सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 58

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 58

वर्णीय लोकांबरोबर स्पर्धेत रहा म्हणायचे पण तुम्ही आमच्या पासंगाला पुरत नाही, असे हिणवत राहायचे. आणि त्यांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय ते राजकारण इथे फक्त टोकन किंवा दर्शनी प्रतिनिधी म्हणून ठेवायचे.

मंडल आयोगा नंतर या देशातील सर्व धर्मातील ओबीसी संघटित होऊ लागले. त्यांना आरक्षण मिळू नये म्हणून इंद्रा साहनी खटला चालवला. क्रिमी लेअर ची अट घातली. एकूण ६९ टक्के (तमिळनाडू पॅटर्न) टक्के आरक्षण देणे दूरच होते तर किमान ५२ टक्के देण्याऐवजी त्यांनी ओबीसीना २७ टक्के वर समाधान मानायला लावले. त्यातही श्रेण्या तयार केल्या. अशा श्रेण्या एस सी, एस टी मधील क्रिमीलेअर साठी लावण्यात आलेल्या आणि आता EWS मध्ये सांस्कृतिक क्रिमीलेअरची अट घातलेली दिसत नाही.

ओबीसी वर्ग हा साधारणतः शेतीकाम, शेतीकाम संबंधित उद्योग, व्यवसाय व बारा बलुतेदारी मधील विविध कारागिरी, निर्मिती व्यवसाय मध्ये गुंतलेला वर्ग आहे. यांच्या व्यवसायामुळे जाती पाडण्यात आल्या असे युक्तिवाद थिटे पडतील अशी वस्तुस्थिती आहे. मुळात आपल्या व्यवसायातील कौशल्य कुंभार, शिंपी, सुतार, लोहार, सोनार, पितळी, तांबे कारागीर, अशा अनेक कौशल्य असणाऱ्या जातींमधील स्त्री पुरुष आज एका मोठ्या इंडस्ट्रीच्या छताखाली काम करत आहेत. मजूर म्हणून. त्यांचे कौशल्य आज कामगार म्हणून केंद्रित करून यांचे मालक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि सवर्ण जाती समूहातील लोक त्यांच्या श्रमावर आपली बाजारपेठ उभी करून शोषण करत आहेत. पण या मालकांना हे व्यवसाय करूनही या जातींचे म्हंटले जात नाही.

याचा अर्थ असा की या जाती हीन आणि मागास मानल्या जातात. म्हणून त्यांच्या उन्नती साठी ओबीसीची रीतसर जातनिहाय जनगणना करून त्यांना आरक्षण (संधी, सवलत आणि उत्तेजन) मिळणे आवश्यक आहे. ओबीसी हा एकमेव प्रवर्ग असा आहे की तो सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरील शेती व शेती आधारित तसेच विविध पारंपरिक व्यावसायिक कौशल्य असणारा बहुजन जातींमध्ये विभागलेला उत्पादक वर्ग आहे. ही खरी या देशातील मोठी जैविक आणि हस्त व कुटीर उद्योगाची बाजारपेठ आहे. हा बाजार या त्रिवर्ण जातींनी आपल्या देवी देवता आणि धर्म यांच्याशी जोडून ठेवला आहे. आणि आपले पोट यांच्यावर आधारित आहे तर बंड कसे करायचे? अशा एका मानसिक संकटात या समाजाला अडकवले आहे. आपला नवरा, आपला मुलगा, आपला बाप आपल्याला छळत असेल तर कौटुंबिक छळा विरुद्ध कायदा असला तरी स्त्रियांची जशी बोटे अडकली असतात, तशीच स्थिती ओबीसी समूहाची आहे.

यातील अनेक पुरुष व्यवसाय हातचे निघून चालले म्हणून जबरदस्तीने स्थलांतरित झाले आहेत. किंवा जीवन निर्वाह करण्यासाठी स्थलांतर करून घर शेती स्त्रियांच्या जीवावर सोडून निघाले आहेत. आपल्याला दिसतं की त्यामुळे स्त्रियांचे दारिद्रयकरण जसे झाले तसेच त्यांचे आज त्यांच्या पारंपरिक व्यवसायाच्या दोऱ्या त्यांच्या हाती आली तरी त्यांना आज मजूर म्हणून काम केल्याशिवाय त्यांच्या उद्योगाला हात लावता येत नाहीत.

अशा परिस्थितीत मंडल आयोगाने सांगितलेले मागास वर्गचे अकरा निकष या स्त्रियांच्या

स्थितीनुसार त्यांची जात आणि कुटुंबाला लागू होतात.

ओबीसी संघटना व काही ओबीसी असंवेदनशील नेत्यांनी असो किंवा जे कुणी मराठा, जाट, गुजर, राजपूत, पटेल इत्यादी समूह ओबीसी आरक्षण साठी सरसावत आहेत त्यांनी या निकषांचा अभ्यास केलेला दिसत नाही. तसे असते तर त्यांच्या संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या स्त्रियांची मागास स्थिती आधारित मागण्या प्रामुख्याने आढळल्या असत्या, परंतु मंडल ते सच्चर कमिशन असो यातील स्त्रियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, दैनंदिन श्रम विभागणी. त्यासाठी वणवण आणि आर्थिक दृष्ट्या संसाधन विहीन अशा सर्व पातळ्यांवरील पिछेहाट या निकषांवर ओबीसी प्रवर्ग उभा आहे.

म्हणून आज महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या

स्त्री-पुरुष समतेच्या, समानतेच्या तत्त्वज्ञानाची पुन्हा एकदा पेरणी करण्याची, प्रसार करण्याची गरज आहे. तात्यासाहेबांची प्रत्येक सभा सर्व कष्टकरी स्त्री आणि पुरुष यांना संबोधल्या शिवाय आणि दोघांच्याही उन्नतीचा एकसाथ विचार केल्याशिवाय पूर्ण होत नसे.

आज जसे काही ओबीसी संघटन, राजकीय आघाडी यांनी आपल्या महिला विंग उभ्या केल्या त्या केल्याशिवाय आज पर्याय नाही, ती खरी आपल्या महानायक महानायिकांची स्त्री-पुरुष सहजीवनाची शिकवण आहे. आणि सर्वात जास्त ओबीसी समूहात स्त्रिया आणि पुरुष बरोबरीने काम करत होते.

आता जेव्हा आपण ओबीसी पुरुषांचा राजकारणातील सहभाग बघतो तेव्हा त्यांनी तिथे आरक्षण मागितले नाही, ते जेव्हा तिथे आरक्षण मागतील तेव्हा आम्ही सुद्धा ओबीसी स्त्रियांच्या आरक्षणाचा विचार करू असे गीता मुखर्जी आयोग म्हणतो. अशा प्रकारे ओबीसी स्त्रियांच्या आरक्षण विषयक शरद यादव, मुलायम सिंग, लालू यादव, यांच्या मागणीला त्यांनी स्त्री विरोधी रूप देण्याचा

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button