सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 38 काळे गोविंद गणपत (जन्म १८७१)

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 38 काळे गोविंद गणपत (जन्म १८७१)

सत्यशोधक रावसाहेब गोविंद गणपतराव काळे यांचा जन्म इ. स. १८७१ मध्ये हडपसर, जिल्हा पुणे येथे झाला. गोविंदराव काळे यांची वडिलोपार्जित जमीन मांजरी शिवारात होती. त्यांची जमीन महात्मा फुले यांच्या शेताला लागूनच होती. महात्मा फुले या शेतावर येत असत. महात्मा फुले यांचे प्रथम दर्शन गोविंद काळे यांना अवध्या वयाच्या सातव्या वर्षी झाले. गोविंद काळे दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, वडिलांचे निधन झाल्यावर गोविंद काळे यांच्या आईने काळे यांना शिक्षणासाठी महात्मा फुले यांच्याकडे पुणे येथे ठेवले. गोविंद काळे इ. स. १८८१ ते १८८४ पर्यंत विद्यार्थी म्हणून महात्मा फुले यांच्याकडे राहिले, याच कालखंडात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. पुढे १८८४ ते १८९१ पर्यंत ते कारकून म्हणून फुले यांच्याकडे (सत्यशोधक कारकून म्हणून) राहिले. इ. स. १८८४ नंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी मुलखात दौरे काढले. या दौऱ्यात गोविंद काळे त्यांच्यासमवेत राहत असत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी कच्च्या लेखनाचे पक्के काम गोविंद काळे करत असत. ‘शेतकऱ्याचा असूड’ ग्रंथाची पांडुलिपी प्रत गोविंद काळे यांनीच केली असावी. महात्मा फुले यांच्या निधनानंतर १८९१ साली त्यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ग्रंथ प्रसिद्ध झाला. क्रांतीमों सावित्रीबाई फुले यांच्या सूचनेवरून महात्मा फुले यांचे अल्पचरित्र लिहून यशवंतराव फुले यांच्या नावाने जोडले. प्रस्तुत चरित्र हे महात्मा फुले यांचे आद्यचरित्र होय.

महात्मा फुले कालवश झाल्यावर काही महिन्यांनी (१८९१ साली) गोविंद काळे यांनी फुले यांच्याकडील नोकरी सोडून हडपसर येथे वास्तव्य केले. हडपसर येथे सहकारी तत्वावर सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. ही पतसंस्था काळे यांच्या पारदर्शी व्यवहारामुळे भरभराटीस आली.

मुंबईचे राज्यपाल आणि पुढे भारताचे महाराज्यपाल झालेले लॉर्ड डफरीन यांनी या सोसायटीस भेट देऊन काळे यांचा गौरव केला, त्यांना मानाचा रावसाहेब किताबही बहाल केला.

सत्यशोधकांचे अंतरंग /५८

सत्यशोधक अधिवेशनांना काळे आवर्जुन उपस्थित राहत, पुणे येथील पहिल्या अधिवेशनाला (१७-४-१९११) ते उपस्थित असून अधिवेशनाच्या फंडाला त्यांनी चार आण्याचा निधी दिला. चौथ्या सासवड (२५ व २६-४- १९१४) अधिवेशनाला ते उपस्थित राहिले असून सहकार पतपेढ्या निर्माण कराव्यात या ठरावाचे ते अनुमोदक आहेत. अहमदनगर येथील पाचव्या अधिवेशनाला (११ व १२-५-१९१५) काळे उपस्थित राहिले असून ठराव सत्रातील एका ठरावाचे ते अनुमोदक होते. इ.स. १९१५ नंतर भरलेल्या अधिवेशनांनाही त्यांची अधूनमधून उपस्थिती राहत असावी.

संदर्भ- १. आम्ही पाहिलेले फुले संपादक हरि नरके, २. सत्यशोधक समाज अधिवेशने – चिंतन आणि चिंता जी. ए. उगले, ३. सत्यशोधक समाज परिषद अ.भा. व कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माळी

कांडलकर

भगवंतराव बाळाजी

(मृत्यू – १९३०)

सत्यशोधक भगवंतराव बाळाजी कांडलकर इ. स. १९१४च्या सुमारास अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते. दरम्यान, वन्हाड सत्यशोधक (विदर्भ) आंताचे ते उपाध्यक्षही राहिले. करजगाव शाखेचे ते अध्यक्षही होते.

इ. स. १९०० साली करजगावात विदर्भातील पहिली शाखा उभी राहिली. या शाखेच्या उभारणीत कांडलकरांचा सहभाग होता. कृष्णाजी चौधरी, मो. तु. वानखडे यांच्यासहित कांडलकरांचे सत्यशोधक समाजासाठी योगदान राहिले.

सत्यशोधक समाजाच्या प्रारंभीच्या अधिवेशनांना कांडलकरांची उपस्थिती राहत आली. पुणे येथे भरलेल्या प्रथम अधिवेशनाला ते आवर्जुन उपस्थित होते. या अधिवेशनाला त्यांनी दोन रुपये निधीही दिलेला आहे. ते पहिल्या अधिवेशनारासून पाचव्या अधिवेशनापर्यंत उपस्थित असून अधूनमधून उशव सत्रात ठरावहीं मांडत असत. दिनांक २५ व २६ एप्रिल १९१४ रोजीच्या सासवड अधिवेशनातील नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. यापूर्वी त्यांनी अय्यावारू अध्यक्ष असताना समाजाचा उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button