सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः54

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः54

खराट संभाजी
(जन्म ५-१-१९६५)

डॉ. संभाजी शिवाजीराव खराट यांचा जन्म मौजे गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे ५ जानेवारी १९६५ रोजी झाला. डॉ. संभाजी खराट यांचे मूळ गाव गोंदी असल्याने त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गोदी येथेच झाले. पुढे ते डॉ. बाचासाहेब आंबेडकर विद्यापीठातून उच्चविद्याविभूषित झाले. (बी. ए., बी. जे., एम. जे.) पुढे त्यांनी ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या पत्रकारितेवर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. दरम्यान, १९९२ मध्ये औरंगाबाद येथे त्यांचा विवाह सत्यशोधकी विवाहमते संपन्न झाला. आयुष्याच्या उमेदवारीचा प्रारंभ त्यांनी ‘दैनिक मराठवाडा’ आणि ‘दैनिक तरुण भारत’मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत राहून केला. पुढे कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत रुजू झाले. २०१० सालापासून ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या ‘लोकराज्य’ या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

डॉ. संभाजी खराट शासकीय नोकरी सांभाळून नियमित सत्यशोधक समाज संघटन चळवळीत सहभाग नोंदवितात. महात्मा फुले आणि सत्यशोधक जलसे (१९९०), सावित्रीबाई फुले (१९९४), शेतकऱ्यांचा कैवारी (१९९४), महात्मा फुले यांचा सत्यधर्म (१९९६), महात्मा फुले आणि निर्मिक (१५ जून १९९९), सत्यशोधक चळवळ वाटचाल आणि चिकित्सा (जुलै २००५) आदी त्यांचे सत्यशोधक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘सत्यशोधक पत्रकारिता’ हा त्यांचा आगामी सत्यशोधक ग्रंथ असून, मराठी मुलखातील संपादकांची त्यांनी या ग्रंथात दखल घेतली आहे. दरम्यान, ७ व ८ मे २०१० रोजी संपन्न झालेल्या गेवराई, जि. बीड येथील सातव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनात त्यांची प्रकट मुलाखतही झाली होती. या मुलाखतीत त्यांनी सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक वाङ्मयाची मूलगामी चिकित्सा केली होती. पुढे २२ व २३ फेब्रुवारी २०१३ रोजी लातूर येथे संपन्न झालेल्या आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सत्यशोधक साहित्यावर मूलगामी विचार मांडले.

खरात
सदाशिवराव महादजी
(सुमारे १९१० – २००३)

बुलडाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या सत्यशोधकी विचाराने प्रभावित झालेले मौजे जांभोरा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा येथील डॉ. सदाशिवराव खरात यांचा जन्म जांभोरा येथे सुमारे १९१० साली झाला, चिखली येथून इयत्ता सहावी पास झाल्यावर त्यांना त्याकाळी देवी डॉक्टरची नोकरी मिळाली. सरकारी कर्मचारी असल्याने उघड नाही; पण भूमिगत राहून पं. सी. पाटील आणि आनंदस्वामीच्या कार्यात त्यांनी सहभाग नोंदविला. जांभोऱ्यात आनंदस्वामींचे वास्तव्य असताना बऱ्याच वेळेस ते सदाशिवराव खरातांकडे थांबत असत. पंढरीनाथ पाटलांच्या सूचनेवरून विवाहित कन्या विमलबाई इंगळे यांना त्यांनी अमरावती येथे शिक्षकाच्या ट्रेनिंगसाठी पाठविले. पुढे या विमलबाई इंगळे यांनी देऊळगाव नगर परिषदेचे अध्यक्षपद

भूषविले. डॉ. सदाशिवराव खरात यांचे २००३ साली निधन झाले. संदर्भ – सौ. विमलबाई इंगळे यांची मुलाखत, देऊळगावराजा

खाजोने
सूर्यभानजी सखारामजी
( मृत्यू – ऑक्टोबर १९५०)

सत्यशोधक सूर्यभानजी खाजोने अकोट, जिल्हा अकोला येथील रहिवासी होते. सूर्यभानजी खाजोने यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी विदर्भातील पहिली सत्यशोधक शाखा करजगाव येथे इ. स. १९०० मध्ये स्थापन होत असताना ते याप्रसंगी उपस्थित असावे असे दिसते. या बैठकीपासून प्रेरणा घेऊन ते सत्यशोधक विचार प्रवाहात आल्याचे दिसते. २८ व २९ डिसेंबर १९२२ रोजी अ. भा. माळी शिक्षण परिषदेची १२

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button