काम इसारवाडी गावाजवळ (जायकवाडी प्रकल्प होण्याअगोदरचा रस्ता, हा रस्ता १९७४ साली जायकवाडी धरणाच्या पाण्याखाली गेला. दरम्यान, इसारवाडी गावाचे पुनर्वसन होऊल आजच्या औरंगाबाद पैठण रस्त्यावर हे गाव चसले आहे.) आल्यावर कृष्णराव भालेकरांची इसारवाडीकर सखाराम खोंडे पाटलांशी ओळख झाली. या ओळखीतून मैत्री झाली. कृष्णराव भालेकरांनी सखाराम खोंडे पाटलांच्या सहकार्याने इसारवाडीत सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. नेऊरगावनंतर मराठवाड्यातील इसारवाडीची ही अ. भा. सत्यशोधक

समाजाची दुसऱ्या क्रमांकाची शाखा होय।

इसारवाडी येथे शाखा स्थापन झाल्यावर कृष्णराव भालेकर संध्याकाळचे जेवण आटोपल्यावर कामावरील मजूर आणि इसारवाडीकर गावकऱ्यांसमोर सत्यशोधक समाजमतावर भाषणे देत असत. या दिवेलागणीनंतरच्या नित्याच्या व्याख्यानमालेमुळे पुढे पैठण तालुक्यातील मावसगव्हाण, धूपखेडा आदी गावी सत्यशोधक चळवळ रुजलेली दिसते. यासाठी सखाराम पाटलांनी आपल्या परीने परिश्रम घेतले असावेत.

संदर्भ – १. सत्यशोधक मित्र: हाजी काझी वकील, पैठण जी. ए. उगले, २. नामदेवराव भानुदासराव खोडे-इसारवाडीकर यांचे निवेदन

खोंड (खोंडे)
भानुदासराव एकनाथराव (सुमारे१९१० – १९९०)

भानुदासराव एकनाथराव खोंड (खोंडे) पाटील हे मौजे इसारवाडी (विसारवाडी), तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म सुमारे १९१० साली इसारवाडी येथे झाला. भानुदासरावांकडे साठ एकर जमीन होती. इसारवाडी येथील सत्यशोधक शाखेचे संस्थापक सखाराम खोंड पाटलांचे ते नातू होते.

भानुदासराव खोंड पाटील हे निरक्षर असले तरी त्यांच्याकडे तरवडीहून प्रसिद्ध होणारे सत्यशोधक ‘दीनमित्र’ पत्र नियमित येत असे. चिरंजीव नामदेवराव यांच्याकडून ते या पत्राचे वाचन करून घेत असत. या पत्रातील ‘आसूडाचे फटके’ सदर विशेष मन लावून ऐकत असत. दीनमित्रकार मुकुंदराव पाटलांचा शेटजी प्रताप’ हा काव्यग्रंथ त्यांच्या संग्रही होता. या काव्यग्रंथाचे त्यांनी अनेकदा अनेकांकडून वाचन करून घेतले होते, तसेच ‘दीनमित्र’ मधील निवडक अग्रलेखांचा इ. स. १९५६ साली प्रसिद्ध झालेला ‘विचारकिरण भाग २’ हा वैचारिक ग्रंथ आगाऊ किंमत (दीड रुपया) देऊन खरेदी केला होता. तसेच इसारवाडी येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन ना. भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button